काही व्यक्तिमत्त्वे इतिहासाच्या एकाच अध्यायापुरतीमर्यादित नसतात. ती प्रत्येक पिढीसमोर एक नैतिक प्रश्नम्हणून उभी राहतात. महात्मा गांधी आणि चंद्रशेखर हीअशीच व्यक्तिमत्त्वे आहेत. या दोघांचे एकत्र स्मरणकरणे म्हणजे लोकशाहीच्या दोन परंपरांना उजाळा देणेहोय. त्यांनी सत्तेपेक्षा समाजावर जास्त विश्वास ठेवला. या दोघांच्याही आयुष्यात प्रवासाला विशेष महत्त्व होते.गांधीजींनी भारत देश पायी, रेल्वेने आणि बैलगाडीनेसमजून घेतला. तर चंद्रशेखर यांनी सत्तेच्या वर्तुळातूनबाहेर पडून समाजाची स्पंदने जाणण्यासाठी भारत-यात्राकेली. भारताचा आत्मा गावातील धुळीत, शहरांमधीलअस्वस्थतेत व सामान्य माणसाच्या आकांक्षांमध्येवसलेला आहे, हे ते दोघेही जाणून होते. त्यांच्यासाठीप्रवास हा समाजाचा एक अभ्यासच होता. आजचा भारतअभूतपूर्व तांत्रिक बदलांच्या काळातून जात आहे. अंतरेकमी झाली. माहितीचा स्फोट झाला. एआय आपल्यानिर्णयांवर प्रभाव पाडत आहे. तंत्रज्ञानाने वेग नक्कीचवाढवला . पण त्याने माणसातील संवेदना अधिक खोलकेली आहे का? हा प्रश्न आहे. त्याच्या उत्तरात गांधीजी वचंद्रशेखर मार्गदर्शक म्हणून आपल्यासमोर येतात. लोकशाहीला केवळ निवडणुकीपुरते मर्यादित केले जाते.तेव्हा तिची खरी शोकांतिका सुरू होते. निवडणुका हालोकशाहीचा उत्सव नक्कीच आहेत, पण तो तिचा मूळगाभा नाही. नागरिक फक्त मतदार आणि राजकारण हेकेवळ ‘इलेक्शन मॅनेजमेंट'' बनते, तेव्हा लोकशाहीचाआत्मा क्षीण होऊ लागतो. महात्मा गांधींसाठी लोकशाहीम्हणजे केवळ बहुमताचे राज्य नव्हते. शेवटच्या रांगेतउभ्या असलेल्या माणसाचा सन्मान हीच त्यांच्यासाठीलोकशाहीची खरी कसोटी होती. गांधीजी म्हणायचे की,कायदा माणसाला शिक्षा देऊ शकतो. पण त्याला नैतिकबनवू शकत नाही. करुणा ही कोणत्याही कायद्यातूननिर्माण होत नाही. सहअस्तित्व हे कोर्टाच्या कोणत्याहीआदेशाने स्थापन करता येत नाही. म्हणूनच लोकशाही हीशेवटी माणसाच्या मनात जन्म घेते. यामुळेच सार्वजनिकजीवनात भाषा व वर्तनाला केवळ राजकीय नाही, तरनैतिक महत्त्वही असते. गांधीजी विरोधकांसाठीहीसन्मानजनक भाषा वापरत असत. चंद्रशेखर संसदेत तीव्रटीका करायचे, पण त्याचे रुपांतर कधीही वैमनस्यात होऊदिले नाही. मतभेद ही लोकशाहीची ताकद आहे. अनेकभाषा, श्रद्धा, संस्कृती आणि जीवनपद्धती मिळूनभारतीयत्व तयार होते. गांधीजींनी याला भारताचीआध्यात्मिक ताकद मानले तर चंद्रशेखर यांनी सामाजिकन्याय आणि राष्ट्रीय एकता यांना एकमेकांचे पूरक मानले.आज ओळखीचे राजकारण संवादाच्या राजकारणावरवरचढ होताना दिसते, तेव्हा भारताचा आत्माएकसारखेपणात नसून सहअस्तित्वात वसलेला आहे.एआयच्या या युगात सर्वात महत्त्वाचा प्रश्न यंत्र कितीविचार करू शकते हा नव्हे तर माणूस अजूनही भावनाअनुभवू शकतो का? हा आहे. गांधीजी यंत्रांच्या विरोधातनव्हते; तर ते माणसाच्या विस्थापनाचे विरोधी होते.चंद्रशेखरसुद्धा विकासाच्या विरोधात नव्हते; माणूस मागेपडेल अशा विकासाच्या विरोधात होते. अल्गोरिदमनेमाणसाच्या विवेकाची जागा घेतली आणि यंत्रे आपलीस्मृती बनल्या, तर लोकशाही तांत्रिकदृष्ट्या आधुनिकहोईल, पण नैतिकदृष्ट्या गरीब बनेल. लोकशाहीचे भविष्यकेवळ संसदेत नाही तर शाळा, महाविद्यालये, कुटुंबे वनागरिक जीवनातील छोट्या-छोट्या प्रक्रियांमधून घडेल.नवी पिढी जर या विविधतेचा आदर करेल, प्रश्नविचारण्याचे धैर्य दाखवेल आणि भीतीमुक्त विवेकविकसित करेल, तरच ही लोकशाही जिवंत राहील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
- मुंबई: "मनोज जरांगे एक नंबरचा चोर माणूस..."कोअर कमिटी सदस्य संजय कटारेवर ४ कोटींच्या वाळू चोरीप्रकरणी कारवाईनंतर अजय बारस्कर यांचा जळजळीत हल्लाबोल!
- मुंबई: दादा, आज आठ महिने झाले तरी.. दिवंगत अजितदादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अत्यंत भावूक पोस्ट!
महाराष्ट्र
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
- अमरावती: ना डॉक्टर, ना नर्स, ना रुग्णवाहिका.. उपचाराविना महिलेचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयात मोठा उद्रेक आणि तीव्र रोष!
- गोवा: फक्त भाजप सरकारच करू शकते महिलांचे खऱ्या अर्थाने कल्याण; गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे महिला सक्षमीकरणावर मोठे वक्तव्य!
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

रस्ता रुंदीकरणावरून शाही मशिदीवर कारवाई; विरोधात मोठी गर्दी, प्रशासनावर दगडफेकीचा दावा
‘Golden GUYS’ सनी वाकचौरेच्या Mercedesवर पोलिसांची कारवाई! 🚔🚘⚠️
पावसाअभावी सोयाबीन पूर्णपणे वाळलं; शेतकऱ्याने ३ एकर पिकावर फिरवला ट्रॅक्टर!
देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल


























Subscribe to my channel




