बलराज संघई यांचा कॉलम:बालपण दुर्लक्षित नको

बालपण हा आयुष्यातील जगलेला सर्वात सुंदर भाग असतो. नंतर मात्र आयुष्य म्हणजे खरी परीक्षा चालू होते. आपल्या आतही एक लहान मुलं असले पाहिजे, स्वतःतले स्वतःचे लहानपण जपले पाहिजे. तरच आयुष्याचा खरा आनंद घेता येतो. लहानपण विसरत नसतं. सर्वच आठवतं असं नव्हे. मानसशास्त्राचे जनक डॉ. सिग्मंड फ्रॉइड ( ऑस्ट्रियाचे डॉक्टर, न्यूरिओलॉजिस्ट आणि वैद्यकीय संशोधक 1856-1939 ) यांनी मनोविश्लेषण शास्त्र या स्वतंत्र शाखेचे उद्घाटन करत सुरुवातीला बालकांचा बालमनाचा खूप मोठा अभ्यास केला.त्यांनी एक थेअरी मांडली होती.अगदी छोटे बालक असताना पासून पाहिलेल्या,जाणीव केलेल्या सर्व स्मृती मनाच्या पटलामध्ये खोलवर बिंबवलेल्या असतात आणि त्या कालक्रमानुसार वेळेनुसार परत जागृत होतात. जसे एखादी फाईल हाईड व्हावी आणि पुन्हा ओपन व्हावी. म्हणूनच लहान बाळ लहान लेकरू समजून माणसं ती जागी असताना त्यांच्यासमोर काही गोष्टी करतात की हे लहान आहे त्याला काय समजतं?पण ते तसं नसतं.तो स्मृति संस्कार घडत असतो.त्याचे परिणाम पुढे जाणवतात. आणि बालकांनाही त्यांच्या इच्छेनुसार आवडी-निवडीनुसार,त्यांच्या कलाने घेतलं पाहिजे.काही वर्षांपूर्वी बालपण हा सर्वात दुर्लक्षित विषय होता. पूर्वी एका घरामध्ये अनेक मुलं असायचे, कुटुंबातील मुलांची संख्या जास्त होती. त्यामुळे त्या सर्वांकडे व्यवस्थित लक्ष देणे होत नसेल. आजही काही प्रमाणात मुलांच्या आवडीनुसार त्यांना भविष्य मिळणे दुर्लक्षित आहे. काळानुसार परिस्थितीच्या बदलानुसार मुलांचे बालपण जपण्यातील प्रक्रिया बदलत गेली. बालपण हे संस्काराचे वय.त्यांच्या आवडीनुसार ते बिथरणार नाहीत या बेताने संस्कार द्यायचे असतात. मुलांना कोणते रंग आवडतात? कोणत्या खेळणी आवडतात? खायला काय आवडतं? इथून सुरुवात असते.आणि पुढे त्याचा कल पाहूनच त्याला शैक्षणिक शाखा द्यायची असते. बऱ्याच वेळा पालकांच्या आग्रहामुळे रस नसलेल्या विषयात मुलांना शिक्षण घ्यावे लागते म्हणून त्यात त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. संघर्ष करत कुटुंब चालवणाऱ्या घरामध्ये मात्र ताणतणावाने आर्थिक अडचणीच्या कारणामुळे लहानपणावर चुकीचे प्रहार होतात.त्या जखमा जपून मोठे होत त्याला आयुष्य जगावे लागते. म्हणून एकच सांगणे आहे.आजचे कोणी आपल्या घरामध्ये बालक आहेत त्यांचे लहानपण त्यांच्या कलाने घडू द्यावे आणि आपणही आपले बालपण न विसरता आपल्यातील एक बालक ही जागा ठेवायचा आहे. अर्थात हे दोन्ही वर्तमान भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या उज्वलते साठी.सुरम्य जीवन जगण्यासाठी. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *