
Pune : पुणे महानगरातील पर्यटक, निसर्गप्रेमी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) यांच्यावतीने पानशेत आणि वरसगाव धरण परिसरात विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळे शहरातील नागरिकांना निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येणार असून, ग्रामीण भागातील पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
पुण्याच्या पश्चिम भागात वसलेल्या पानशेत धरण आणि वरसगाव धरण परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला, हिरवेगार डोंगर, जलाशय, धुके, धबधबे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादित सुविधांमुळे अनेकांना येथे जाणे जिकिरीचे ठरत होते. हीच अडचण लक्षात घेऊन पीएमपीएमएल प्रशासनाने विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
|
|
पीएमपीएमएलकडून सध्या लोणावळा, रांजणगाव गणपती, यमाई माता मंदिर, बनेश्वर मंदिर या ठिकाणी पर्यटन बस सेवा सुरू आहे. प्रवाशांचा आणि पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय पानशेत आणि वरसगाव या भागात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पीएमपीएमएलकडून या भागात बस सेवा सुरू आहे. परंतु, बस संख्या कमी असल्याने आता बस संख्या वाढविण्यात येणार आहे.
या नव्या पर्यटन बससेवेमुळे पुणे शहरातील विविध प्रमुख थांब्यांवरून थेट पानशेत–वरसगाव घाट परिसरात जाणे शक्य होणार आहे. यासाठी अत्याधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. या बससेवेमुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूककोंडी, अपघात आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.
या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक, छोटी दुकाने, गाईड, बोटिंग व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्रेते यांना आर्थिक लाभ होणार आहे. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याने या भागातील आर्थिक चक्र अधिक गतिमान होणार आहे.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!

























Subscribe to my channel




