जेव्हा जर्मन फुटबॉल खेळाडू डेनिस उन्दवने खेळाच्याशेवटच्या क्षणी दोन गोल करून आपल्या संघालाआयव्हरी कोस्टविरुद्ध 2-1 ने विजय मिळवून दिला, तेव्हातुम्हाला असे फार कमी जर्मन चाहते मिळतील, जे त्यालाराष्ट्रीय नायक मानत नाहीत. कुर्द-यहुदी आई-वडिलांच्याया तुर्की-सीरियन मुलाचे रूप पारंपरिक जर्मनसारखे नाही,याकडे फार कमी लोकांनी लक्ष दिले. परंतु, त्याने जर्मनटीमला एक थरारक विजय मिळवून दिला, ज्यावरून हेसिद्ध होते की, हा “सुंदर खेळ” इतर कोणत्याही खेळाच्यातुलनेत जागतिक स्तरावर इतके प्रेक्षक का मिळवतो.उन्दवचे यश हे कट्टरवाद्यांच्या तोंडावर मारलेलीचपराकही होती. तो आणि त्याचा संघ या गोष्टीचा जिवंतपुरावा आहेत की, अत्यंत भिन्न पार्श्वभूमी आणि रूप-रंगअसलेले लोक एका सामायिक उद्दिष्टासाठी एकत्र येऊशकतात आणि ते सामूहिक अभिमानाचे स्रोतही ठरूशकतात. ते दाखवून देतात की आपल्या देशावर प्रेम करणे(जे अनेकदा डाव्या विचारसरणीत विकृत स्वरूपातमांडले जाते किंवा फॅशनेबल मानले जात नाही) आणिनवीन लोकांचे स्वागत करणे (जे कट्टर दक्षिणपंथी लोकनापसंत करतात) हे एकमेकांच्या विरोधी विचार नाहीत. आणि हे केवळ जर्मन टीमपुरते मर्यादित नाही. या वेळीतीन देशांतर्गत संयुक्तपणे आयोजित केला जाणारा फिफाविश्वचषक, अब्जावधी प्रेक्षकांसमोर सातत्यानेवांशिकदृष्ट्या मिश्रित संघ सादर करत आहे.विश्वचषकातील प्रत्येक गंभीर दावेदार देश अशाखेळाडूंना मैदानात उतरवत आहे, ज्यांचे कुटुंब केवळएक किंवा दोन पिढ्यांपूर्वी तिथे आले होते, आणि असेअसूनही ते सर्वजण एक प्रसन्न देशभक्तीची लाट प्रेरितकरत आहेत. विविधता आणि राष्ट्रीय अभिमानाचे हे संयोजन अशी गोष्ट आहे, जिला राजकीय टोकाचीकट्टरता अशक्य मानते. औद्योगिकीकृत जगाच्या बहुतेक भागांत, मुख्य प्रवाहातील राजकारण हे सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या भिन्न लोकांचे आगमन आणि अशा स्थलांतरामुळे होणाऱ्या कथित असंतोषाबाबत चिंतेत बुडालेले असते. एका काळात इंटरनेटच्या अंधाऱ्या कोपऱ्यांपुरते मर्यादित असलेले विचार - जसे की “ग्रेट रिप्लेसमेंट सिद्धांत” आणि “री-इमिग्रेशन’ ची मागणी -आता सन्माननीय व्यासपीठांवर केले जात आहेत आणि त्यावर चर्चाही होत आहेत. एका ताज्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, 45% ब्रिटिश, 50% डॅनिश, 51%फ्रेंच, 53% जर्मन, 51% इटालियन, 52% पोलंड आणि46% स्पॅनिश लोक अशा परिस्थितीचे समर्थन करतील, ज्यात स्थलांतर रोखले जाईल आणि अलीकडे आलेले अनेक स्थलांतरित पुन्हा परत जातील. निश्चितपणे, वांशिक शुद्धीकरणासारख्या कठोरप्रक्रियेद्वारे स्थलांतरितांना बळजबरीने हाकलून देण्याच्यागोष्टींना मोठा पाठिंबा मिळेल, याचा कोणताही पुरावानाही. परंतु, असे इशारे देऊनही एक दशकापूर्वीच्यातुलनेत धक्कादायक बदल पाहायला मिळतो. एकादशकापूर्वी याच देशांतील अनेकांनी मध्य-पूर्वेतीलयुद्धापासून पळून येणाऱ्या स्थलांतरितांचे स्वागत केले होते. यादरम्यान, डाव्या विचारसरणीचा मोठा भागही प्रत्येकमुद्द्याला शोषक आणि शोषित यांच्या नजरेतूनपाहण्याच्या सवयीमुळे एका वेगळ्या, पण त्रासदायकदिशेने पुढे गेला आहे. या सरलीकृत दृष्टिकोनामुळेपाश्चात्त्य देश नेहमी खलनायक ठरतात आणि देशप्रेमालानेहमी संशयाने किंवा तिरस्काराने पाहिले पाहिजे, असेमानले जाते. हा बदल मतदानाच्या आकडेवारीतही दिसूनयेतो. गॅलपच्या मते, अमेरिकन असल्याचा अभिमानवाटणाऱ्या डेमोक्रॅट्सचे प्रमाण 2000 च्या दशकाच्यासुरुवातीला 60% पेक्षा जास्त होते, ते 2019 मध्ये केवळ22% वर आले आहे. या घसरणीचा मोठा हिस्सा डोनाल्डट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळाशी संबंधित आहे,ज्यावरून हे दिसून येते की हे सत्तेत बसलेल्या लोकांवरीलअसंतोष दर्शवते. तरीही, कल स्पष्ट आहेत. हे गुपित नाहीकी, अनेक डाव्या विचारसरणीच्या लोकांसाठी राष्ट्रीयअभिमानाची गोष्ट आता लाजिरवाणी बनली आहे. ही