प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर टाकलेल्या धाडी, कारवाईतील गंभीर कायदेशीर त्रुटी आणि अधिकारांचे उल्लंघन (Jurisdictional Breach) केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित ठाणे आणि पुणे विभागातील इतर तब्बल २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी (Departmental Inquiry) प्रस्तावित करण्यात आली आहे.
निलंबित अधिकारी आणि काय आहे प्रकरण?:
राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये खालील नावांचा समावेश आहे:
-
दिगंबर भोगावडे – सह आयुक्त (अन्न) (Joint Commissioner - Food)
-
यादुराज दहातोंडे – सहाय्यक आयुक्त (अन्न) (Assistant Commissioner - Food)
-
अशोक इलागेर – अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer)
-
सी. आर. स्वामी – अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer)
हे प्रकरण पुण्यातील मावळ तालुक्यातील 'सोक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' (SOEX India Pvt Ltd) या कंपनीवर टाकलेल्या ३१.६७ कोटी रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखू उत्पादनांच्या जप्तीशी आणि ठाण्यातील एका हुक्का/तंबाखू पुरवठादार कंपनीवरील कारवाईशी संबंधित आहे. या धाडीं दरम्यान स्वतःच्या कार्यक्षेत्राबाहेर (Jurisdiction) जाऊन बेकायदेशीरपणे कारवाया करणे, वस्तूंवर 'अखाद्य/फक्त हुक्क्यासाठी' असा स्पष्ट उल्लेख असताना नियमांचे उल्लंघन करणे आणि अन्न सुरक्षा कायद्याचा चुकीचा वापर करून कारवाई करणे, अशा अनेक प्रशासकीय त्रुटी व गैरप्रकार तपासात निष्पन्न झाले होते.
इतर २१ अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी:
या संपूर्ण कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करताना कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर सह आयुक्त श्रीकांत कारकले, पी. पी. सूर्यवंशी यांच्यासह ठाणे व पुणे विभागातील २१ अधिकाऱ्यांविरुद्ध 'महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९' मधील नियम ८ नुसार चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावणे हा या कारवाईमागचा मुख्य हेतू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहर
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
- नाशिक: कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला राष्ट्रपतींची उपस्थिती अभिमानास्पद; दुष्काळातही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार – एकनाथ शिंदे
- पुणे: जुन्नरमध्ये बनावट परदेशी मद्याचे मोठे रॅकेट उघड; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करत ११.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि तिघे अटकेत
- पुणे: इलेक्ट्रिक वाहनचालकांसाठी मोठी खूशखबर! महाराष्ट्रात ईव्ही चार्जिंगचे दर कमी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींचे संकेत
महाराष्ट्र
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
- नाशिक: कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला राष्ट्रपतींची उपस्थिती अभिमानास्पद; दुष्काळातही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार – एकनाथ शिंदे
- कोल्हापूर: गोकुळची समांतर सभा केवळ मनाच्या समाधानासाठी; पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची कडक टीका, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील तांत्रिक अडचणीवर स्पष्ट भाष्य
- पुणे: जुन्नरमध्ये बनावट परदेशी मद्याचे मोठे रॅकेट उघड; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करत ११.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि तिघे अटकेत
गुन्हा
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण



























Subscribe to my channel




