पुणे: राज्यभरात राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक म्हणजेच विद्युत वाहनांसाठी चार्जिंगचे मोठे जाळे उभारण्यात येत आहे. यामुळे वाहनचालकांची मोठी सोय होणार असली तरी यासाठी चार्जिंगचा दर प्रतियुनिट २२ रुपये आकारण्यात येणार आहे. हा दर वाहनचालकांसाठी जास्त असल्याने तो कमी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यभरात ईव्ही चार्जिंगचे दर कमीत कमी ठेवण्यासाठी राज्य सरकार तात्काळ पावले उचलेल, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
'एका मोबिलिटी'च्या सहा उत्पादन प्रकल्पांच्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. या उच्चस्तरीय कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया, एका मोबिलिटीचे अध्यक्ष सुधीर मेहता व सुनंदा मेहता आदी दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर चार्जिंग सुविधांची मोठ्या प्रमाणावर उभारणी केली जात असून, सध्या त्यासाठी प्रतियुनिट २२ रुपये दर आकारला जात आहे. ही बाब सुरुवातीला माझ्या निदर्शनास आली नाही, अन्यथा त्याच वेळी हा दर कमी ठेवण्यास सांगितले असते. आता याबाबत केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांना सूचना करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार यात वाहनचालकांना मोठा दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करू शकते. राज्य सरकारने सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतियुनिट ५ रुपये आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी प्रतियुनिट ८ ते १० रुपये दर आकारावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगचे दर अत्यंत किफायतशीर ठेवावेत, अशी अत्यंत मोलाची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने राज्य सरकार तातडीने पावले उचलणार असून, आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगचे दर जास्तीत जास्त कमी आकारले जातील. याचबरोबर, राज्यभरात ईव्ही चार्जिंगचे जाळे विनाअडथळा उभारण्यासाठी राज्य सरकार आवश्यक जागा, सर्व U/P परवानग्या आणि सर्वंकष पायाभूत सुविधा विनाविलंब उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी पार पाडेल. विद्युत वाहनांसाठी एक सक्षम आणि अत्याधुनिक चार्जिंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने आधीच एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
हरित ऊर्जेवर राज्याचा विशेष भर
या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हरित ऊर्जा नियोजनाचा लेखाजोखाही मांडला. राज्याची सद्यस्थितीतील हरित ऊर्जा निर्मितीक्षमता ३५ गिगावॉट एवढी आहे. यामध्ये आगामी २०२३० पर्यंत आणखी ४६ गिगावॉट नवीन क्षमतेची भर पडणार असून, यातील तब्बल ९१ टक्के ऊर्जा ही पूर्णपणे हरित ऊर्जा असणार आहे. यामुळे एकूण उत्पादित ऊर्जेमधील हरित ऊर्जेचे प्रमाण थेट ५२ टक्क्यांवर पोहोचेल. पुढे हे प्रमाण २०२३५ सालापर्यंत सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत जाणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व दूरगामी माध्यमातून आगामी काळात दिवसेंदिवस वाढणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणारी विजेची प्रचंड मागणी ही यशस्वीरीत्या हरित ऊर्जेच्या माध्यमातूनच पूर्ण केली जाईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
शहर
- पुणे: जुन्नरमध्ये बनावट परदेशी मद्याचे मोठे रॅकेट उघड; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करत ११.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि तिघे अटकेत
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: मायक्रो फायनान्सच्या वसुलीचा तीव्र जाच; हप्त्यांच्या तगाद्याला कंटाळून हिंगोलीत पाच महिलांनी राहती घरे काढली विक्रीला!
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
महाराष्ट्र
- कोल्हापूर: गोकुळची समांतर सभा केवळ मनाच्या समाधानासाठी; पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची कडक टीका, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील तांत्रिक अडचणीवर स्पष्ट भाष्य
- पुणे: जुन्नरमध्ये बनावट परदेशी मद्याचे मोठे रॅकेट उघड; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करत ११.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि तिघे अटकेत
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: मायक्रो फायनान्सच्या वसुलीचा तीव्र जाच; हप्त्यांच्या तगाद्याला कंटाळून हिंगोलीत पाच महिलांनी राहती घरे काढली विक्रीला!
गुन्हा
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

























Subscribe to my channel




