
Pune : पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील चर्चित नाव असलेल्या आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याने शनिवारी पोलीस सुरक्षेत महापालिका निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय गाठले. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या आंदेकरला विशेष न्यायालयाने अटी-शर्तींसह निवडणूक लढवण्यास परवानगी दिली आहे. या आदेशाचा आधार घेत आंदेकर आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी आला खरा, परंतु तांत्रिक त्रुटींमुळे त्याचा अर्ज शनिवारी स्वीकारला गेला नाही. हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असलेल्या स्थितीत आंदेकरने ज्या प्रकारे घोषणाबाजी करत कार्यालयात प्रवेश केला, त्याने उपस्थित अधिकारी आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
वास्तविक, न्यायालयाने आंदेकर कुटुंबाला अर्ज भरण्याची मुभा देताना स्पष्ट बजावले होते की, या प्रक्रियेदरम्यान कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही किंवा प्रक्षोभक भाषणे व घोषणाबाजी करता येणार नाही. मात्र, या नियमांना हरताळ फासत बंडू आंदेकरने कार्यालयात शिरतानाच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. "मला लोकशाहीत कसं आणलंय ते बघा", "मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही" आणि "आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत" अशा घोषणा त्याने मोठ्या आवाजात दिल्या. इतकेच नाही तर "नेकी का काम, आंदेकर का नाम" म्हणत त्याने स्वतःची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्यासोबत लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर हेदेखील पोलीस बंदोबस्तात उपस्थित होते.
|
Pune : अजित पवारांच्या शिलेदाराचा भाजपवर थेट आरोप; ईव्हीएम मशीनवरून खळबळ, राजकीय वातावरण तापलं |
या सर्व राड्यानंतर जेव्हा अर्ज सादर करण्याची वेळ आली, तेव्हा निवडणूक प्रशासनाच्या तपासणीत आंदेकरचा अर्ज अपूर्ण असल्याचे समोर आले. अर्जातील अनेक रकाने रिकामे असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी हा अर्ज फेटाळला नाही, मात्र तो पूर्ण भरून आणण्यास सांगितले. अर्ज भरण्यासाठी अद्याप तीन दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने, आता बंडू आंदेकर आणि त्याचे कुटुंबीय सोमवारी पुन्हा एकदा पूर्ण तयारीने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराने पोलीस कोठडीतून दिलेली ही 'आक्रमक' एन्ट्री सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली असून, प्रशासकीय नियमांच्या उल्लंघनाबाबत आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



