
Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र आणि आसपासच्या ५० मीटर परीघ क्षेत्रात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मतदान केंद्र व आसपासच्या परिसराची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, मतदान केंद्रावरील स्वच्छतागृहांची स्वच्छता आदी कामांसाठी पालिका प्रशासनाला तब्बल पाच कोटी रुपयांचा भार सोसावा लागणार आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील सर्व मतदान केंद्र स्थळी स्वच्छता राखण्यासाठी २५ विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा विशेष निधी देण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधांअभावी मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. अनेक मतदान केंद्रांवर स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे पाण्याचीही सोय करण्यात आली नव्हती. या सुविधांअभावी मतदारांसह निवडणुकीच्या कामासाठी तैनात कर्मचाऱ्यांचेही प्रचंड हाल झाले होते. अस्वच्छतेमुळे मतदारांसह कर्माचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, तसेच स्वच्छतेच्या कामात कुठलीही हयगय होऊ नये, यासाठी पालिकेने तब्बल ५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
|
|
पालिकेच्या २५ विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाख रुपये यानुसार पाच कोटी रुपये विशेष निधी देण्यात आला आहे. मतदान केंद्र आणि आसपासच्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित विभाग कार्यालयातील घनककचरा व्यवस्थापन खात्यातील सहाय्यक अभियंत्यावर सोपविण्यात आली आहे. मतदान केंद्रांमध्ये प्रसाधनगृह नसल्यास तेथे फिरते प्रसाधनगृह उपलब्ध करण्याची सूचना प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
अन्य कारणांसाठी निधी वापरास मनाई
मतदान केंद्रांच्या स्वच्छतेसाठी गरज पडल्यास आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी या निधीचा वापर करण्याची मुभा विभाग कार्यालयांना देण्यात आली आहे. तसेच, स्वच्छतेसंदर्भातील यंत्रसामग्रीचीही पूर्तता या निधीतून करता येईल. या स्वच्छतेच्या कामाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कामास हा निधी वापरण्यास प्रशासनातर्फे सक्त मनाई करण्यात आली आहे.
सुविधा काय ?
- पहाटेपासून घराबाहेर पडलेल्या, तसेच असुविधेमुळे बेजार झालेल्या महिला कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा झाली होती.
- आगामी विधानसभा निवडणुकीत स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.
- पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातर्फे मतदान केंद्रस्थळी स्वच्छता राखणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे
- प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी व निवडणुकीच्या दोन दिवस आधी आणि नंतर मतदान केंद्रातील प्रसाधनगृहांची स्वच्छता आदी कामे करण्यात येणार आहेत.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




