सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड्स समोर येत असतात. सध्या चीनच्या तरुणांमध्ये एकाच ट्रेंड्ची जोरदार चर्चा सुरू आहे. काहीजण प्लास्टिकने गुंडाळलेले अन्न खात असल्याचे व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यामुळे आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. टिकटॉक, डोयिन आणि इतर प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून या प्रकारावर जोरदार चर्चा सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे प्रयोग आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
काय आहे प्लास्टिक ईटिंग ट्रेंड?
सध्या सोशल मीडियावर “प्लास्टिक ईटिंग” नावाचा एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आला आहे. या प्रकारात काही जण आपल्या तोंडावर प्लास्टिक रॅप लावून त्याच्या आत अन्न ठेवतात, ते चावतात आणि नंतर थुंकून टाकतात. काही समर्थकांचा दावा आहे की यामुळे कॅलरी न घेता पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते.
मात्र तज्ज्ञांच्या मते हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आणि आरोग्यासाठी धोकादायक आहे. प्लास्टिकमधील रसायनांचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिवाय, अन्नाशी असा प्रयोग केल्याने गुदमरल्याचा किंवा संसर्गाचा धोका देखील संभवतो. त्यामुळे अशा व्हायरल ट्रेंडपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो?
विचित्र ट्रेंडचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. काही संशोधनांनुसार मायक्रोप्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण शरीरात गेले तर पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे पोटदुखी, गॅस, मळमळ यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
इतकेच नव्हे तर प्लास्टिकचे सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे खोकला किंवा श्वसनास अडथळा निर्माण होऊ शकतो. प्लास्टिकमध्ये आढळणारे BPA सारखे रसायन शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करू शकते. दीर्घकाळ असा संपर्क राहिल्यास यकृत आणि फुफ्फुसांवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मानसिक आरोग्यावरही ट्रेंडचा परिणाम
या ट्रेंडचा परिणाम फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. खाण्याबाबत भीती किंवा अपराधीपणाची भावना निर्माण झाल्यास अन्नाशी नकारात्मक नातं तयार होऊ शकतं. कॅलरीच्या भीतीमुळे वारंवार अन्न चावून थुंकण्याची सवय लागल्यास ते पुढे जाऊन ‘इटिंग डिसऑर्डर’चे रूप घेऊ शकते.
या ट्रेंडमुळे वजन कमी होतं का ?
वजन कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरतो का, याबाबतही स्पष्ट नकार दिला जातो. अशा पद्धतीमुळे शरीराची भूक नियंत्रणात राहत नाही; उलट नंतर जास्त खाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दीर्घकाळात याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते.
सोशल मीडियावर ट्रेंडवर टीका
सोशल मीडियात अनेकांनी या ट्रेंडवर टीका केली आहे. काही तरुणांनी अशा धोकादायक प्रयोगांपासून दूर राहावे, असा सल्ला दिला आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञांचा सल्ला हेच वजन नियंत्रणाचे सुरक्षित आणि प्रभावी मार्ग असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




