गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लूट करण्याचे सत्र सुरुच आहे. पुण्यात एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २२ कोटी ७० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत छत्रपती संभाजीनगर येथून आठ जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य सायबर रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत संपर्क साधण्यात आला होता. आरोपींनी त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले, जिथे आयपीओ (IPO) आणि शेअर मार्केटमधून अवघ्या काही दिवसांत कोट्यवधींचा नफा कसा मिळवता येतो, याचे खोटे आमिष दाखवण्यात आले. तसेच विश्वासासाठी आरोपींनी त्यांना एका बनावट ॲपवर त्यांच्या गुंतवणुकीचा आभासी नफाही दाखवला.
या आमिषाला बळी पडून पीडित वृद्धाने वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये एकूण २२ कोटी रुपये गुंतवले. मात्र, जेव्हा त्यांनी हा नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी तांत्रिक कारणे सांगून अधिक पैशांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
पोलिसांची मोठी कारवाई
याची तक्रार प्राप्त होताच पुणे सायबर पोलिसांनी पैशांच्या व्यवहाराची माहिती घेतली. तसेच तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये छापेमारी केली. तेथून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सिम कार्ड्स, मोबाईल फोन आणि संशयास्पद बँक खात्यांची माहिती जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात या आरोपींनी अशाच प्रकारे इतर अनेक लोकांचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंतवणूकदारांना नवा इशारा दिला आहे. कोणत्याही अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुपवर किंवा क्विक मनी स्कीम्सवर विश्वास ठेवू नका. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना केवळ ‘सेबी’ (SEBI) नोंदणीकृत असलेल्या प्लॅटफॉर्मचाच वापर करावा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
शहर
- पुणे: अखेर यश! शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचे १२ दिवसांचे आंदोलन स्थगित; उच्चस्तरीय समितीची स्थापना!
- मुंबई: सायन रुग्णालयात धक्कादायक घटना: पदव्युत्तर निवासी डॉक्टर शिवशरणप्पा पाटील यांचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळला; ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसने संपवलं आयुष्य!
- मुंबई: अवघ्या आठ महिन्यात पाणी गळती आणि जलवाहिनी फुटण्याच्या १७ हजारांहून अधिक तक्रारी दाखल!
- पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल: सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचे विजयाचे खाते उघडले, ‘ब’ गटातून संग्राम सोर्टे विजयी!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: काळाचा घाला! आई-वडिलांसोबत मासे पकडायला गेलेली एकाच कुटुंबातील ५ मुले खाडीत बुडाली
- पुणे: अखेर यश! शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचे १२ दिवसांचे आंदोलन स्थगित; उच्चस्तरीय समितीची स्थापना!
- मुंबई: सायन रुग्णालयात धक्कादायक घटना: पदव्युत्तर निवासी डॉक्टर शिवशरणप्पा पाटील यांचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळला; ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसने संपवलं आयुष्य!
- मुंबई: अवघ्या आठ महिन्यात पाणी गळती आणि जलवाहिनी फुटण्याच्या १७ हजारांहून अधिक तक्रारी दाखल!
गुन्हा
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!























Subscribe to my channel



