
Mumbai : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून गेल्या वर्षी निर्दोष मुक्तता झालेले भारतीय लष्करातील अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लष्कराने त्यांना या वरिष्ठ पदासाठी पात्र ठरवले असून, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पदोन्नतीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुमारे 17 वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नेमकं काय होतं प्रकरण?
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील भिक्खू चौक परिसरात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर 95 जण जखमी झाले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) कर्नल पुरोहित यांना अटक केली होती. दहशतवादाशी संबंधित आरोपांखाली अटक झालेले ते पहिलेच कार्यरत लष्करी अधिकारी होते.
2011 मध्ये या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे सोपवण्यात आला. अखेर जुलै 2025 मध्ये विशेष NIA न्यायालयाने पुराव्याअभावी कर्नल पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर पाच जणांची सर्व आरोपांतून मुक्तता केली.
न्यायाधिकरणाचा हस्तक्षेप
कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी निवृत्त होणार होते. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे पदोन्नती आणि सेवाविषयक लाभ रोखले गेल्याचा मुद्दा त्यांनी सशस्त्र सेना न्यायाधिकरणासमोर मांडला होता.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधिकरणाने त्यांच्या निवृत्तीला स्थगिती देत संरक्षण मंत्रालयाला पदोन्नतीबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले. या कायदेशीर हस्तक्षेपानंतर त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
तुरुंगवास आणि लष्करी कारकीर्द
या प्रकरणात कर्नल पुरोहित यांनी सुमारे नऊ वर्षे न्यायालयीन कोठडीत घालवली होती. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. अटकेच्या वेळी ते लष्करी गुप्तचर विभागात कार्यरत होते.
निर्दोष मुक्ततेनंतर लष्कराने त्यांना पदोन्नतीसाठी पात्र ठरवल्याने त्यांच्या सेवा ज्येष्ठतेसह लष्करी नियमांनुसार मिळणाऱ्या लाभांचा प्रश्नही आता मार्गी लागला आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




