सातारा: दिवाळीचा आनंद साजरा करताना घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने फलटण शहरातील सोमवार पेठ परिसरावर शोककळा पसरली आहे. बुधवारी (दि. ११) दुपारी फटाके फोडताना फटाक्यांच्या पिशवीत पेटत्या फटाक्याची ठिणगी पडल्याने लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजलेल्या दीड वर्षाच्या समर विशाल पवार या चिमुकल्याचा पुण्यात उपचार सुरू असताना सोमवारी (दि. १६) दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आसपासची मुले फटाके फोडताना दीड वर्षाचा समर त्याच्या घरातील फटाक्यांची पिशवी घेऊन दारात बसला होता. त्यावेळी समरच्या एका हातात फटाक्यांनी भरलेली पिशवी होती, तर दुसऱ्या हातात फटाके पेटवण्यासाठी वापरण्यात येणारी तारक होती. याचदरम्यान पेटत्या तारकेची ठिणगी चुकून फटाक्यांनी भरलेल्या पिशवीत पडली. त्यामुळे पिशवीतील फटाक्यांनी पेट घेतला आणि क्षणार्धात आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत समर ९० टक्क्यांहून अधिक होरपळला.
मृत्युशी झुंज अपयशी
दुर्घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या समरला तातडीने उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज सोमवारी अपयशी ठरली.
आई-वडील बाजारात
समरचे आई-वडील बाजारात गेले होते. इतर नातेवाईकही दिवाळीच्या लगबगीत दंग होते. फटाक्यांची आग भडकल्यामुळे नातेवाईकांना समरपर्यंत पोहोचता आले नाही. काही वेळातच तो ९० टक्के जखमी झाला.
खबरदारी आवश्यक
फटाके फोडताना आवश्यक ती खबरदारी घेणे आणि लहान मुलांना फटाक्यांपासून सुरक्षित अंतरावर ठेवणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना आहे.
शहर
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
- पुणे: पुण्यात खोटा आयएएस अधिकारी असल्याचा बनाव; २१ वर्षीय तरुणाने उच्चभ्रू सोसायटीला गंडवले ३५ लाख
- मुंबई: हुतात्मा दिनी राज्यातील रेल्वे स्थानकांवर वाजवा महाराष्ट्र गीत; मराठी अभ्यास केंद्राचे मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला निवेदन
- पुणे: HCMTR प्रकल्पासाठी सेनापती बापट रस्त्यावरील झाडं आणि घरं पाडणार? पुणे महानगरपालिकेने दिली महत्त्वाची स्पष्टोक्ती
महाराष्ट्र
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
- पुणे: पुण्यात खोटा आयएएस अधिकारी असल्याचा बनाव; २१ वर्षीय तरुणाने उच्चभ्रू सोसायटीला गंडवले ३५ लाख
- मुंबई: हुतात्मा दिनी राज्यातील रेल्वे स्थानकांवर वाजवा महाराष्ट्र गीत; मराठी अभ्यास केंद्राचे मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला निवेदन
- जळगाव: धरणगाव रेल्वे स्थानकाचा इतिहास थक्क करणारा; १२६ वर्षांनंतर अमृत भारत योजनेतून होणार आधुनिक कायापालट
गुन्हा
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना
- नवी दिल्ली: पाठिंब्याबाबत शरद पवार गटाच्या संकेतांमुळे NDAला मिळाले बळ; संसदेत १० ते १५ मते अधिक मिळण्याची शक्यता
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन


























Subscribe to my channel



