
Kalyan Crime : भंगार चोरल्याच्या कारणावरून एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण बसस्थानक परिसरात घडली आहे. या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी खाजगी कंपनीच्या चार सुरक्षा रक्षकांना अटक करत पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याण स्टेशन समोरील जुन्यी एसटी स्टँड स्मार्ट सिटी अंतर्गत विकसीत करण्याचे काम सुरु आहे. हे काम एका खाजगी कंपनीला दिले आहे. बसस्थानकाच्या विकास कामासाठी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे. काही दिवसापासून या परिसरात भंगार चोरले जात असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले होते. यामुळे सुरक्षा रक्षक पाळत ठेवून त्या चोरट्याच्या मागावर होते. दरम्यान दोन दिवसापूर्वी कल्याण स्टेशन परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.
|
Gondia Accident : महामार्गावर भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; एकाच जागीच मृत्यू, १५ वर्षीय युवक गंभीर |
तरुण कोण आहे? त्याच्या मृत्यूचे कारण याचा तपास महात्मा फुले पोलिसांकडून करण्यात येत होता. या प्रकरणी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरुअसताना महात्मा फुले पोलिसांनी बसस्थानक परिसरातील विकास कामावर देखरेखीसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्या मृत तरुणाने भंगार चोरले होते म्हणून त्याला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. राजू सिंग असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी सुरक्षा रक्षक इम्रान शेख, परमेश्वर धाहिजे, लहू धाडी आणि कृष्णा साबळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी जात तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत मृतदेह शवच्छेदनासाठी पाठवला.
शहर
- मुंबई: महापालिकेच्या कॅन्टीन मध्ये ताकाच्या ग्लासात माशी अन् भजीत सापडला प्लास्टिकचा धागा; संतापजनक प्रकार उघड
- मुंबई: फोनवर बोलण्यासाठी गेला आणि थेट खाली कोसळला; कांजूरमार्गमध्ये मजुराचा मृत्यू, पोलिसांकडून गुन्हा दाखल
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- मुंबई: 'खिशात फक्त २०० रुपये, उपचार कसे करू?' अपघातानंतर जखमी हतबल; बस व्हिडिओ गेमसारख्या वेगात चालवल्याचा दावा
महाराष्ट्र
- मुंबई: महापालिकेच्या कॅन्टीन मध्ये ताकाच्या ग्लासात माशी अन् भजीत सापडला प्लास्टिकचा धागा; संतापजनक प्रकार उघड
- मुंबई: फोनवर बोलण्यासाठी गेला आणि थेट खाली कोसळला; कांजूरमार्गमध्ये मजुराचा मृत्यू, पोलिसांकडून गुन्हा दाखल
- वर्धा: 'आता मी कुणाशी खेळणार?' समृद्धीवरील अपघातात आई-वडिलांसह जुळ्या बहिणीला गमावलं; तन्वीच्या प्रश्नापुढे सारेच अबोल
- मुंबई: 'खिशात फक्त २०० रुपये, उपचार कसे करू?' अपघातानंतर जखमी हतबल; बस व्हिडिओ गेमसारख्या वेगात चालवल्याचा दावा
गुन्हा
- पुणे: महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघा मित्रांकडून लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या धमकीमुळे खळबळ, चारही आरोपी जेबेबंद
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- बार्शीत मन हेलावणारी घटना! १० महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून; जन्मदाती मृतदेह खांद्यावर घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल"
- जळगाव: समोर आला 'सायबर क्राईम हॉटस्पॉट'; १ कोटी ३० लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
- उत्तर प्रदेश: बिजनौरमध्ये राजस्थानच्या नवदंम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; सामूहिक बलात्काराचा कुटुंबाचा गंभीर आरोप



























Subscribe to my channel


