
Desh Videsh : इस्रायल-हमास, इस्रायल-हेझबोला यांच्यातील युद्धानंतर आता इस्रायल-इराण युद्ध पेटलं आहे. इराणने मंगळवारी (१ ऑक्टोबर) रात्री इस्रायलची राजधानी तेल अविववर मोठा हल्ला केला आहे. इराणने इस्रायलवर २०० बॅलिस्टिक क्षेपणास्रे डागल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या संघर्षाचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतीवर बघायला मिळतो आहे. इराणच्या हल्ल्यानंतर कच्चा तेलाच्या किंमतीत जवळपास ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इराणच्या हल्ल्यानंतर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ
रॉटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात ग्लोबल बेंचमार्क ब्रेंट क्रूडचे दर २.६ टक्क्यांनी म्हणजेच १.८६ डॉलरने वाढून ७३.५६ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. तर वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट क्रूडचे दर प्रति बॅरल २.४ टक्क्यांनी म्हणजे १.६६ डॉलरने वाढून ६९.८३ डॉलरने पर्यंत वाढले आहेत. या हल्ल्याचा परिणाम फक्त क्रूड ऑईलवरच नाही, तर शेअर बाजारावरही पडला आहे. जगभरातील अनेक शेअर बाजारात घसरण झाल्याचं बघायला मिळालं आहे.
|
Sangli : मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादीची पाठ |
भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता
साधारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव वाढले, तर त्याचा परिणाम भारतील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होतो. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर वाढल्याने भारतील तेल वितरक कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे याची झळ भारतीयांना बसण्याची शक्यता आहे.
इराणचा इस्रायलवर हल्ला
मंगळवारी रात्री इराणने इस्रायलमधील अनेक ठिकाणी २०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. याशिवाय इस्रायलची राजधानी तेल अवीव जवळील जाफामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच इस्रायलही इराणला जशास तसं उत्तर देण्याची शक्यता आहे. “जो कुणी आमच्यावर हल्ला करेल, त्याला आम्ही हल्ल्याने उत्तर देऊ. तसेच इराणच्या हल्ल्याला आम्ही परतवून लावले आहे. या अपयशी हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल. हमास आणि हेझबोलाची जी अवस्था केली आहे, तीच इराणची केली जाईल”, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी दिली आहे.
शहर
- पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात तुफान राडा! रेखा कोंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, चार महिलांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
महाराष्ट्र
- सांगली: व्यवसायातील सततच्या नुकसानीला कंटाळून मिरजेतील ४४ वर्षीय व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा
- पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात तुफान राडा! रेखा कोंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, चार महिलांविरोधात गुन्हा दाखल
- कोल्हापूर: ओपन हार्ट सर्जरीचा धोका टळला अकरावी दहावी शस्त्रक्रिया यशस्वी करत कोल्हापूरचे सीपीआर रुग्णालय राज्यात अव्वल
- रायगड: जागतिक मंचावर सुवर्णतेज! शिरवलीच्या शौर्या निलेश पवारची जागतिक थायबॉक्सिंग स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णभरारी
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!





























Subscribe to my channel




