
Baramati Lok Sabha : बारामती म्हटलं की पवार अन् पवार म्हटलं की बारामती... हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात रुजलेलं आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी शरद पवारांपासून दूर जायचा निर्णय घेतला. महायुतीत दाखल झाल्यानंतरअजित पवारांनी बारामती मतदारसंघावर दावा ठोकलाय. नुकत्याच बारामतीमधील सभेत अजित पवार यांनी मी दिलेला उमेदवार निवडून द्या, अशी भावनिक साद दिली. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार उमेदवार देणार यावर शिक्कमोर्तब झालं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार मैदानात उतरणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. नणंद भावजय असा सामना बारामतीमध्ये रंगण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं. सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, पण अजितदादांविरोधात बोलत राहील, असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, पण.... रोहित पवार
आंबेगावमध्ये शरद पवार कार्यकर्त्यांन संबोधित करणार आहेत. त्या सभेला रोहित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्याशिवाय बारामतीमध्ये काकी विरुद्ध आत्या अशी लढत झाली तर सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, असेही सांगितलं. रोहित पवार म्हणाले की, बारामती लोकसभेत सुनेत्रा काकींविरुद्ध आत्या अशी लढत झालीच. तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आतापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी होणार आहे, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असे रोहित पवार म्हणाले.
|
Hingoli News : रेणापूरमध्ये विषबाधा; 150 भाविक हिंगाेली रुग्णालयात दाखल |
रोहित पवारांचा अजित पवारांना टोला -
अजित दादा सध्या कुटुंबात एकटे आहेत, असं चित्र आहे. पण ते सध्या ते स्वतःसाठी आणि मलिदा गॅंग साठी बोलतात, असा टोलाही यावेळी रोहित पवार यांनी लगावला. त्याशिवाय युगेंद्र पवार म्हणत असतील 'शरद पवार साहेब तसं', म्हणजे याचं स्वागत करायला हवं. आमच्या सारख्या बच्चाला हे कळतंय, साहेबांना साथ देण्याची गरज आहे, असे म्हणत अजित पवारांना टोला लगावला.
पार्थ पवार शिरुरमध्ये लढणार ?
प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "मी पुन्हा येईन नंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणतात. आता अमोल कोल्हे यांच्याविरोधात पार्थ पवार ही असू शकतात. मात्र अजित दादांना महायुतीत चार जागा मिळतील, पण त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही. " दरम्यान, महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील शुरुर आणि बारामती मतदारसंघावर दावा केला होता, तो दावा आजही कायम आहे. पुढील काही दिवसांत महायुतीमध्ये जागावटपाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर कुणाला किती जागा याबाबत समोर येईल.
शहर
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
महाराष्ट्र
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गुन्हा
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान






















Subscribe to my channel


