‘शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो... तुमच्यापैकी प्रत्येकाप्रमाणेच दरवर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान हजारो विद्यार्थी आपल्या पाठीवरील बॅगपेक्षा कितीतरी मोठे ओझे घेऊन विद्यापीठात प्रवेश करतात. कधी वर्गात बसण्याची संधीच मिळाली नाही, अशा पालकांची स्वप्ने घेऊन काहीजण येतात. आजवर कुणीही पदवीदानाचा गाऊन परिधान केला नाही अशा कुटुंबातील काही जण असतात. अनेक जण स्वतः न निवडलेलीही जबाबदारी घेऊन आलेले असतात. तुमच्यापैकी कुणाचीही अशीच परिस्थिती असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही केवळ पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली नसते. तुम्ही आपल्या कुटुंबाच्या इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहात.’ इंदूरमध्ये गुरुवारी सकाळी मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात अशाच शब्दांत केली. मी विद्यार्थ्यांना विचारले, ‘तुमच्यापैकी कुटुंबात प्रथमच पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे किती जण आहेत?’ तेव्हा अनेकांनी हात वर केले. त्यानंतर मी त्यांना एका व्यक्तीची कथा सांगितली. त्यांचा जन्म तामिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यातील एका छोट्या शेतकरी कुटुंबात झाला होता. त्या कुटुंबासाठी महत्त्वाकांक्षेपेक्षा जगणे अधिक महत्त्वाचे होते. त्यांचे वडील पहिलीनंतरच शाळा सोडून गेले होते. आई कधीच शाळेत गेली नव्हती. तिला नोटा मोजतानाही अडचण येत असे. घरात पुस्तके नव्हती. वीज नव्हती. मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. बीजगणित, भौतिकशास्त्र किंवा करिअरची निवड याविषयी समजावून सांगणारेही घरात कोणी नव्हते, कारण त्या वाटेवर आधी कुणी चाललेच नव्हते. त्यांनी कोणत्याही शिकवणीशिवाय आणि कौटुंबिक मदतीशिवाय सरकारी शाळेत शिक्षण घेतले. प्रवेश परीक्षा देण्यासाठी ते मद्रास (आताचे चेन्नई) येथे गेले. तेव्हा शिक्षकांनी त्यांना सांगितले, ‘परीक्षेवर लक्ष केंद्रित कर, इतरांच्या कपड्यांकडे नाही.’ त्यांनी तसेच केले आणि परतले. काही आठवड्यांनी एका रात्री रॉकेलचा दिवा विझल्यानंतर आई म्हणाली, ‘तुझ्यासाठी एक पत्र आले होते. ते छपराखालील बांबूमध्ये ठेवले आहे.’ त्यांनी पत्र उघडले, तर ते मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील ऑटोमोबाइल अभियांत्रिकीच्या प्रवेशाचे पत्र होते. पुढे हाच पहिल्या पिढीतील पदवीधर आर. वेलुसामी ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे अध्यक्ष बनले. आज वेलुसामी हजारो कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतात. ते देशभर लोकप्रिय असलेल्या स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही-300, एक्सयूव्ही-700 आणि थार रॉक्ससारख्या गाड्या तयार करतात. आता 2026 मध्ये येऊया. आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील बिशू लिम्बूने घरात विश्वासार्ह वीज किंवा इंटरनेट नसल्याने रॉकेलच्या दिव्याच्या मंद प्रकाशात नीट परीक्षेची तयारी केली. त्यांचे वडील छोटे शेतकरी आहेत. आई प्रत्येक रुपया जपून खर्च करत होती. मात्र डॉक्टरांचा पांढरा कोट फक्त श्रीमंतांच्या मुलांसाठीच असतो, हे मान्य करण्यास बिशूने नकार दिला. त्याने नीट-2026 मध्ये 720 पैकी 610 गुण मिळवले आणि आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची तयारी करत आहे. आता राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील कापरेन गावातील सूरज सैनीकडे वळूया. तो बारावीपर्यंत हिंदी माध्यमात शिकला. सुट्यांमध्ये कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गावातील घरांना रंग देण्याचे काम करत असे. बारावीपर्यंत त्याला नीट परीक्षेबद्दल माहितीही नव्हती, कारण त्या मार्गावर आधी कुटुंबातील कोणी गेले नव्हते. पहिल्या प्रयत्नातून त्याला हे समजले की, योग्य दिशा नसेल तर केवळ मेहनत पुरेशी नसते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्याने अथक परिश्रम केले, 583 गुण मिळवले आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. फंडा असा की, तुमच्या प्रवेशपत्रावर फक्त तुमचे नाव असते; पण त्यातून घडणारे भविष्य संपूर्ण कुटुंबाचे असते. तुम्ही केवळ विद्यार्थी नसता तर नकाशा नसताना जंगलातून स्वतःचा मार्ग शोधणारे धाडसी वाटाडे असता.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




