नाशिक: त्र्यंबकेश्वर येथे पार पडणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्वाच्या निमित्ताने एक ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळा आयोजित केला जात आहे. कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशीच सायंकाळी नाशिकमधील ऐतिहासिक रामकुंड परिसरात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल ६,५०० आदिवासी बांधवांच्या सहभागातून भव्य 'महा गोदा आरती' पार पडणार आहे. या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून एक नवीन जागतिक विश्वविक्रम (World Record) नोंदवण्याचे नियोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक तयारीमुळे संपूर्ण नाशिक शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा अधिकृत शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी असणार आहे. याच दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न होईल. या सोहळ्यासाठी आणि गोदातीरावरील महा आरतीसाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. धर्मध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता रामकुंड परिसरात महा गोदा आरतीचा अत्यंत भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यापूर्वी गोदावरी नदीच्या आरतीमध्ये जास्तीत जास्त १४०० जणांनी सहभाग घेतल्याची नोंद आहे, परंतु आता हा विक्रम मोडत तब्बल साडेसहा हजार जणांच्या सहभागातून हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे आणि विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचे नियोजन कुंभमेळा प्राधिकरणाकडून केले जात आहे. अनंत विजय शंखनाद संस्था, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पुरोहित संघ यांच्या सहकार्याने शंखनाद व महा गोदा आरती असे दोन महत्त्वाचे विश्वविक्रम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आदिवासी बांधवांचा सहभाग आणि विशेष प्रशिक्षण: या महा गोदा आरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड यांसह एकूण सात तालुक्यांमधील तब्बल ६५५ गाव-पाड्यांमधून ६,५०० आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. प्रत्येक गावातून सहा पुरुष आणि चार महिला याप्रमाणे हा सहभाग निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या सर्व आदिवासी बांधवांना गेल्या तीन महिन्यांपासून तज्ज्ञांमार्फत आरतीचे व वादनाचे पद्धतशीर प्रशिक्षण दिले जात आहे.
हिंदू संस्कृतीतील निसर्गपूजनाची समृद्ध परंपरा, आदिवासी समाजाचा गौरव, गोदावरी नदीचे संवर्धन आणि सामाजिक समरसता या महत्त्वाच्या उद्देशांना डो пеसमोर ठेवून हा उपक्रम राबविला जात आहे. या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा आणि जलस्रोतांच्या रक्षणाचा संदेश देशपातळीवर देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. गोदावरीसह स्थानिक नद्या, तलाव आणि पारंपरिक जलस्रोतांचे संरक्षण करणे, पाण्याचे प्रदूषण रोखणे याबाबत जनजागृती केली जाणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या आदिवासी बांधवांच्या राहण्याची, खानपानाची आणि कपडे बदलण्याची स्वतंत्र सोय के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आली असून, राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेचा आणि राजशिष्टाचाराचा चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस व प्रशासन सज्ज झाले आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel





The bonuses they offer for new members are actually legit. Had a great run last weekend and the customer support was super helpful. Check out vnzi88 for some quality action.