पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:यंदाच्या दिवाळीत ‘ग्रोथ’ आणि ‘गिव्हिंग’ सोबतच वाटचाल करूया

यावर्षी प्रकाशपर्वानिमित्त एका विचारावर मनन करूया. आपण दिव्यांची पूजा करतो. दिवे कधीही गोंधळ करत नाहीत. पण तो दिवा प्रज्वलित करणारे लोक या रात्री निसर्गाला भरपूर आवाज आणि धूर देतात. ते दिवे प्रज्वलित करणारे लोक आपणच आहोत. आता येथे विचार करूया की आपण कोणत्या प्रकाशाबद्दल बोलत आहोत? जगातील सर्वांत सुंदर प्रकाश म्हणजे सूर्यदेवांकडून सकाळी मिळणारा प्रकाश. संपूर्ण वर्षभर आपण सूर्याची पूजा करत नाही, त्याच्या प्रकाशाचा सन्मान करत नाही. बहुतेक लोक सूर्योदयानंतर उठतात. हाच सूर्यप्रकाशाचा अपमान आहे. आपल्याला विनामूल्य मिळणाऱ्या या संपत्तीचाही आपण त्याग करतो आणि या रात्री चार-पाच दिवे लावून प्रकाशाची पूजा केल्यासारखे मानतो. दिव्यांची पूजा केलीच पाहिजे, पण सूर्याचाही सन्मान केला पाहिजे. म्हणून यंदाच्या दिवाळीत ‘ग्रोथ’ आणि ‘गिव्हिंग’ हे दोन्ही एकत्र चालावेत, असा एक दिवाही प्रज्वलित करूया. भरपूर धन कमवा, पण वाढीव उत्पन्नातील एक हिस्सा ज्यांना त्याची खूप गरज आहे, त्यांना नक्की द्या.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *