जी बौद्धिक कामे पूर्वी फक्त माणसे करू शकत होती, तीआता ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय)करू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेआशा आणि चिंता या दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत.गमतीची गोष्ट म्हणजे, एजीआयचे फायदे आणि तोटे यांचेअत्यंत सूक्ष्म विश्लेषण ओपनएआयचे सीईओ सॅमआल्टमन यांनी केले आहे. आपल्या पोस्टमध्ये आल्टमनयांनी अशी शंका व्यक्त केली आहे, जी तंत्रज्ञानाबाबतआशावादी असलेल्या लोकांमध्ये कमीच पाहायला मिळते.त्यांनी लिहिले की, ‘एजीआयने मानवजातीला विश्वात भरभराटीची शक्ती द्यावी, अशी आमचीइच्छा आहे.’ पण त्याच वेळी त्यांनी हेही मान्य केले की, असे करण्यासाठी ‘मोठ्या जोखमींचा सामना’ करावा लागेल. ज्ञानोदय काळानंतर मानवतेमध्ये अंधश्रद्धा आणि कर्मठपणाच्या जागी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला आहे. वैज्ञानिक प्रगती नैसर्गिकरीत्या फायदेशीर असते, हाविश्वासही वाढला आहे. या विचारसरणीनुसार, अणुबॉम्बसारखे शोध विनाशकारी असले तरी, निसर्गाचीसखोल समज देणारे विज्ञान नक्कीच मानवाच्याकल्याणासाठी सक्षम आहे. मात्र, विज्ञानावरील अटळविश्वासही कधी‘कधी एक प्रकारची कर्मठ धारणा बनूशकतो, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. 2024 च्या एका शोधनिबंधात मी आणि यॉर्गेन वेइबुल यांनी‘गेम थिअरी’चा वापर करून या प्रवृत्तीचा अभ्यास केलाहोता. जेव्हा माणसे अशा अनिश्चित परिस्थितीतएकमेकांशी संवाद साधतात, जिथे एखाद्या व्यक्तीसाठीकाय योग्य आहे, हे समोरच्या व्यक्तीच्या निर्णयावरअवलंबून असते - तेव्हा एखादा नवीन वैज्ञानिक शोध‘प्रिझनर्स डिलेमा’ सारखी परिस्थिती निर्माण करू शकतो.यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक आणि तार्किक निर्णयशेवटी अशा परिणामांकडे नेतो, जे सर्वांसाठी वाईट ठरतात.एजीआयचा उदय ही अशीच एक घटना ठरू शकते. आणि म्हणूनच आल्टमन यांची शंका रास्त आहे. तेम्हणतात की, एजीआय प्रत्येक व्यक्तीला अविश्वसनीयक्षमता देऊ शकते, पण यामुळे गंभीर अपघात आणिसामाजिक गोंधळही निर्माण होऊ शकतो. अशा वेळी‘नॉलेज कर्स’चा (ज्ञानाचा शाप) धोका कमी करणे, हेमोठे आव्हान आहे. भविष्य अनिश्चित असल्याने, आपणविचारपूर्वक अंदाज वर्तवणे आणि सावधगिरीचे उपाययोजणे, हेच सर्वात उत्तम ठरेल. या आव्हानांना केवळखासगी क्षेत्राच्या भरवशावर सोडून चालणार नाही. यावरमात करण्यासाठी संसाधनांचे फेरवाटप आणि आंतरराष्ट्रीयसहकार्य यांची काही प्रमाणात गरज लागेल. कदाचित एजीआयचा सर्वात गंभीर परिणाम श्रमाचीमागणी कमी होणे हा असेल. पण याचा अर्थ असा नाही कीलोकांकडे करण्यासाठी काहीच उरणार नाही. खरं तर,लोक पूर्वीपेक्षा जास्त मोकळ्या वेळेचा आनंद घेऊशकतील. पण श्रमाची व्याख्या जर केवळ ‘पगारासाठीकेलेले काम’ अशी केली, तर एजीआय अशी दुनियानिर्माण करू शकते जिथे श्रम अनावश्यक ठरेल, कारणयंत्रे जवळपास प्रत्येक क्षेत्रात मानवापेक्षा चांगली कामगिरीकरतील. बहुतेक प्रौढ लोक आपल्या उत्पन्नासाठी कामावरअवलंबून असतात. त्यामुळे असा बदल अब्जावधीलोकांना उपजीविकेपासून वंचित करू शकतो. म्हणूनचआल्टमन यांनी ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ची(यूबीआय) वकिली केली आहे, जी प्रत्येक माणसालाकिमान जगण्याची हमी देईल. पण एजीआयचा प्रभावनोकऱ्या आणि उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन जागतिकहुकूमशाहीचा मार्गही मोकळा करू शकतो. जर याप्रणालींचे नियंत्रण काही मोजक्या लोकांच्या हातात राहिले,तर काही मोजके अब्जाधीश संपूर्ण मानवजातीवर अफाटसत्ता मिळवू शकतात. एजीआयपर्यंत सर्वांची पोहोचअसणे हा समस्या सोडवण्याचा केवळ एक भाग आहे. पैसाआणि सत्तेचे अति-केंद्रीकरण होणार नाही, हे सुनिश्चितकरणे तितकेच महत्त्वाचे आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) जर या प्रणालींचे नियंत्रण काही मोजक्यालोकांच्या हातात राहिले, तर काही मोजकेअब्जाधीश संपूर्ण मानवजातीवर अफाटसत्ता मिळवू शकतात. पैसा आणि सत्तेचेअति-केंद्रीकरण होणार नाही, हेसुनिश्चित करणेही महत्त्वाचे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
महाराष्ट्र
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




