गेल्या महिन्यात नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान ठरले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेते जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नेहरू यांनी सलग 4,398 दिवस पंतप्रधानपद भूषवले होते. त्याआधीही त्यांनी पाच वर्षे भारताचे नेतृत्व केले होते. इंदिरा गांधी यांचाही एकूण कार्यकाळ अधिक होता. तरी तो सलग नव्हता. त्यामुळे मोदी हे निःसंशय स्वतंत्र भारतातील सर्वाधिक प्रभावशाली तीन नेत्यांपैकी एक मानले जातात. मोदी यांच्या नेतृत्वाखाली 1947 नंतर भारतात सर्वाधिक व्यापक री-अलाइनमेंट झाले. त्यामुळे आर्थिक आधुनिकीकरण व विकासाला मोठी गती मिळाली. मात्र, संस्थांच्या स्वायत्ततेबाबत व अल्पसंख्याकांच्या संरक्षणाच्या प्रश्नावर अनेक आव्हानेही समोर आली. मोदी यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांची उभारणी. त्यामुळे 1.4 अब्जांहून अधिक भारतीयांच्या जीवनात मूलभूत बदल झाला. 2014 पूर्वी कोट्यवधी भारतीय औपचारिक बँकिंग व्यवस्थेपासून दूर होते. अनौपचारिक व्यवहारांवर अवलंबून राहिल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला पुढे नेत मोदी यांनी अशी नवी व्यवस्था उभारली. यात पारंपरिक बँकिंग पद्धतीऐवजी शून्य शिल्लक बँक खाती (जनधन योजना), बायोमेट्रिक ओळखपत्रे (आधार) आणि मोबाईल क्रमांक यांची जोड देण्यात आली. याच ‘जेएएम’ त्रिसूत्रीमधून यूपीआय प्रणाली विकसित झाली. हा सार्वजनिक आणि तात्काळ डिजिटल व्यवहाराचा प्रोटोकॉल असून रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत सर्वांनाच तत्काळ व्यवहार करणे शक्य झाले. याच प्रणालीमुळे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेचाही विस्तार झाला. त्याअंतर्गत अनुदान आणि इतर लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले. 2013 मध्ये सुरुवात झाल्यापासून डीबीटी आणि इतर कल्याणकारी योजनांच्या मदतीने सुमारे 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचा दावा केला जातो. मध्यस्थांची भूमिका कमी झाल्याने भ्रष्टाचारावरही काही प्रमाणात नियंत्रण आले. मात्र, अर्थव्यवस्थेतील इतर अनेक क्षेत्रे अजूनही भ्रष्टाचारमुक्त झालेली नाहीत.पायाभूत सुविधांच्या विकासालाही युद्धपातळीवर गती देण्यात आली. महामार्ग, विमानतळ आणि उच्च-वेगवान रेल्वे प्रकल्पांमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली. बंदरांचे आधुनिकीकरण आणि विस्तार सुरू आहे. गावागावांत वीज पोहोचली आहे. यापूर्वी सामुदायिक विहिरींवर अवलंबून असलेल्या 10 कोटींहून अधिक घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवण्यात आले. परराष्ट्र धोरणात मात्र मोदी यांनी नेहरू यांच्या परंपरेचाच अवलंब केला. जागतिक भू-राजकीय संघर्षात कोणत्याही एका गटाच्या बाजूने उभे राहण्याऐवजी भारताने दीर्घकाळ जपलेली धोरणात्मक स्वायत्तता कायम ठेवली आणि ‘मल्टी-अलाइनमेंट’ या धोरणाला पुढे नेले. काही चुका झाल्याची टीकाही होते. उदाहरणार्थ- इराण युद्धाच्या वेळी भारताने स्वतःला तटस्थ आणि संभाव्य मध्यस्थ म्हणून अधिक ठळकपणे मांडायला हवे होते. त्याऐवजी भारत अमेरिका व इस्रायलच्या बाजूने असल्याची धारणा निर्माण झाली. दुसरीकडे, हिंदुत्वाची संकल्पना भारताची सांस्कृतिक ओळख प्रामुख्याने 80 टक्के हिंदू लोकसंख्येच्या वारशाशी जोडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मुस्लिम आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांमध्ये सामाजिक व राजकीय उपेक्षेची भावना वाढल्याचे मानले जाते. टीकाकारांच्या मते, भारताच्या बहुविधतेचे संरक्षण करणाऱ्या संस्थात्मक यंत्रणा कमकुवत केल्या जात आहेत. स्वायत्त संस्थांना कमकुवत केल्याबद्दलही सरकारवर सातत्याने टीका होत आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असली, तरी दरवर्षी रोजगार बाजारात येणाऱ्या लाखो तरुणांसाठी पुरेशा दर्जेदार आणि औपचारिक नोकऱ्या निर्माण करण्यात अद्याप यश आलेले नाही. एकूणच नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील भारत हा केवळ आर्थिक चमत्कार नाही आणि तो लोकशाहीच्या अधोगतीचेही सरधोपट उदाहरण नाही. हा एक महत्त्वाकांक्षी आणि शक्तिशाली देश आहे. तो स्वतःचा मार्ग स्वतः घडवत आहे. जगानेही भारताला या व्यापक आणि गुंतागुंतीच्या वास्तवातूनच समजून घ्यायला हवे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील भारत हा ना केवळ आर्थिक चमत्कार आहे, ना लोकशाहीच्या अधोगतीचे उदाहरण. हा एक महत्त्वाकांक्षी आणि शक्तिशाली देश आहे. तो स्वतःचा मार्ग स्वतः तयार करत आहे. जगानेही भारताला या गुंतागुंतीच्या वास्तवासह स्वीकारणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




