
Mumbai : शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते, नाल्यांमध्ये टाकले जाणारे प्लास्टिक हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. पावसाळ्यामध्ये तुंबणाऱ्या पाण्याला कचऱ्यात टाकले जाणारे प्लास्टिक हेच कारणीभूत ठरते. यामुळेच पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबते. या घातक प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्लास्टिकबंदीची घोषणाही करण्यात आली. या बंदीची अंमलबजावणी करताना महापालिकेकडून कारवाईचा बडगाही उचलला जातो. जानेवारीपासून जुलै अखेरीपर्यंत केलेल्या कारवाईतून तब्बल एक हजार किलोंपेक्षा जास्त प्लास्टिक विविध ठिकाणांहून जप्त केले आहे. याशिवाय २० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम दंड स्वरूपात वसूल केली आहे. या कारवाईत सर्वाधिक प्लास्टिक मुलुंड, घाटकोपर, सँडहर्स्ट रोड, मशीद रोड, अंधेरी या भागांत आढळले आहे.
मुंबईत २६ जुलै, २००५ रोजी आलेल्या महापुराला नाल्यात साठलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. या बंदीनंतर ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री किंवा त्या बाळगणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाईला सुरूवात झाली. करोनाकाळात ही कारवाई थंडावली आणि त्यानंतर महापालिकेने १ जुलै, २०२२पासून बंदी घातलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला पुनरुज्जीवित केले होते. त्यानुसार बाजार, दुकाने आणि आस्थापना, परवाना विभागाचे प्रभागनिहाय पथक दुकानांना भेट देतानाच बंदी असलेले प्लास्टिक जप्त करू लागले. दुकानदाराने बंदी असलेले प्लास्टिक वापरल्यास दंड वसूल करून त्यानंतर जप्त केलेले प्लास्टिक महापालिका प्रभागांतील गोदामात ठेवू लागले.
|
|
ही कारवाई सातत्याने सुरू असली तरीही प्लास्टिक वापराला पूर्णपणे आळा बसलेला नाही.
महापालिकेने १ जानेवारी ते जुलै २०२४ या कालावधीत प्लास्टिक विरोधी कारवाईत १ हजार ६६ किलो प्लास्टिक जप्त केले. ४०६ जणांविरोधात ही कारवाई करताना २० लाख ६० हजार रुपये दंड वसूल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १९ हजार ४१३ ठिकाणी भेटी दिल्यानंतर अवघ्या ४०६ केसेस दाखल झाल्याचे समोर आले आहे. एकट्या जुलै महिन्यात ६१२ किलोचे प्लास्टिक जप्त केले आहे. या महिन्यात १३ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुनर्प्रक्रिया कागदावरच
मुंबईत आढळणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण अधिकच असते. यामध्ये भाजी, फळांसाठी वापरण्यात येणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पिशव्या, खाद्यपदार्थांच्या पाकिटांची आवरणे यांचा समावेश असतो. त्यापाठोपाठ कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्लास्टिक बाटल्याही आढळतात. हॉटेल, खाद्यपदार्थ स्टॉल्ससह अन्य दुकानांतून प्लास्टिक बाटलीबंद पाणी विकत घेतले जाते आणि त्याचा वापर झाला की ते कचऱ्यात टाकण्यात येते. बाटल्या आणि थाळ्या, ग्लास, चमचे, पिशव्या, वाट्या, कंटेनर, स्ट्रॉ, कप या प्लास्टिकचाही वाढता वापर हा पर्यावरण आणि आरोग्यालाही घातकच आहे. त्यामुळे या प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून त्यापासून विविध वस्तू बनवण्याचा विचार महापालिका गेल्या काही वर्षांपासून करत आहे. प्लास्टिक कचरा हा मुंबईकरांकडून जमा करण्याचा निर्णय घेताना त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर २४ पैकी पाच प्रभागांमध्ये पाच केंद्रे स्थापन केले जाणार होती. ही केंद्रे स्थापन झाली की नाही, याबाबत महापालिकेनेही काहीही माहिती दिलेली नाही.
नेमका कसला कचरा?
मुंबईत सध्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी ४८ केंद्रे कार्यरत आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून ते विलगीकरण करतात. मुंबईत दररोज सहा हजार ते सात हजार मेट्रीक टन कचरा आढळतो. ओला, सुका कचरा असे विलगीकरण करताना सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक बाटल्या, वर्तमानपत्र, मिक्स पेपर, बॉक्स, पुठ्ठा, कार्डबोर्ड, थर्माकोल, काचेच्या बाटल्या, कपडे, ई-कचरा इत्यादींचा समावेश असतो.
सर्वाधिक प्लास्टिक पुढील प्रभागांत...
मुलुंड टी प्रभाग- १०६ किलो
घाटकोपर एन प्रभाग- ७६.४५ किलो
अंधेरी पश्चिम के पश्चिम प्रभाग- ४० किलो
सँडहर्स्ट रोड आणि मशीद रोड परिसर बी प्रभाग- ४४ किलो
एफ दक्षिण प्रभाग, परळ- २३ किलो
शहर
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
महाराष्ट्र
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- कोल्हापूर: बाळूमामा देवस्थान ट्रस्ट गैरव्यवहारप्रकरणी मोठा खुलासा; एसआयटीकडून सहावा एजंट सागर पाटील अटकेत!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर

























Subscribe to my channel




