माणसाची सर्वात मोठी चूक ही असते की तो आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य दुसऱ्या बद्दलच्या विचारात चिंतेत व्यर्थ घालवतो. कोण कसा आहे? कसा वागतो? हे विचार आपल्याला आतून जाळतात. सर्वात गंभीर बाब ही आहे की आपण ज्यांचा सतत विचार करत असतो ते आपली किती काळजी करतात? जगात वाईट वागणारे लोकं सतत असणार आहेतच. कोणी तुम्हाला धोका देते तर कोणी आपले म्हणून तुमची मर्जी संपादन करुन मित्रत्वात मागून वार करते. कोणी तुम्हाला अनैतिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. वास्तविक प्रश्न हा आहे की तुम्ही त्यांच्या वाईट, स्वार्थी वागणुकीच्या ओझ्याखाली दबून आयुष्य जगणार आहात काय? आपल्याला फक्त इतकेच जाणून जगायचे आहे की समोरचा कसा ही असो, तो त्याचा प्रश्न आहे.आपण आपल्या आत्म्यास त्याच दिशेने घेऊन जाणार आहोत काय? आपण नैतिक वैधानिक मार्ग सोडू नये. आपण कां आणि कशासाठी जगत आहोत या जीवनाच्या प्रमुख उद्देशाचा कधी विचार केला आहे कां? लोक काय म्हणतील या भिती मध्येच अधिक आयुष्य जाते. विवेकपूर्ण विचार करा की हे लोक आहेत कोण? हे देखील भयभीत आणि द्विधा मनस्थितीत आहेत. ते काय म्हणतात, काय विचार करतात ही त्यांची मानसिक स्थिती,समस्या आहे. त्यांच्या आतील तो कचरा आहे, तो बाहेर पडू द्या.आपल्या आत्मिक आनंदाची चावी दुसऱ्याकडे मुळीच नाही. आपण स्वतः एक विवेकसंपन्न मनुष्य आहोत, दुसऱ्याच्या हातातील बाहुली नव्हे. आत्मकेंद्रित व्हा, खरा आनंद मिळेल. जीवन वर्तमानात समोर उभे आहे. त्या सुंदर जीवनाला तुमची प्रतीक्षा आहे. पण आपण आपली एक अपेक्षित प्रतिमा बनवलेली असते की मला असे व्हायचे आहे. तसे होत नाही. यालाच कुंठीत होणे म्हणतात. याच कारणाने आपण दुःखी होऊन समोर असलेल्या सुंदर जीवनाला गमावतो. म्हणून जे वर्तमान वास्तव आहे, त्याचा स्वीकार करत प्रगतीपूर्ण सुंदर जीवन जगावे. आपण दुःखी होण्याच्या मागे कुठे तरी आपली अपेक्षा असते. अपेक्षाभंगाने दुःख होते. आपल्याला वाटत असते की जग आपल्या इशाऱ्यावर नाचावे. आपण म्हणू तसे लोकांनी वागावे. सर्वांकडून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. पण असे प्रत्यक्ष घडत नाही. जग त्याच्या नियमाने चालते. तुमच्या इशाऱ्याने नव्हे. इतरांकडून अपेक्षा न करता आपण आपले स्वकेंद्रित होऊन जीवनाच्या प्रमुख ध्येयाच्या मार्गाचे क्रमण करावे. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




