पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात एका २१ वर्षीय तरुणाने आपण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस (IAS) अधिकारी झाल्याचे भासवून उच्चभ्रू सोसायटीतील नागरिकांची तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी हितेश प्रमोद कुलकर्णी (वय २१, रा. फ्लॅट नंबर ६०४, डी विंग, ५१ बी इनक्लुजीव्ह को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बालेवाडी हायस्ट्रीट जवळ) या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी दत्तात्रय वैजनाथ नागरगोजे (वय ३१) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, आरोपी हितेश कुलकर्णी याने आपण केंद्र शासनात आयएएस अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून परिसरातील आणि सोसायटीतील नागरिकांचा पूर्ण विश्वास संपादन केला. याचाच गैरफायदा घेत त्याने सोसायटीतील विक्री न झालेल्या फ्लॅटची 'लॉटरी' पद्धतीने स्वस्त किंवा सुलभ किमतीत विक्री करून देण्याचे मोठे आमिष नागरिकांना दाखवले. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी त्याच्याकडे पैशांची देवाणघेवाण केली. इतकेच नव्हे तर, सोसायटीचा चेअरमन पदावर असताना त्याने आपल्या पदाचा गैरवापर केला.
या फसवणुकीच्या प्रकारात आरोपीने सोसायटीच्या सभासद पूजा जाधव आणि फिर्याददार दत्तात्रय नागरगोजे यांच्या खोट्या व बनावट सह्या केल्या. या बनावट सह्यांद्वारे तयार केलेली ना-देय (No Dues) प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे बँकेत सादर केली. या कागदपत्रांच्या आधारे त्याने सोसायटीच्या बँक खात्याची ऑनलाइन बँकिंग सुविधा अनधिकृतपणे सुरू करून घेतली.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सोसायटीच्या बँक खात्यातील सुमारे ३७ लाख रुपयांच्या मुदत ठेवीवर (FD) परस्पर १० लाख रुपयांचे कर्ज काढले. तसेच सोसायटीची एफडी मोडत खात्यातील लाखो रुपये स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने वळवून घेतले. या संपूर्ण कारस्थानामुळे उच्चभ्रू सोसायटीतील सभासदांची एकूण ३५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर गुन्ह्याची नोंद घेत बाणेर पोलिसांनी आरोपी हितेश कुलकर्णी याला तात्काळ अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शहर
- पुणे: HCMTR प्रकल्पासाठी सेनापती बापट रस्त्यावरील झाडं आणि घरं पाडणार? पुणे महानगरपालिकेने दिली महत्त्वाची स्पष्टोक्ती
- नागपूर: पोलिसांचा मोठा दणका! प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या ७८ चकऱ्या जप्त, एक जण जेरबंद
- नाशिक: मुंबई-ठाण्यातील जुगाऱ्यांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात अड्डा; पोलिसांनी वेशांतर करून टाकलेल्या छाप्यात १३ जण जेरबंद
- नाशिक: रामकुंडावर छठपूजेसाठी ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्यांना मोठा दणका; नाशिक महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
महाराष्ट्र
- जळगाव: धरणगाव रेल्वे स्थानकाचा इतिहास थक्क करणारा; १२६ वर्षांनंतर अमृत भारत योजनेतून होणार आधुनिक कायापालट
- नागपूर: पोलिसांचा मोठा दणका! प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या ७८ चकऱ्या जप्त, एक जण जेरबंद
- नाशिक: मुंबई-ठाण्यातील जुगाऱ्यांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात अड्डा; पोलिसांनी वेशांतर करून टाकलेल्या छाप्यात १३ जण जेरबंद
- नाशिक: रामकुंडावर छठपूजेसाठी ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्यांना मोठा दणका; नाशिक महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
गुन्हा
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना
- नवी दिल्ली: पाठिंब्याबाबत शरद पवार गटाच्या संकेतांमुळे NDAला मिळाले बळ; संसदेत १० ते १५ मते अधिक मिळण्याची शक्यता
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन

























Subscribe to my channel



