आपण कोणाशी तरी प्रथम संवाद साधत असतो आणि बऱ्याचदा असं होतं की समोरच्या व्यक्तीचा काहीतरी गैरसमज होतो. आणि ती व्यक्ती आपल्या विरोधात जायला लागते. आपल्याविषयी काहीतरी वेगळा विचार समोरच्याच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. असे का घडते? याचाही विचार केला पाहिजे. अर्थातच समोरच्या व्यक्तीची मानसिकता ही देखील महत्त्वाची असते. ती व्यक्ती कशा प्रकारे आपल्याला पाहत आहे? त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे? समोरची व्यक्ती शीघ्रकोपीही असू शकते. कोणाकोणाची अशीही समज झाले ली असते की जगातून चांगलेपणा संपूर्णपणे नष्ट झालेला आहे. यात त्यांच्या स्वभावदोषा पेक्षा त्यांना आयुष्यात आलेले अनुभवही कारणीभूत असतात. तरीही तो गैरसमज आपल्या प्रथम संवादातून बराचसा दूर झाला पाहिजे यासाठी आपल्यात देखील काही संभाषण कौशल्य असावी लागतात. प्रथम संवाद साधताना काही गोष्टींची छाप पडते हे गृहीत धरून आपण बोलायचे असते. कोणाशीही प्रथम संवाद साधताना आपला दृष्टिकोन महत्त्वाचा व संस्कारही. वाकचातुर्य, समजून बोलण्याची पद्धत, आपला Visual Appearance, बोलतानाची शरीराची भाषा म्हणजे बॉडी लँग्वेज, आपले असणे, दिसणे हे सर्व संवादाचे वेळी महत्त्वाचे ठरते. मग तो संवाद कोणाशीही असो. शेकडो वर्षापासून ची एक मनोवैज्ञानिक सत्यता आहे. डोळ्याला समोर कोणी दिसल्याबरोबर ते कोण काय आहे याचा अर्थ बोध चेतासंस्था मेंदूकडे जाऊन क्षणार्धात अपडेट करते. First Impression, पहिली समज,नोंद. समोर पाहिल्याबरोबर पहिल्यांदा उमजते की स्त्री आहे का पुरुष. मनोवैज्ञानिक दृष्टिकोणानुसार मनुष्यातील वासनेच्या संवेगानुसार हा विचार जन्माला येतो. स्त्री आणि पुरुष असणे, दिसणे आणि समज, लैंगिक वैविध्य विविधता प्रथमदर्शनी समोर येणे, स्वाभाविक आहे. परंतु त्यानंतर येणारा दुसरा विचार महत्त्वाचा. त्यात वासनेचा अंश आणि त्या प्रकारचा अपेक्षाकृत प्रतिसाद नसावा. एकंदरीत आपली बोली आणि शरीराची भाषा आपल्याबद्दलचा समोरच्या व्यक्तीच्या मनात अभिप्राय बनवत असते. विषय जास्त न लांबवता मला थोडक्यात हे म्हणायचे आहे की या अस्तित्वाच्या असण्याच्या पलीकडे माणूस केव्हा पोहोचणार? समोर कोण आहे स्त्री की पुरुष हे विसरून किंवा तसा समज न होता एका मानवाशी बोलतो आहोत हा विचार मनात बुद्धीत केव्हा येणार? सोबतही असताना सोबत ती आहे का तो हे विसरून जायला हवं.अशा अवस्थेला आपला विचार कधी पोहोचणार? या दृष्टिकोनातूनच मानवता आणि मैत्री खऱ्या अर्थाने शाश्वत अशी अस्तित्वात येते. या दृष्टिकोणाने कोणाशी कितीही बोला, सोबत चला, बाहेर जा, फिरून या, काही हरकत नाही. फक्त तो मोकळेपणाचा मानवतावादी दृष्टिकोन हवा. यासाठी मनात, संस्कारात, वागणुकीत राग, द्वेष,अहंकार, लोभ, मोह वासना हे मात्र नसायला पाहिजेत. अशा सहवासाच्या क्षणातच जीवनातील खरी रंगत येते. या निमित्ताने व्यक्त होताना इतकेच मला महत्त्वाचे वाटले. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
महाराष्ट्र
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



