
Mumbai : वांद्रे परिसरात गस्त घालणार्या ओशिवरा पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज गुजर यांच्यावर हल्ला करणाऱ्या ४१ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरूण चोप्रा असे आरोपीचे नाव असून त्याने मद्यप्राशन केले होते. दारुच्या नशेत त्याने पोलिसांशी हुज्जत घालून, शिवीगाळ केली आणि गुजर यांना मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मनोज गुजर हे वांद्रे येथील पोलीस अधिकारी वसाहतीत वास्तव्यास असून सध्या ते ओशिवरा पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते मंगळवारी रात्री गस्तीवर होते. त्यामुळे ते ओशिवरा – वांद्रे दरम्यानच्या परिसरातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देत होते. रात्री उशिरा ते वांद्रे येथील सिने अभिनेता सलमान खान याच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटजवळील बंदोबस्त पाहण्यासाठी बी. जे. रोड परिसरातून जात होते.
|
Sangli : संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका |
यावेळी नॅशनल बेकरीजवळील सिग्नल परिसरात एक व्यक्ती मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्याला थांबवून चौकशी केली. सदर व्यक्तीने चौकशी करणार्या पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने मनोज गुजर यांना मारहाण केली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले.
याप्रकरणी मनोज गुजर यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपीचे नाव वरुण आकाश चोप्रा असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. सध्या तो वांद्रे येथील शेर्ली राजन रोड, वगोव्हील इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहतो. त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अन्वये नोटीस देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


