१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. आजही २०२६ मध्ये देश स्वतंत्रच आहे. पुढील वर्षांपर्यंत देश स्वतंत्र होऊन ८० वर्षे होतील. स्वतःच्या डोळ्यांनी देशाला मिळालेले स्वातंत्र्य पाहिलेले खूपच कमी व्यक्ती आज देशामध्ये आहेत. आणि ते किती व्यक्त होऊ शकतात ही देखील शंका आहे कारण वयोमानानुसार इंद्रिय क्षमता कमजोर होतात. राज तंत्रामध्ये असलेला भारत, अनेक ठिकाणी संस्थानिकांचे राज्य असलेला भारत देश, स्वतंत्र झाल्यावरही नंतर काही वर्षे ही अनेक समस्यांना झुंज देत पुढे आला. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक स्वातंत्र्य मिळत जायला खूप वर्षे लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे प्रमुख पद भूषवून खूप मोठ्या कष्टाने भारताची घटना, कायदा निर्माण केला. त्याच घटना व कायद्याच्या आधारे आपण संविधानाचा आदर करत अत्यंत प्रतिष्ठेचे जीवन जगत आहोत. स्वातंत्र्य मिळाले त्या काळामध्ये देशामध्ये शिक्षण, दळणवळण, तंत्रज्ञान इत्यादी अनेक बाबतीमध्ये फार मोठे मागासलेपण होते. इतकेच पहा ना आपल्या देशामध्ये अनेक सुविधा किंवा कामाच्या गोष्टी इंग्रजांनी चालू केल्या अर्थात त्या त्यांच्या व्यवहाराच्या सुरळीकतेसाठी. मात्र असंख्य देशभक्तांच्या प्राणाच्या आहुतीच्या बदल्यात मिळालेले स्वातंत्र्य आपण पुढे काही काळ थोडे मंद गतीने विकासाकडे नेले आणि १९७० च्या दशकानंतर देशाच्या परिस्थितीमध्ये मोठे बदल व्हायला सुरुवात झाली. शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान सर्वच बाबतीमध्ये देशाने अत्यंत गतीने प्रगती करायला सुरुवात केली. त्यापूर्वी देशामध्ये मूलभूत समस्याही खूप होत्या त्यामुळे फार मोठा बदल घडू शकला नव्हता. आज या ठिकाणी हे सांगायला फार मोठा अभिमान वाटतो की अनेक क्षेत्रांमध्ये आज आपला देश जगामध्ये आघाडीवर आहे. जगामध्ये मोठ्या शक्तीच्या स्वरूपामध्ये आपला भारत देश उभा होत आहे. इतकेच नव्हे तर स्वतःला मोठे म्हणून घेणाऱ्या जगातील बलाढ्य देशांमध्ये जो काही विकास होतो विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय विकास यामध्ये फार मोठा हातभार भारतीय वैज्ञानिकांचा आहे. आपल्या देशातील महत्त्वाची तरुण संशोधक बौद्धिक पिढी ची ओढ काही मोठ्या राष्ट्रांकडे आहे त्यामुळे ते उपजीविकेसाठी बाहेर देशात जाऊन करिअर करतात. परंतु त्याचा उपयोग त्या देशांना होतो. तंत्रज्ञानामध्ये भारताला स्वतःच्या पायावर संपूर्ण जगामध्ये उभे करायचे असेल तर सर्व तंत्रज्ञान आपण आपल्या देशात विकसित केले पाहिजे. तांत्रिक बाबतीत आपले राष्ट्र इतर देशावर अवलंबून नसावे. म्हणून आपली युवा पिढीची बौद्धिक क्षमता इथेच उपयोगी यावी म्हणूनच माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी मेक इन इंडिया ची उद्घोषणा करत अनेक प्रकारे नवीन पिढीला मदतीचा हात दिला. आज स्टार्टअप प्रोजेक्ट मधून अनेक युवा शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित करत आहेत अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आज आपला भारत देश तंत्रज्ञान, विज्ञान, शिक्षण, अध्यात्म अशा अनेक विषयांमध्ये विकसित आहे. परंतु आज पुन्हा एक आवश्यकता आहे प्रत्येकाने नैतिकतेने स्वतःचे जीवन जगत, हृदयामध्ये देशप्रेम बाळगून देशाच्या विकासाला आणि प्रगतीला स्वतःच्या शक्तीनिशी हातभार लावणे. प्रत्येकाने दररोजचे आपले ध्येय, काम, कर्तव्य बजावत असताना एकच गोष्ट सतत लक्षात ठेवावी की माझ्या या कृतीचा देशासाठी उपयोग आहे का? मी हे केल्यामुळे देशाचे हित आणि नाव उज्वल होणार आहे का? आपण व्यावसायिक असो तर व्यवसायात प्रामाणिकता, आपण संशोधक असो तर केलेले संशोधन आधी देशहिताचे असावे हा विचार महत्त्वाचा आहे. अर्थातच आपण केलेल्या प्रत्येक कृतीचा राष्ट्रासाठी उपयोग हवा. कोणत्याही क्षुल्लक कृतीतून सुद्धा कदापी राष्ट्राचे अहित होऊ नये यासाठी प्रत्येकाने सतत सतर्क राहणे गरजेचे वाटते. एक भारतीय नागरिकाच्या अशा ठाम निश्चयपूर्वक विचारानेच देश जागतिक महासत्ता नक्कीच होईल. देशसेवा म्हणजे काय? हा प्रश्न आज आपल्या मनाला विचारून पाहिला तर त्याचं काय उत्तर येईल? अर्थातच नैतिकता, प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा. प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकतेने सर्व शक्तीनिशी करत राष्ट्रनिष्ठा सतत हृदयात बाळगली तर वेगळी अशी देशसेवा करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. यातूनच राष्ट्रहित उज्वल होईल. आपण स्वतःशी समाजाशी आणि राष्ट्राशी प्रामाणिक असणे हीच खरी देशसेवा. असे माझे मत आहे. जय हिंद ! जय भारत !! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

गणेश मंडपात मध्यरात्री चोरी; बाप्पाच्या पैशांच्या हारासह कार्यकर्त्याचा मोबाईल लंपास!
पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते पोलिसांच्या १२ नव्या वाहनांचं लोकार्पण!
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अतिवेगाने वाहन; नंबर प्लेटही झाकलेली! 🚗⚠️
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