एक चिंताजनक प्रवृत्ती आहे, कारण सामायिकओळखीच्या आधाराशिवाय, वंचित लोकांचे समर्थनकरण्यासाठी बनवलेल्या धोरणांभोवती राजकारणएकवटण्याची शक्यता कमी होते. यामध्ये महाविद्यालयीनपदवी नसलेल्या कामगारांचाही समावेश आहे, जेऔद्योगिकीकृत जगात अनेक दशकांपासून संघर्ष करतआहेत. अर्थात, व्यावसायिक ॲथलेटिक्स हे समाजाचा एकआदर्श आरसा नाही. कोणताही राष्ट्रीय संघ हा एकछोटा, संसाधनेसंपन्न आणि अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केलेला गट असतो, जो सामना जिंकण्याच्यास्पष्ट लक्ष्याने एकत्र असतो. एक विजयी संघ बनवणे, हेमोठ्या लोकसंख्येला घरे, शाळा आणि श्रम बाजारातएकत्र करण्यासारखे नाही. खेळांमध्येही एकत्रीकरणइतके सहज राहिलेले नाही. युरो 2020 चा अंतिम सामना हरल्यानंतर इंग्लंडच्याकृष्णवर्णीय खेळाडूंना वर्णद्वेषी शिवीगाळ करण्यात आलीहोती. फ्रान्सच्या राष्ट्रीय संघाला नेहमीच या वादातओढले जाते की, त्यात कोण खरोखर फ्रेंच आहे काआणि अमेरिकेत तर अनेक खेळांमध्ये वर्णद्वेषाचा एककाळा इतिहास राहिला आहे. एकत्रीकरणाचा आनंदअनेक लोक साजरा करू शकतात, परंतु अल्गोरिदमद्वारेसशक्त झालेले आवाज आज खूप सशक्त आणिप्रमाणानुसार प्रभावशाली झाले आहेत. या अर्थाने, खेळहीसमाजात दिसणाऱ्या पॅटर्नचीच नक्कल करतात. विश्वचषक हे सिद्ध करत नाही की, वेगवेगळ्यापार्श्वभूमीच्या लोकांना एका सूत्रात बांधणे सोपे आहे.परंतु, तो त्या गोष्टीची पुष्टी नक्कीच करतो, जिलाकट्टरपंथी नाकारू इच्छित आहेत आणि ती म्हणजेवांशिक एकता आणि देशाचा अभिमान नियमितपणेएकत्र राहू शकतात. आपल्या बहुवांशिक टीमला राष्ट्रीयध्वज उंचावताना पाहणारे बहुतांश चाहते कोणत्याहीलाघवाशिवाय या सत्याचा अनुभव घेतात. जर कट्टर दक्षिणपंथी आणि डावे यांनी आपला अहंकारथोड्या काळासाठी बाजूला ठेवून विश्वचषकाचे काहीसामने पाहिले, तर ते त्या गोष्टीचा पुन्हा शोध घेऊशकतात, जी आपल्याला आधीच माहीत आहे. ती ही की,जेव्हा एकता आणि राष्ट्रीय अभिमान एकत्र चालतात,तेव्हा बहुतेक प्रकरणांत निकाल विजय मिळवून देणाराचअसतो! (@प्रोजेक्ट सिंडिकेट) आपल्या देशावर प्रेम आणि भिन्नओळख असलेल्यांचे स्वागतहे खरे आहे की, कोणताही विश्वचषक हे सिद्ध करूशकत नाही की, वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांना एकासूत्रात बांधणे सोपे आहे. परंतु, हे निश्चितपणे सिद्ध करतोकी वांशिक एकता आणि देशाचा अभिमान एकत्र राहूशकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: यूजीसी-नेट परीक्षेच्या निकालाला उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढली चिंता; करिअर आणि पीएचडी प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर
- पुणे: नाशिक महामार्गावर भीषण अपघात; अनियंत्रित कंटेनर दुभाजक तोडून ट्रकला धडकला, कारही चिरडली; महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी!
- पुणे: तातडीच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद, तर शुक्रवारी येणार कमी दाबाने पाणी
- मुंबई: एकाच ॲपवर एसटी, ऑटो आणि टॅक्सीची सुविधा; महाराष्ट्र शासनाच्या 'छावा राईड' ॲप लाँचच्या दिशेने मोठे पाऊल, निविदा प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- पुणे: यूजीसी-नेट परीक्षेच्या निकालाला उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढली चिंता; करिअर आणि पीएचडी प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर
- पुणे: नाशिक महामार्गावर भीषण अपघात; अनियंत्रित कंटेनर दुभाजक तोडून ट्रकला धडकला, कारही चिरडली; महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी!
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रसिद्ध धबधबा पर्यटकांसाठी बंद, आता केवळ रस्त्यावरूनच घेता येणार आनंद
गुन्हा
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज


























Subscribe to my channel




