वडिलांसोबतच्या वादातून छ्त्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांचाही त्याच डोंगरावरून पडून मृत्यू झाला. पती आणि मुलगा डोळ्यांसमोर गेला हे पाहून तिथे असलेल्या त्या मुलाच्या आईनेही त्याच डोंगरावरून काही क्षणाच्या आत उडी घेत आपले जीवन संपवले. कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय 19), मुरलीधर दामोदर चांदगुडे (वय 48) आणि संगीता मुरलीधर चांदगुडे (वय 42) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आणि एका संपूर्ण कुटुंबाचा झालेला करुण अंत मन सुन्न करणारा आहे. या पार्श्वभूमीवर, समुपदेशक अलका वाळूंजकर यांनी मांडलेले मानसशास्त्रीय विश्लेषण समाज आणि पालकांसाठी डोळे उघडणारे आहे. वाचा या विशेष लेखातून… आजकाल सकाळी उठून बातम्या वाचताना मनात एक अनामिक धाकधूक (Fear) असते. काहीतरी अघटीत वाचायला मिळणार की काय, अशी भीती वाटते. शनिवारी, 21 ऑगस्ट 2026 च्या सकाळी अशीच एक हृदयद्रावक बातमी नजरेसमोर आली. तिसगाव येथील खवड्या डोंगरावरून एका 19 वर्षीय मुलाने आणि त्याच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला. हे वाचून मन सुन्न झाले. मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही, मृत्यूच्या साध्या विचाराने भलेभले घाबरतात; मग या 19 वर्षांच्या मुलाला त्याची भीती कशी वाटली नसेल? एवढी हिंमत त्याच्यात कुठून आली असेल? काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले..! मरणाची ही भावना एवढी वरचढ (Overpower) कशी झाली? आता समाजाने खडबडून जागे होण्याची वेळ आली आहे. यासाठी सुजाण पालकत्व, उत्तम नातेसंबंध, संवेदनशील समाज, आयुष्यामध्ये उद्दिष्ट निश्चिती, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी, शिस्त आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सारासार बुद्धी या सगळ्यांची नितांत आवश्यकता आहे. आत्महत्येचे विचार किंवा कृती यामध्ये भावनांचा आवेग वरचढ ठरतो. भावनांच्या नियमनाची (Emotional Regulation) सवय नसेल तर हे कोणत्याही वयात घडू शकते. या घटनेचा केंद्रबिंदू केवळ 'आयफोन' किंवा भौतिक वस्तू नसून, आई-वडिलांचे तणावपूर्ण संबंध, त्यातून होत असलेले कौटुंबिक कलह आणि या सर्व गोष्टींचा मुलावर झालेला मानसिक परिणाम असू शकतो. कारणे कोणतीही असली तरी, कोणतीही अतिरेकी गोष्ट करताना भान नसणे ही गोष्ट केंद्रस्थानी येते. कोणत्याही अतिरेकी विचारांमागे 'अपेक्षा–नकार–निराशा–भावनिक असंतुलन–आवेगपूर्ण कृती' असा घटनाक्रम असतो. मात्र, अशा घटनेचे विश्लेषण करताना एका कारणावर निष्कर्ष न काढता अनेक मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. बातमीत वाचल्यानुसार त्या कुटुंबामध्ये मागील 6 वर्षांपासून कलह होता. हा गृहकलह घरातील कोणत्याही सदस्याच्या मानसिक स्वास्थ्यासाठी घातक ठरतो. घरातील कलह आणि मनावर होणारे संभाव्य परिणाम (Domestic Conflict and Its Impact on Mind) 1. दीर्घकालीन ताण आणि अति-सतर्कता (Chronic Stress आणि Hyperarousal): घरात सतत भांडण, ओरडणे, अपमान किंवा तणाव असेल तर मुलाची मज्जासंस्था (Nervous System) सतत 'धोक्याच्या मोडमध्ये' (Danger Mode) राहू शकते. त्यामुळे चिडचिड, चिंता (Anxiety), झोपेचे प्रश्न आणि भावनिक थकवा (Emotional Exhaustion) वाढू शकतो. 2. भावनिक असुरक्षितता (Emotional Insecurity): पालकांमधील सततच्या संघर्षामुळे मुलाच्या मनात 'माझं घर सुरक्षित आहे का?', 'उद्या काय होईल?' अशी अनिश्चितता निर्माण होते. यातून असुरक्षितता (Insecurity) आणि असहायता (Helplessness) वाढू शकते. 