मुंबई: राज्याला लवकरच पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार असल्याची तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात वेग आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठी राजकीय उलथापालत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या सर्व चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना सडेतोड आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. आज त्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी कराड येथील प्रीतिसंगमावर गेल्या होत्या; त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“माझ्यावर अन्याय होतोय” — सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी “रामकृष्ण हरी” अशी प्रतिक्रिया देऊन तो विषय बाजूला सारला. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांबाबत विचारण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या, “गेली १२ वर्षे माझा शपथविधी होतोय. माझ्यावर अन्याय करू नका. २०१४ पासून मी मंत्री होतेय. पॉलिसी मेकिंगला गांभीर्याने विचारात घेतलं जात नाही. मी चार संयुक्त संसदीय समितीवर आहे, देशाच्या फायनान्स कमिटीवर आहे. परंतु, याबाबत विचारलं जात नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “बारामतीकरांनी मला संसदेवर पाठवलं. मी महाराष्ट्राच्या वतीने तिथे जाते. माझं भाग्य आहे की जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या मागे आहेत. राष्ट्रवादी पक्षाने मला संधी दिली. यावर कोणीही प्रश्न विचारला तर मला अंतकरणातून आनंद होईल.”
“मी कामात व्यस्त, चर्चा ऐकायला वेळ नाही”
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रात असलेला दुष्काळ, फायनान्स कमिटीतील जबाबदारी, संयुक्त संसदीय समितीतील चार अतिशय महत्त्वाची बिलं, ज्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार आहे; यात मी व्यस्त आहे. आज इथे आल्यावर दोन्ही नव्या निर्वाचित आमदारांनी मला टँकर आणि चारा-पाण्याची माहिती दिली. यात व्यस्त असल्याने फार काही ऐकायला फार कमी वेळ असतो.”
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
रोहित पवारांनी पक्षात गुप्त बैठक घेतली होती, असा दावा केला जात असल्याबाबतही सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “गुप्त बैठक म्हणजे काय? काल रोहित नागपुरात नव्हते. त्यांचं लोकेशन चेक करा. पक्षाची गुप्त बैठक होते, हे हास्यास्पद आहे.”
महत्त्वाचे तपशील व पार्श्वभूमी
कार्यक्रमाचे निमित्त: माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृष्णा-कोयना प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी सुप्रिया सुळे कराड येथे उपस्थित होत्या.
संसदीय व धोरणात्मक कामकाज: चार संयुक्त संसदीय समित्या (JPC) आणि देशाच्या फायनान्स कमिटीवरील जबाबदाऱ्या तसेच महत्त्वाच्या विधेयकांवर काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळ व टँकरची स्थिती: राज्यातील दुष्काळी परिस्थिती, चारा-पाणी आणि टँकरसंदर्भात दोन्ही नव्या निर्वाचित आमदारांनी माहिती दिल्याचे त्यांनी नमूद केले.
गुप्त बैठकीचा दावा फेटाळला: रोहित पवारांच्या कथित गुप्त बैठकीचे दावे त्यांनी हास्यास्पद ठरवत ते नागपुरात नसल्याचे स्पष्ट केले.
शहर
- पुणे: नागरिकांनी रॅपिडो सेवेचा वापर करू नये, पुणे आरटीओचे आवाहन; कंपनीवर गुन्हा दाखल आणि ॲप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!
- पुणे: बारामती परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर! पोलिसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुप्रिया सुळे
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
महाराष्ट्र
- सातारा: यशवंतरावांच्या विचारांतूनच अजितदादांची कार्यपरंपरा पुढे नेवू; कराड प्रीतिसंगमावर सुनेत्रा पवारांची भावनिक व ठाम ग्वाही!
- पुणे: नागरिकांनी रॅपिडो सेवेचा वापर करू नये, पुणे आरटीओचे आवाहन; कंपनीवर गुन्हा दाखल आणि ॲप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!
- सांगली: गाडी आडवी मारण्यावरून थरारक वाद; हरिपूरच्या व्यावसायिकाचा कोथळीत धारदार शस्त्राने वार करून खून, संशयित फरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
गुन्हा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!



























Subscribe to my channel




