काँग्रेस - लेफ्ट फ्रंट यांचा उरल्यासुरल्या मतांसाठी संघर्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीत डावे पक्षआणि काँग्रेस उरलेल्या वाट्यासाठी स्पर्धाकरत आहेत. पूर्व-मध्य भारतातमाओवादाला पूर्णपणे संपवण्यात आलेआहे, तर केरळमध्ये कॉम्रेडसरकारविरोधी दुहेरी भावनेशी झुंज देतआहेत. डाव्या विचारधारेला आता बाजूलासारण्यात आलेले दिसते.
बंगालमधील भिंतींवर लिहिलेला संदेश तुम्ही कोलकाताआणि त्याच्या बाहेर फिरल्याशिवाय कसा वाचणार? तरचला, माझ्यासोबत उत्तरेला ६०० किमीवरीलसिलीगुडीच्या ६० किमी अरुंद कॉरिडॉरमध्ये जाऊया किंवाबंगालच्या मुख्य भूमीला उत्तर आणि पूर्वेकडीलहिमालयीन जिल्ह्यांशी जोडणाऱ्या ९० किमी रुंद पट्ट्यातजाऊया. चला, नक्षलबाडीच्या भिंतींपासूनच सुरुवातकरूया. कुणी या गोष्टींकडे लक्ष दिले असते, तर आपणआज १९६७ च्या सशस्त्र आंदोलनाची ५९ वा स्मृती दिनसाजरा केला असता. म्हणूनच आम्ही बेंगाईजोतेपासूनसुरुवात केली. हे गाव नक्षलबाडीचाच भाग आहे. तेथेबंडाची पहिली ठिणगी पडली होती.
मला येथे त्या विसरल्या गेलेल्या क्रांतीच्या स्मारकांचीसाफसफाई आणि रंगकाम करत असलेले दोन कॉम्रेडभेटले. या स्मारकावर मार्क्स, लेनिन, एंगेल्स, स्टॅलिन,माओ, चारू मजूमदार आणि सरोज दत्ता यांच्या मूर्तीबसवण्यात आल्या आहेत. पहिले पाच नेते अशा महानव्यक्ती होत्या. त्यांची नावे या क्रांतीच्या प्रार्थनांमध्ये घेतलीजात होती. उरलेले दोघे त्यांचे उत्तराधिकारी होते आणिक्रांतीचे स्थानिक संस्थापक होते. पण माओच्या खांद्यालाखांदा लावून मार्शल लिन प्याओ (बियाओ)ही उभे होते.ते चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सर्वातशक्तीशाली प्रमुख होते आणि त्यांना अनेकदा चीनच्याकम्युनिस्ट पक्षातील दुसरे सर्वात ताकदवान नेते म्हटलेजात होते. पण अचानक एक दिवस १३ सप्टेंबर १९७१रोजी त्यांचे निधन होते. एका विमानातून ते कुटुंबासहप्रवास करत होते. ते मंगोलियात अपघातग्रस्त झाले. याअपघाताबद्दल चीनी सरकारने स्पष्टीकरण दिले की,कथित ‘प्रोजेक्ट ५७१’ तख्तापलट अयशस्वी झाल्यानंतरते पळून जात होते. असे मानले जाते की ते पळून सोव्हिएत संघात जात होते. लिन यांना गद्दार घोषित करण्यात आले आणि त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला की ते माओयांच्या पत्नी जियांग क्विंग यांच्यासोबत मिळूनसत्तापालटाची योजना करत होते. या दोघांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने ‘प्रति-क्रांतिकारी’ घोषित केले. पणजगात बेंगाईजोते एक अशी जागा आहे. तेथे तुम्ही माओ आणि लिन यांना एकमेकांच्या शेजारी पाहू शकता. नक्षल आंदोलनाची ५९ वी वर्षपूर्ती आणि लेनिन जयंती (२२ एप्रिल) साजरी करण्यासाठी त्यांच्या स्मारकाचीसाफसफाई करणारे दलित कॉम्रेड पुण्य सिंह राजबोंग्सीयांना याबद्दल काही अडचण नाही.
