मुंबईकरांची अत्यंत महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची ‘लाईफलाइन’ मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर विनातिकीट आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. एप्रिल ते जुलै २०२६ या केवळ चार महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल १५ लाख ४६ हजार (१५.४६ लाख) विनातिकीट व अनियमित प्रवाशांना रंगेहाथ पकडले आहे. या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे प्रवासाचे भाडे आणि दंड मिळून एकूण १२१ कोटी ३१ लाख रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दंडाच्या रकमेत तब्बल ४० टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या वर्षीच्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत राबवलेल्या व्यापक तपास मोहिमांमुळे महसुलात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ च्या याच समान कालावधीत मध्य रेल्वेने १४ लाख ४२ हजार प्रकरणांतून ८६ कोटी ७३ लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, यंदा प्रवाशांच्या वाढत्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी आणि तिकीट काढूनच प्रवास करण्याची सवय लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पथकांची संख्या आणि तपासणीच्या फेऱ्या वाढवल्या, ज्यामुळे कारवायांच्या संख्येत आणि दंडात्मक वसुलीत विक्रमी वाढ झाली आहे.
या सर्व व्यापक कारवायांमध्ये मुंबई मुख्यालयाच्या विशेष पथकांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली असून, केवळ मुख्यालयाच्या पथकांनी ७७ हजार प्रकरणांतून तब्बल ७ कोटी ४४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये सर्वाधिक कारवाई आणि दंडाची वसुली ही ‘मुंबई विभागात’ झाली असून, मुंबई विभागाने सर्वाधिक ७ लाख ४० हजार प्रकरणांतून तब्बल ४९ कोटी ५० लाख रुपयांचा दंड वसूल करून आघाडी घेतली आहे.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना रांगेत उभे न राहता झटपट तिकीट काढता यावे यासाठी अनारक्षित तिकिटांसाठी खिडक्या, स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीन (ATVM), आणि ‘युटीएस ऑन मोबाईल’ (UTS on Mobile) ॲपची सुविधा सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असतानाही अनेक प्रवासी विनातिकीट किंवा अवैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे धाडस करत असल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा प्रवाशांमुळे नियमित व कायदेशीर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रामाणिक प्रवाशांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागतो. प्रवाशांची ही बेशीम आणि अनियमितता रोखण्यासाठी मध्य रेल्वेने आगामी काळातही अशाच प्रकारच्या कठोर आणि अचानक तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




