टोमॅटो हे भारतीय स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या भाजीपाल्या पैकी एक आहे. टोमॅटो शिवाय सलाड, एखादी भाजी पूर्ण होत नाही. यामुळे टोमॅटोचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मात्र आजकाल बाजारात केमिकल आणि कीटकनाशके फवारली जाणारी टोमॅटो विकण्यास ठेवली जातात. पण असे टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
जर तुम्हाल केमिकलमुक्त टोमॅटो हवे असल्यास तुम्ही घरी ताजे, रसाळ आणि 100% सेंद्रिय टोमॅटोचं रोपं लावून लागवड करणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात टोमॅटोची लागवड करणे आणि वाढवणे हे जितकं विचार करतात तितके कठीण नाहीत. या लेखात घरी उत्कृष्ट टोमॅटो रोपं वाढवण्याचे काही सोप्या स्टेप बद्दल जाणून घेऊयात.
उच्च दर्जाचे बियाणे निवडा: विश्वसनीय कंपनीकडून किंवा दूकानातून हाइब्रिट टोमॅटोची बियाणे घ्या, कारण ते रोपाच्या चांगल्या वाढीस मदत करतात.
बियाणे अंकुरित करा: बियाणे 24 तास पाण्यात भिजवा, नंतर त्यांना ओल्या कापडात गुंडाळा आणि 5-6 दिवस तसेच राहू द्या. त्यानंतर ते बियांना हलकेच छोटे अंकूर आलेले दिसतील.
सुपीक माती तयार करा: 40% बागेची माती, 30% शेणखत आणि 30% कोकोपीट मातीत मिक्स करा. यामुळे त्याची मुळे मजबूत होतील आणि त्यांचे पोषण होईल.
योग्य कुंडी निवडा: 12 ते 14 इंच खोल कुंडी किंवा ग्रो बॅग निवडा जेणेकरून मुळे व्यवस्थित पसरतील.
रोपे हलवा: रोपे 4-5 इंच उंच झाल्यावर त्यांना काळजीपूर्वक मोठ्या कुंड्यांमध्ये लावा आणि त्यांना चांगले पाणी द्या. भरपूर सूर्यप्रकाश द्या. रोपाला दररोज किमान 6 तास थेट सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. बाल्कनी किंवा टेरेस हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
नियमितपणे पाणी द्या: माती कोरडी होऊ नये म्हणून नियमितपणे पाणी द्या, परंतु जास्त पाणी देऊ नका. आठवड्यातून 3 ते 4 वेळा पाणी देणे उत्तम आहे.
रोपाला आधार द्या. रोप वाढत असताना त्याला आधाराची आवश्यकता असेल. लाकडी काठ्या किंवा दोरी वापरा.
कीटकांपासून संरक्षण: कीटक आणि बुरशीपासून संरक्षण करण्यासाठी दर 10-15 दिवसांनी कडुलिंबाचे तेल फवारणी करा. सेंद्रिय खते घालत रहा: केळीच्या सालीचे पाणी, ताक किंवा गांडूळखत यासारखी घरगुती खते दर 15 दिवसांनी देत राहा.
टोमॅटो वेळेवर काढा: टोमॅटो लाल, चमकदार आणि मध्यम आकाराचे झाल्यावर ते काढा.
थोडेसे प्रयत्न आणि योग्य ज्ञान असल्यास तुम्ही घरी केमिकलमुक्त, चविष्ट आणि पौष्टिक टोमॅटो वाढवू शकता. हे टोमॅटो तुमच्या स्वयंपाकघरातील गरजा पूर्ण करतीलच पण तुमच्या बागकामाचा अनुभवही सुंदर बनवतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




