३३ वर्षे जुन्या व्होरा समितीच्या अहवालातील निष्कर्षांचा पुनरुच्चार करताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, बिल्डर माफिया आणि नोकरशहा यांच्या संगनमताने बेकायदा बांधकामांमुळे चंदीगडचा सुखना तलाव कोरडा पडत आहे. नोएडा स्पोर्ट््स सिटीमध्ये खड्ड्यात पडलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्याच्या मृत्यूचीही एसआयटी चौकशी सुरू आहे. गोवा क्लब आगीत २५ मृत्यू,तर सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे २५ मृत्यू झाल्याच्या प्रकरणांची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे. या सर्व प्रकरणांत व्यवस्थेमधील दोषी स्पष्ट असूनही चौकशी समित्यांच्या नावाखाली काम लांबणीवर टाकण्याच्या वाढत्या संस्कृतीला लोक कंटाळले आहेत. यासाठी निलंबन, अटकेपलीकडे कारवाई झाली पाहिजे. १. स्मार्ट शहरे : दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात उत्तर प्रदेश सरकारने ग्रेटर नोएडामध्ये डेटा सेंटर स्थापनेसाठी २.२७ लाख कोटींचा सामंजस्य करार केला. नोएडाजवळ २९ हजार ६५० कोटींचे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले जात आहे. २०१५ मध्ये १०० शहरांना स्मार्ट करण्यासाठी २.३ लाख कोटींची योजना विकसित करण्यात आली होती, परंतु वास्तव अगदी वेगळे आहे. दंतेवाडातील अबुझमाडमध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या २३ लहान पुलांच्या तत्काळ दुरुस्तीसाठी निधीचा अभाव असल्याने १०० गावांतील एक लाख लोकांचा वाहतुकीचा मार्ग विस्कळीत होत आहे. जीडीपीच्या ६०% योगदान देणाऱ्या क्षेत्रांना व्यापणाऱ्या नगरपालिका त्यांच्या ८०% पेक्षा जास्त खर्चासाठी सरकारी मदतीवर अवलंबून आहेत. पगार देयके, कचरा संकलन, पाणीपुरवठा व रस्ते देखभालीसाठी पैसे नाहीत. नोएडा हाय-टेक एक्स्पोमध्ये तंत्रज्ञानाचा बोलबोला दिसतो. आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल केले जातात, परंतु अपघातावेळी ड्रोन, डायव्हर्स, बोटी, लाइफ जॅकेट, प्रशिक्षित कर्मचारी आणि कृती योजना या सर्व गोष्टी गायब होत्या. २. भ्रष्टाचार : दिल्लीतील कचऱ्याचे तीन ढिगारे हे केवळ प्रदूषणाचे स्रोत नाहीत तर राष्ट्रीय लाजिरवाण्या गोष्टी आहेत. दिल्ली महानगरपालिकेचे वार्षिक बजेट १६,५३० कोटी आहे. सीवर लाइन्स आणि ड्रेनेज दुरुस्त करण्यासाठी ५७ हजार कोटींची मागणी केली जाते. कौन्सिलर फंड बजेट दरवर्षी २ कोटींपर्यंत कमी केले जात आहे. मुंबईत ७० हजार कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या बीएमसीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरसेवक ५-स्टार हॉटेल्समध्ये मजा करत आहेत. राजकारणी आणि अधिकाऱ्यांमध्ये पाणी, स्वच्छता आणि सीवर लाइन्ससाठी दूरदृष्टी, प्रयत्न आणि इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे दिसून येते. ३. ऑडिट : २०१९ मध्ये इंदूरमध्ये दूषित पाण्याच्या धोक्यांबद्दल कॅगने इशारा दिला होता. त्याचप्रमाणे कॅगच्या २०२१ च्या अहवालात नोएडा स्पोर्ट््स सिटी घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे. राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या संगनमताने अनेक भागांमध्ये भूखंड वाटण्यात सरकारला ९ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. नोएडामधील बिल्डर्स आणि बँक माफिया यांच्यातील संगनमताची तसेच प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले आहेत. कॅगच्या अहवालावर नोकरशाहीचे मौन आता पाच वर्षे जुने आहे. दरम्यान, पोलिसांनी किरकोळ प्रकरणांमध्ये पाच बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. नोएडा प्राधिकरणाला संबंधित जमिनीच्या भूखंडाची मालकीदेखील माहीत नाही! ४. जबाबदारी : विधानसभेत सादर माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत दिल्लीत गटार आणि नाल्यांमध्ये बुडून ८९ लोकांचा मृत्यू झाला. नोएडा प्रकरणाने जोर पकडला आहे. कारण पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि हवाई दलासह कोणतीही एजन्सी अडीच तासांपर्यंत त्या तरुणाला वाचवू शकली नाही. अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार एक नवीन मासिक स्कोअरबोर्ड प्रणाली सुरू करत आहे. भारत पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय एआय परिषद आयोजित करत आहे. अशा स्थितीत सरकारने निर्णय घ्यावा की, भविष्यात कोणत्याही अपघातानंतर नवीन चौकशी समिती स्थापन करण्याऐवजी मागील आयोग आणि समित्यांचे अहवाल एआयद्वारे मिळवले जातील. यामुळे केवळ प्रलंबित काम आणि तक्रारी ओळखल्या जातीलच, परंतु अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित होईल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
नोएडा हाय-टेक एक्स्पोमध्ये तंत्रज्ञानाचा जयजयकार केला जातो, आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिल दाखवले जातात, परंतु अपघातावेळी ड्रोन, डायव्हर्स, बोटी, लाइफ जॅकेट, प्रशिक्षित कर्मचारी आणि कृती योजना या सर्व गोष्टी गायब होत्या.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




