
Pune : पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या केळद ग्रामपंचायत (ता. राजगड) हद्दीत मढेघाट परिसरात पुण्यातील एका साहसी ट्रेकिंगचे क्लासकडून आयोजित करण्यात आलेल्या ट्रेकिंग दरम्यान विद्यार्थ्यांवर आग्या मोहोळांच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 35 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. बहुतांशी विद्यार्थी हे 14 ते 17 वयोगटातील आहेत. यामध्ये ट्रेकर प्रशिक्षकांचा सुद्धा सहभाग आहे. दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिकांनी केलेल्या बचाव कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सदर घटना रविवार (ता.०४) रोजी सुमारे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मढेघाट परिसरात पुण्यातील साहसी ट्रेकिंग करणाऱ्या एका क्लासच्या माध्यमातून आयोजित ट्रेक मध्ये सुमारे पन्नास हून अधिक विद्यार्थी घेऊन प्रशिक्षक व मार्गदर्शक शिक्षक यांनी मढेघाट ते उपंडा असा ट्रेक करत असताना मढे घाट उतरल्यानंतर मध्यभागी गेल्यावर गर्द झाडीमध्ये झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या माशा उठल्याने विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला.
|
|
मोठ्या प्रमाणात मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने विद्यार्थी सैरभर झाली यामध्ये आठ ते दहा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले तर इतर 25 विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावा घेतला. दरम्यान ट्रेक मध्ये असलेल्या एक जणांनी तोरण माची हॉटेलचे मालक अभिजीत भेके यांच्याशी संपर्क साधला यानंतर भेके, व या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी असलेले सूर्यकांत शिंदे यांनी परिसरातील असलेल्या सोशल मीडियाच्या व्हाट्सअप ग्रुप वर सदर घटनेची माहिती पाठवली.
घटनेची गांभीर्य ओळखून केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे, सुरेश शिंदे, अंकुश शिंदे, शिवाजी धुमाळ, दिलीप शिंदे, कैलास शिंदे, भरत शिंदे तसेच निगडे खुर्द चे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भावळेकर, यांनी घटनास्थळी धाव घेत. कड्यामध्ये असलेल्या मुलांना वरती काढले दरम्यान परिसरातील वाहन चालक दीपक भुरक, मोहन खुळे, महेश गुजर, यांनी स्वतःच्या वाहनांमधून व 108 क्रमांकाच्या रुग्णवाहितीतून या विद्यार्थ्यांना व प्रशिक्षकांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.
विद्यार्थ्यांना मळमळने, उलटी होणे, चक्कर येणे, तसेच चेहऱ्यावर, डोळ्यावर, ओठावर सूज येणे आणि आणि दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना अशी लक्षणे होती. या रुग्णांवर वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले. यानंतर अधिक जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना पुणे येथील खाजगी रुग्णात उपचारासाठी पाठवण्यात आले. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
शहर
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
महाराष्ट्र
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- कोल्हापूर: बीआयआर कायद्याचा अध्यादेश मागे घ्या! कोल्हापुरात हजारो साखर कामगारांचा विराट मोर्चा; २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
- सोलापूर: १६ वर्षांचा संसार मोडल्याने पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले चक्क गाढविणीशी लग्न
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!


























Subscribe to my channel




1 thought on “Pune : मढेघाट परिसरात ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला; ३५ जण जखमी, मोठी दुर्घटना टळली”