3. स्वतःला दोष देणे आणि अपराधीपणा (Self-blame आणि Guilt): विशेषतः लहान किंवा संवेदनशील मुले पालकांच्या संघर्षाचे कारण स्वतःला मानतात. 'माझ्यामुळे आई-बाबा भांडतात' या विचारातून त्यांच्यात अपराधीपणा (Guilt) आणि कमी आत्मसन्मान (Low Self-Worth) वाढू लागतो. 4. आत्मसात केलेली असहायता (Learned Helplessness): वारंवार प्रयत्न करूनही घरातील परिस्थिती बदलत नाही असे वाटल्यास, 'मी काहीच बदलू शकत नाही' अशी हतबलता निर्माण होते. दीर्घकाळ नैराश्य (Depression) किंवा निराशा (Hopelessness) असलेल्या व्यक्तीत ही अवस्था आत्महत्येच्या विचारांच्या (Suicidal Thinking) जोखमीशी संबंधित असू शकते. 5. भावनिक अनियंत्रण (Emotional Dysregulation): घरात भावना निरोगी पद्धतीने व्यक्त करण्याचे आदर्श उदाहरण (Modelling) नसेल, तर मुलाला राग, भीती, निराशा यांचे नियमन करणे अवघड जाते. परिणामी, आवेगपूर्ण प्रतिक्रिया (Impulsive Reactions) वाढतात. 6. पलायनवादी विचार (Escape Thinking): सततच्या संघर्षातून काही मुलांच्या मनात 'इथून दूर जायचं आहे' अशी पलायनवादी विचारसरणी (Escape-Oriented Thinking) निर्माण होते. अत्यंत ताण आणि इतर धोके (Risk Factors) असल्यास ही विचारसरणी आत्महत्येच्या विचारांपर्यंत (Suicidal Ideation) घेऊन जाऊ शकते. 7. भावनिक जोडणी आणि विश्वासावर परिणाम (Attachment आणि Trust वर परिणाम): घर हे सुरक्षित आधारस्थान असण्याऐवजी संघर्षाचे ठिकाण झाले, तर पालकांशी असलेले भावनिक संबंध (Emotional Connection) कमी होतात. मुलाला 'माझं ऐकून घेणारं कोणी नाही' असे वाटणे विशेषतः धोकादायक ठरू शकते. 8. सामाजिक अलिप्तता (Social Withdrawal): घरातील तणावामुळे मुले मित्रांपासून दूर जातात, संवाद कमी करतात आणि स्वतःच्या भावनांमध्ये अडकून राहतात. त्यामुळे त्यांना मिळणारा संरक्षणात्मक आधार (Protective Support) कमी होतो. 9. झोप, एकाग्रता आणि शैक्षणिक समस्या (Sleep, Concentration आणि Academic Problems): दीर्घकालीन कौटुंबिक ताणामुळे (Chronic Family Stress) झोप, एकाग्रता (Concentration), मेमरी (Memory), शैक्षणिक कामगिरी (Academic Performance) आणि दैनंदिन कामकाजावर (Daily Functioning) परिणाम होतो, ज्यामुळे नैराश्य (Frustration) आणखी वाढते. आत्महत्येचे विचार, भावना आणि कृती यामागील मानसशास्त्रीय कारणे (Psychological Reasons Behind Suicidal Thoughts) उपाय आणि मार्ग (Solution) सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष (Conclusion) मुलांना केवळ सुखी ठेवण्यापेक्षा त्यांना सुख आणि दुःख दोन्ही पेलण्यास सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. पालकत्वाचा उद्देश "माझ्या मुलाला कधीच दुःख होऊ नये" हा नसून— "दुःख आले तरी माझं मूल स्वतःला सावरू शकेल" हा असायला हवा. मानसिकदृष्ट्या सुदृढ समाज घडवणे ही आपली सर्वांची जिम्मेदारी आहे. (लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक आहेत.) संबंधित वृत्त नाते निरोगी राहण्यासाठी!:राग का येतो, दु:ख का होते, भावनांचे नियमन म्हणजे काय, ते कसे करावे?; जाणून घेऊयात...! महाराष्ट्र हादरवणारे संभाजीनगरमधले ते 3 मृत्यू टळले असते:अशा प्रसंगातून मुलांना कसे सावरावे, कोणता पॉज घ्यावा, वाचा तज्ज्ञांच्या नजरेतून...!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



