फळे आणि भाज्या कापल्यानंतर त्यांचा रंग बदलणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी स्वयंपाकघरात काम करताना ती अनेकदा डोकेदुखी ठरते. विशेषतः बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काही वेळातच काळी पडतात. पण यामागचे नेमकं कारण काय, तसेच बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काळी पडू नयेत, यासाठी सोपे घरगुती उपाय आज आपण माहिती करुन घेऊया.बटाटा आणि सफरचंद काळं पडण्याच्या प्रक्रियेला विज्ञानात एन्झायमॅटिक ब्राउनिंग (Enzymatic Browning) असे म्हणतात. बटाटा आणि सफरचंदामध्ये 'पॉलिफेनॉल ऑक्सिडेज' (Polyphenol Oxidase) नावाचे एन्झाइम असते. जोपर्यंत ही फळ किंवा भाजी कापली जात नाही, तोपर्यंत हे एन्झाइम पेशींच्या आत सुरक्षित असते.मात्र, कापल्यानंतर या पेशी हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात. ऑक्सिजन आणि एन्झाइम्सच्या रासायनिक अभिक्रियेमुळे मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य तयार होते, ज्यामुळे कापलेला भाग काळा किंवा तपकिरी दिसू लागतो.कापलेले बटाटे आणि सफरचंद ताजे ठेवण्यासाठी तुम्ही घरगुती पर्याय नक्की वापरु शकता. बटाटे कापल्यानंतर लगेच थंड पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यांचा हवेशी संपर्क तुटतो आणि ते काळे पडत नाहीत. हा सर्वात सोपा उपाय आहे.जर तुम्ही सफरचंद कापले असेल आणि ते तुम्हाला थोड्यावेळाने खायचे असेल तर तुम्ही त्या फोडींवर थोडा लिंबाचा रस लावावा. लिंबातील व्हिटॅमिन-सीमुळे (Antioxidant) ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते.तसेच एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाका. त्यात बटाटे किंवा सफरचंदाचे काप ठेवा. यामुळे रंग बदलत नाही, मात्र खाण्यापूर्वी सफरचंद एकदा धुवून घ्यावे.जर तुम्हाला सफरचंद जास्त वेळ ताजे ठेवायचे असेल तर दोन कप पाण्यात दोन चमचे मध मिसळून त्यात सफरचंदाच्या फोडी ठेवाव्यात. साधारण ३-५ मिनिटांनंतर या फोडी काढून ठेवाव्यात. तसेच जर तुम्हाला कापलेली फळे लगेच वापरायची नसतील तर त्यांना क्लिंग फिल्मने घट्ट गुंडाळून किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवावे.यासोबतच बटाटे किंवा सफरचंद काळे पडण्यापासून थांबवायचे असेल तर एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा व्हिनेगर टाका. या पाण्यात कापलेले बटाटे किंवा सफरचंदाच्या फोडी २-३ मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे त्यांचा रंग बराच वेळ पांढरा आणि ताजा राहतो. पण खाण्यापूर्वी किंवा शिजवण्यापूर्वी ते साध्या पाण्याने एकदा धुवून घ्यावे.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