मी त्यांना विचारतो : तुम्ही माओ आणि लिन बियाओयांना एकत्र कसे ठेवू शकता? ते म्हणतात : कारण तेमहान कॉम्रेड होते. मी म्हणतो : पण, लिन यांनी माओयांना धोका दिला नव्हता का, आणि माओ यांनी त्यांचीहत्या करवली नव्हती का? राजबोंग्सी यांनी ठामपणेसांगितले : नाही, ताे सर्व अपप्रचार आहे. त्यांच्या विरोधात लिउ शाओकी यांनी कट रचला होता. मी त्यांना हेआठवण करून दिले नाही की लिउ यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. भक्तांशी वाद कशाला. दरम्यान, दुसरे ज्येष्ठ कॉम्रेड स्मारकातील वॉलपेपर चिकटवत होते.त्यावर बंगालीत काही लिहिले होते त्याचा अर्थ असा होता: "मुक्ती मतदानाने मिळणार नाही. मुक्ती फक्त क्रांतीनेचमिळेल.’ यानंतर काही दिवसांनी नक्षलबाडीमध्ये ९२टक्के मतदान नोंदवले गेले. आज लोक फक्त मतदानातूनहोणाऱ्या क्रांतीवरच विश्वास ठेवू लागले आहेत. क्रांतीचाजन्म नक्षलबाडीत झाला, तर तिचा अंतही तिथेच झाला.२०२१ मध्ये ही विधानसभा जागा भाजप उमेदवारआनंदमय बर्मन यांनी सुमारे ७१ हजार मते म्हणजे ५८टक्के मतांनी जिंकली. आम्ही त्यांना माटीगारा (यानिवडणूक क्षेत्राला आता माटीगारा-नक्षलबाडी म्हटलेजाते) येथे घराघरांत जाऊन प्रचार करताना पाहिले.मृदुभाषी शिक्षक आणि आरएसएस कार्यकर्ते आनंदमयबर्मन म्हणतात की त्या आंदोलनाने लोकांना गरिबीशिवायकाहीच दिले नाही. पश्चिम बंगालच्या यावेळच्या निवडणुकीत डावे पक्षआणि काँग्रेस यांच्यात स्पर्धा सुरू आहे की उरलेल्यावाट्यातून कुणाला मोठा हिस्सा मिळतो. ही स्थितीपूर्व-मध्य भारतात नक्षलांच्या नव्या रूपाला पूर्णपणेसंपवण्यात आले तेव्हा दिसते. दूर दक्षिणेत केरळमध्येडाव्या पक्षांना सरकारविरोधी दुहेरी लाटेचा सामना करावालागत आहे. ४ मे रोजी त्यांनी काही चमत्कार करूनदाखवला नाही, तर आपण असे जाहीर करू शकतो कीआता डाव्या विचारांना निर्णायकपणे कडेला ढकलण्यातआले आहे. सशस्त्र कम्युनिझमचा अंत होणे ही फक्तकाळाची गोष्ट होती. पण मुख्य प्रवाहातील डावेही कडेलागेले असतील, तर त्यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत.२००४ मध्ये ५३ लोकसभा जागांसह ते शिखरावर पोहोचलेहोते. त्यामागे फक्त एक भावनेची लाट होती : अमेरिकाविरोध. ते यूपीए सरकारपासून वेगळे झाले होते आणिअमेरिकेसोबतच्या अणुकराराच्या मुद्द्यावर भाजपसोबतहातमिळवणी करून त्या सरकारला पाडण्याचाही प्रयत्नकेला होता. त्यानंतर ते अधोगतीच्या मार्गावरच गेले. .१९८८ मध्ये मला हे पाहून आश्चर्य वाटले की बीजिंगआणि मॉस्कोमध्ये कम्युनिस्ट बदलत होते. पणकोलकात्यात नाही. या उत्सुकतेने मला कोलकात्यातआणले. मी माकपचे प्रदेश सचिव सरोज मुखर्जी यांनाविचारले होते : देंग व गोर्बाचेव्ह यांनी साम्यवाद बदलला.भारतातील कम्युनिस्ट सुधारणा का करत नाहीत? त्यांनीसांगितले : कारण माझा कम्युनिझम देंग, गोर्बाचेव्ह यांच्याकम्युनिझमपेक्षा अधिक शुद्ध आहे. जवळपास वीस वर्षांनंतर त्यांचे एक उत्तराधिकारी बुद्धदेबभट्टाचार्य यांनी बदलण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांनाविचारले होते की तुम्ही खासगी आणि विदेशीभांडवलाला आमंत्रण देत आहात. ते तुमच्याविचारधारेशी कसे जुळते. त्यांनी सांगितले होते : माझाविश्वास हीच माझी विचारधारा आहे. पण मी क्रांतिकारीसरकार चालवत नाही. मला संविधानानुसार काम करावेलागते. त्यांनी सिंगूर, नंदीग्राममध्ये औद्योगिक नगरउभारण्याची योजना केली होती. तिच्याविरोधातीलजनआंदोलन त्यांच्या स्वतःच्या कट्टर डाव्या कॉम्रेडांनीचालवले होते. त्यांनी भट्टाचार्य यांचे स्वप्न मोडले. त्यांच्यापक्षाला संपवले. ममता बॅनर्जी त्याला दफन करण्यासाठीउभ्या राहिल्या. भाजप त्या कबरीवर नवा महालउभारण्यात व्यग्र आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



