रेणापूर (जि. लातूर): लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथे शेतीच्या जुन्या वादातून दोन कुटुंबांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात मृत शेतकऱ्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (२२ मे) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी ५ पुरुष आणि ३ महिला अशा एकूण ८ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
काय आहे नेमके प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, घनसरगाव येथील रहिवासी मनोहर माणिकराव आमनावर (वय ४५) आणि त्यांचे भाऊ परमेश्वर माणिकराव आमनावर (वय ४०) यांची गावात शेती आहे. त्यांच्या शेतीला लागूनच संशयित आरोपी शिवाजी बाबुराव आमनावर यांनी काही वर्षांपूर्वी मनोहर यांच्या चुलत्याकडून जमीन खरेदी केली होती. जमीन खरेदी केल्यापासून या दोन्ही कुटुंबांमध्ये जमिनीच्या हद्दीवरून जुना वाद सुरू होता. मनोहर यांनी आपल्या आत्याला वारसा हक्काने शेतीत हिस्सा मिळावा म्हणून या प्रकरणाला न्यायालयातही आव्हान दिले होते.
किरकोळ वादाचे रूपांतर हत्याकांडात: शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मनोहर आमनावर आणि शिवाजी आमनावर यांच्या कुटुंबातील एका महिलेमध्ये शेतीच्या कारणावरून किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, पाहता पाहता या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी संतापलेल्या शिवाजी आमनावर, गोविंद आमनावर, ज्ञानेश्वर आमनावर आणि इतर पाच जणांनी पूर्वनियोजित कट रचून मनोहर व परमेश्वर यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मनोहर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर परमेश्वरही रक्तबंबाळ झाले.
पोलिसांची कारवाई, आठ आरोपी ताब्यात: घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनोहर यांना तपासून मृत घोषित केले. गंभीर जखमी परमेश्वर यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंदे, जमादार बालाजी डप्पडवाड, संदीप चव्हाण, अनिल मोगले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी याप्रकरणी तत्परता दाखवत आठही आरोपींना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहर
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
- नाशिक: मालेगाव तालुक्याच्या घशाला पडली कोरड; १२५ गावे आणि ५८ वाड्यांना पाणीटंचाईची तीव्र धग
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव
- सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ९७.९२ टक्के चुरशीने मतदान! खंडाळ्यात तुफान राडा, उद्या निघणार निकाल
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा



























Subscribe to my channel




