बहुतेक पालक, ते उच्चशिक्षित असोत वा नसोत, मुलांना नेहमी समजावतात की, ‘चांगल्या संस्कारांसाठी काहीच खर्च करावा लागत नाही.’ पण अलीकडेच जेन-झीमधील एका तरुणाने मला शिकवले की, ‘हे विनम्र शब्द वापरण्याची किंमत कदाचित पृथ्वीला मोजावी लागत असेल.’ याचा अर्थ काय, असा प्रश्न पडला असेल तर पुढे वाचा. हा धडा मला सहज मिळाला नाही. एका सार्वजनिक ठिकाणी उभा असताना मी एका जेन-झीमधील तरुणाला ऑटोरिक्षाचे भाडे देण्यासाठी मदत केली. त्याच्याकडे सुटे पैसे नव्हते म्हणून मी त्याला पैसे दिले. कारण ऑटोचालकाकडे डिजिटल पेमेंटची सुविधा नव्हती. पैसे दिल्यानंतर तो तरुण ‘थँक यू’ न म्हणताच निघून गेला. मी त्याला ऐकू जाईल अशा थोड्या मोठ्या आवाजात माझ्या मित्राला म्हणालो, ‘पाहा, आजची पिढी साधा शिष्टाचारही विसरली आहे. तो ‘थँक यू’ सुद्धा म्हणू शकत नाही का?’ हे ऐकताच तो तरुण लगेच मागे वळला आणि परत येऊन म्हणाला, ‘थँक यू, काका. हा मुद्दा हेतूचा नाही. हळूहळू ‘थँक यू’ किंवा ‘प्लीज’ न म्हणण्याची सवय लागते आहे. खरे तर मी विसरलो होतो की, मी एखाद्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी नव्हे, तर माणसाशी बोलत होतो.’ मी त्याला म्हटले, ‘माफ कर, मला समजले नाही.’ त्यावर त्याने एक रंजक स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला की, आमच्या पिढीला पालकांनी अनेक वर्षे शिकवलेल्या सवयी आता सोडणे कठीण जात आहे. तो हसत म्हणाला, ‘तुमच्या पिढीने आम्हाला इतके चांगले संस्कार दिले की, पाळीव कुत्र्यालाही खायला देताना ‘प्लीज’ म्हणायचे आणि घरात मदत करणाऱ्या व्यक्तीने पाण्याचा ग्लास दिला तरी ‘थँक यू’ म्हणायचे. पण आता ह्याच सवयी चॅटजीपीटी, जेमिनी आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबॉट्सशी बोलतानाही कायम राहतात. मात्र प्रत्येक अतिरिक्त शब्द म्हणजे अधिक प्रक्रिया म्हणजेच अधिक वीज वापर व पर्यावरणावर अधिक परिणाम.’ आश्चर्य म्हणजे त्याच्या म्हणण्यात तथ्य होते.संयुक्त राष्ट्रांच्या एका ताज्या अहवालातही हीच चिंता व्यक्त केली गेली. त्यानुसार एखाद्या व्यक्तीने कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारलेल्या प्रश्नात ‘प्लीज’ किंवा ‘थँक यू’ जोडल्याने स्वतंत्रपणे फारसा परिणाम होत नाही. पण हेच रोज अब्जावधी कृत्रिम बुद्धिमत्ता संवादांमध्ये घडले तर त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षणीय ठरतो. चॅटजीपीटीच्या वापराच्या आकडेवारीवर आधारित या अहवालानुसार, प्रश्नातून केवळ ‘प्लीज’ हा शब्द काढून टाकल्यास वर्षाला सुमारे १.८ गिगावॅट-तास वीज वाचू शकते. अद्याप कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्या प्रश्नांवर प्रक्रिया करण्यासाठी किती वीज खर्च करतात किंवा किती प्रश्न ‘प्लीज’ने सुरू होतात याची सार्वजनिक आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार चॅटजीपीटीवरील एका सरासरी विनंतीसाठी सुमारे ०.४२ वॅट-तास वीज खर्च होते. ही ऊर्जा १० वॅटचा एलईडी दिवा सुमारे अडीच मिनिटे पेटवून ठेवण्यासाठी पुरेशी आहे. जागतिक स्तरावर हा आकडा आणखी मोठा आहे. केवळ चॅटजीपीटीवरच दररोज अंदाजे २.५ अब्जांहून अधिक प्रश्न प्रक्रिया केले जातात. त्यात जेमिनी, क्लॉड, कोपायलट आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींवरील विनंत्यांची भर घातली तर हा आकडा आणखी मोठा होतो. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रश्नामधील अगदी छोटी बचतही एकत्रितपणे मोठा फायदा देऊ शकते. येथे या कथेला आणखी एक रंजक वळण मिळते. टेकरडारने अमेरिका आणि ब्रिटनमधील एक हजार लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले की, ७१ टक्के ब्रिटिश वापरकर्ते कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबॉट्सशी बोलताना विनम्र भाषा वापरतात. अमेरिकेत हा आकडा ६७ टक्के होता. त्यांना विचारले की या यंत्रांना शिष्टाचार अपेक्षित नसताना त्यांच्याशी ते नम्रपणे का बोलतात तेव्हा अनेकांनी गमतीने उत्तर दिले की, भविष्यात ‘रोबोट बंड’ झाले तर आधीपासूनच चांगले संबंध ठेवलेले बरे. ही चर्चा तेव्हा अधिक गाजली. समाजमाध्यमांवर ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना विचारले की, वापरकर्त्यांनी वारंवार ‘प्लीज’ आणि ‘थँक यू’ लिहिल्यामुळे कंपनीला किती आर्थिक भार सहन करावा लागला? त्यावर त्यांचे लक्षवेधी उत्तर होते,‘कदाचित काही कोटी डॉलर योग्य कारणासाठी खर्च झाले असतील.’ फंडा असा की, शिष्टाचाराचे धडे देण्यासाठी आपण इतकी मेहनत घेतली. त्याचा मुलांना कधी विसर पडला तरी काळजी करू नका. कदाचित ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगाशी स्वतःला जुळवून घेत असतील. आणि कदाचित एखाद्या दिवशी ते असे छोटे, नम्र शब्दही तयार करतील की ते वीज बचत आणि पृथ्वीचे संरक्षणही करतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



