
Grampanchayat Election : नाशिक जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला असून, यात सर्वाधिक जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्या आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून, त्यानंतर शरद पवार गटाने 2 जागा जिंकून तिसऱ्या नंबरचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, यात मनसेने खाते उघडले असून, दुसरीकडे भाजपने तीन जागा जिंकल्या आहेत. तर अजित पवार गटाला एक जागा जिंकता आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा सुरु असून, यातील 3 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 45ग्रामपंचायतीसाठी कालच मतदान प्रक्रिया पार पडली. जवळपास 82 टक्के इतके मतदान झाले. यानंतर आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरवात झाली. यानंतर हळूहळू एक एक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, यामध्ये पक्षीय बलाबल समतोल असल्याचे दिसून आलं आहे. आतापर्यत 23 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून, यात काँग्रेस आणि ठाकरे गटाचे सर्वाधिक चार चार जागा जिंकत आघाडीवर आहे. तर भाजपाला तीन जागा मिळाल्या आहेत. अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागल्याचे चित्र आहे.
|
Gram Panchyat Election Result : ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कौल काँग्रेसच्या बाजुने |
नाशिक जिल्ह्यातील 48 पैकी 03 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर काल 45 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 15 ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि सदस्यांच्या 18 रिक्त जागांसाठी मतदान पार पडले होते. यानंतर आज सकाळी 8 वाजेपासून तर काही ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. आता विजयी उमेदवारांचे निकाल हाती येत आहेत. यातील नाशिक तालुक्यातील पिंपळगाव गरुडेश्वर ग्रामपंचायतीत बाळू वाळू डंबाळे (शरद पवार गट) विजयी झाले असून, बागलाण तालुक्यातील भवाडे ग्रामपंचायतीत अनिल तुळशीराम मोरे विजयी झाले आहेत. तर इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो ग्रामपंचायतीत ठाकरे गटाच्या अनिता राक्षे विजयी झाल्या आहेत. तसेच नाशिक तालुक्यातील सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा फडकला असून, याठिकाणी अपक्ष उमेदवार मनीषा फसाळे सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. याशिवाय सटाणा तालुक्यातील चिराई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या शकुंतला पाटील विजयी झाल्या आहेत. तर देवळा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली आहे. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मंगलाताई मोहन बेंडकोळी यांची सोमनाथ नगर ग्रामपंचायतपदी सरपंचपदी निवड झाली आहे.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड



























Subscribe to my channel




