पुणे: पुणे महापालिकेच्या (PMC) बांधकाम आणि अतिक्रमण विरोधी विभागाच्या संयुक्त पथकाने बावधन बुद्रुक परिसरातील ५ अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांटवर धडक कारवाई करत सुमारे ३५ हजार चौरस फुटांचे बेकायदा बांधकाम बुलडोझर आणि जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. महावितरणच्या मदतीने या पाचही प्लांटचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. बावधनमधील या धडक कारवाईनंतर आता सिंहगड रस्त्यावरील धायरी आणि वडगाव बुद्रुक परिसरातील बेकायदा आरएमसी प्लांटवर महापालिका प्रशासन कधी हातोडा चालवणार, असा संतप्त आणि परखड सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बावधन परिसरातील निवासी भागात बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या आरएमसी प्रकल्पांमुळे हवेचे प्रचंड प्रदूषण, धुळीचे लोट, सिमेंटचा त्रास आणि अवजड वाहनांची अहोरात्र वाहतूक यांमुळे नागरिक हैराण झाले होते. आरोग्याच्या तक्रारी आणि वाढत्या त्रासामुळे नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत सातत्याने महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत महापालिकेने ९ जेसीबी, २ गॅस कटर, ६० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात बावधनमधील मार्क इन्फ्रा, अल्ट्राटेक आरएमसीसह ५ प्रकल्पांवर थेट कारवाई केली.
धायरी आणि वडगावमधील परिस्थिती अत्यंत बिकट:
बावधनमधील कारवाईने धायरी आणि वडगाव परिसरातील नागरिकांच्या आशेला नवे पल्लवी फुटले आहेत. धायरी, वडगाव, नऱ्हे आणि बेनकर वस्ती परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून निवासी इमारतींच्या अगदी शेजारी अनेक बेकायदा आरएमसी प्लांट खुलेआम सुरू आहेत. या प्रकल्पांमधून उडणाऱ्या सिमेंटच्या धुळीमुळे वयोवृद्ध, लहान मुले आणि दम्याचे रुग्ण यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात घरांच्या खिडक्या, गाड्यांवर सिमेंट आणि धुळीचा जाड थर जमा होतो. अहोरात्र चालणाऱ्या मिक्सर ट्रकमुळे आवाजाचे प्रदूषण आणि रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
यापूर्वी धायरी व वडगावमधील ९ बेकायदा आरएमसी प्लांटवर छापा टाकण्याचे नियोजन महापालिकेने केले होते, मात्र प्रशासनातील गोपनीय माहिती लीक झाल्यामुळे व वरिष्ठ स्तरावरून अचानक आदेश आल्याने ती कारवाई स्थगित झाली होती, असा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे बावधनप्रमाणेच धायरी आणि वडगाव भागातील बेकायदा प्लांटवरही कोणतीही हयगय न करता तात्काळ बुलडोझर चालवून नागरिकांना प्रदूषणाच्या त्रासातून मुक्त करावे, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहर
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
महाराष्ट्र
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




