मुंबई: जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे म्हणजेच मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून लोकल प्रवासादरम्यान हाणामारी आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असतानाच, आता अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. चालत्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट चाकूहल्ल्यात झाले, मात्र संतापजनक बाब म्हणजे या भांडणात फेकलेला चाकू त्या दोघांना न लागता एका तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या थेट छातीत घुसला. या हल्ल्यात संबंधित प्रवासी गंभीर जखमी झाला असून, रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विरारहून चर्चगेटकडे जाणारी फास्ट लोकल अंधेरी स्थानकातून सुटल्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेत धारावी येथील रहिवासी असलेले सुरेश शर्मा (वय ५३) हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर चाकू फेकून मारल्याप्रकरणी शिवा गायकवाड (वय २५) या तरुणाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी जखमी सुरेश शर्मा हे आपल्या एका वैयक्तिक कामासाठी बोरिवलीला गेले होते. काम आटोपून ते विरार-चर्चगेट फास्ट लोकलने आपल्या घरी परतत होते.
प्रवासादरम्यान डब्यातील इतर दोन प्रवाशांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. भांडण विकोपाला जात असतानाच त्यातील एक प्रवासी (आरोपी शिवा गायकवाड) अंधेरी रेल्वे स्थानकात उतरला. मात्र, त्याच्या डोक्यात राग कायम होता. अंधेरी स्थानकातून लोकल सुटताच त्याने फलाटावरून धावत येऊन ज्या प्रवाशासोबत भांडण झाले होते, त्याच्या दिशेने आपल्याजवळील धारदार चाकू जोरात फेकून मारला. दुर्दैवाने, निशाणा चुकल्याने तो चाकू डब्यात प्रवास करणाऱ्या सुरेश शर्मा यांच्या थेट छातीत जाऊन घुसला.
छातीत चाकू घुसल्याने शर्मा यांना खोलवर जखम झाली आणि त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. डब्यातील सहप्रवाशांनी तात्काळ प्रसंगावधान राखत लोकलची आपत्कालीन साखळी ओढली. साखळी ओढल्यामुळे रविवारी दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी ही विरार-चर्चगेट फास्ट लोकल वांद्रे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर थांबली. रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांनी गाडी का थांबली याची तपासणी सुरू केली असता, डब्यात सुरेश शर्मा रक्ताच्या थारोळ्यात आणि छातीला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
जखमी सुरेश शर्मा यांच्यावर वांद्रे स्थानकावरच तात्काळ प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना तातडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत चाकू फेकणाऱ्या आरोपी शिवा गायकवाड याला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी वांद्रे रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
शहर
- पुणे: आईचा विनयभंग केल्याचा बदला; तरुणाने रस्त्यात गाठून केली ३१ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या, दौंड तालुक्यातील घटना!
- पुणे: टिंबर मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आगीचे तांडव; ५० ते ६० लाकडाची दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही!
- पुणे: भक्तीचा महासागर! प.पू. श्री शंकर महाराजांच्या प्रगटदिन सोहळ्याला उत्साहात सुरुवात, दिवसभर दर्शनासाठी उसळली अलोट गर्दी
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र
- पुणे: एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या २५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा रौप्यमहोत्सव; भव्य मॅग्निफिकेशन मास्टरक्लासने झाली सोहळ्याची शानदार सुरुवात!
- पुणे: आईचा विनयभंग केल्याचा बदला; तरुणाने रस्त्यात गाठून केली ३१ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या, दौंड तालुक्यातील घटना!
- पुणे: टिंबर मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आगीचे तांडव; ५० ते ६० लाकडाची दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही!
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



