गेल्या काही काळात शिवसेनेचे 6, तृणमूल काँग्रेसचे 20व आम आदमी पक्षाचे 7 लोकसभा-राज्यसभा सदस्यइतर पक्षांत दाखल झाले. तिन्ही प्रकरणांत संबंधितपक्षांनी या विलयाला विरोध केला होता. तरीहीपक्षांतरविरोधी कायद्यानुसार हे विलय वैध मानले गेले.यामागील कायदेशीर तांत्रिक मुद्दा नेमका काय आहे? पक्षांतरविरोधी कायदा हा एका गंभीर समस्येवर उपायम्हणून करण्यात आला होता. खासदार व आमदारवारंवार पक्ष बदलून इतर पक्षांत प्रवेश करत होते. हरियाणातील आमदार गया लाल यांनी तर एका दिवसात तीन वेळा पक्षांतर केले होते. मंत्रीपद किंवा इतरलाभांच्या आमिषाने लोकप्रतिनिधींना पक्ष बदलण्यासप्रवृत्त केले जात होते. त्यामुळे निवडून आलेली सरकारे अस्थिर होत होती. 1967-68 या काळात विविध विधानसभांमध्ये पक्षांतर करणाऱ्या 210 आमदारांपैकी116 जणांना मंत्रीपदे दिली होती. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी 1985 मध्ये राज्यघटनेत दहावी अनुसूची समाविष्टकेली. त्यानुसार पक्ष तिकिटावर लोकप्रतिनिधी निवडून आला व त्याने पक्ष सोडल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकते. उद्देश स्पष्ट होता—राजकीय स्थैर्य राखणे, मतदारांनीदिलेल्या जनादेशाचे संरक्षण करणे. मात्र या कायद्यामुळेराजकीय पक्ष व निवडून आलेले प्रतिनिधी यांच्यातीलसंबंधही बदलले. दहावी अनुसूची लागू होण्यापूर्वीआमदार व खासदारांना तुलनेने अधिक स्वातंत्र्य होते.एखाद्या खासदाराने किंवा आमदाराने पक्षाच्या व्हिपचेउल्लंघन केले किंवा पक्ष सोडल्यास त्याला अपात्रतेलासामोरे जावे लागू शकते. परंतु यात काही अपवादहीआहे. सर्वांत महत्त्वाचा अपवाद म्हणजे राजकीय पक्षांचेविलीनीकरण. या तरतुदीनुसार एखाद्या राजकीय पक्षाचादुसऱ्या पक्षात विलय झाला आणि त्या निर्णयालासंबंधित पक्षाच्या दोन-तृतीयांश खासदार किंवाआमदारांचा पाठिंबा असेल, तर अशा लोकप्रतिनिधींनाअपात्रतेपासून संरक्षण मिळते. या तरतुदीमागील मूळकल्पना अशी होती की, पक्षविलीनीकरणाच्या प्रक्रियेतराजकीय पक्ष व त्याचे निवडून आलेले प्रतिनिधी यादोघांचाही सहभाग असेल. मात्र कालांतरानेन्यायालयांनी या तरतुदीची विशिष्ट व्याख्या केली.त्यानुसार पक्षांतरविरोधी कायद्याच्या व्यापक उद्देशापासूनकाहीशी वेगळी वाटते. न्यायालयांनी दोन-तृतीयांशबहुमताची अटच पुरेशी मानण्यास सुरुवात केली.एखाद्या पक्षातील पुरेशा संख्येने खासदार किंवा आमदारएकत्रितपणे दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यासमूळ पक्ष अस्तित्वात असला व त्याने विलीनीकरणालाविरोध केला तरी दहाव्या अनुसूचीनुसार त्यालाविलीनीकरण मानले जाते. उदाहरणार्थ- आम आदमीपक्ष स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात आहे. मात्रत्याच्या दहा राज्यसभा सदस्यांपैकी सात सदस्य आताभाजपसोबत आहेत. त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेसहीसक्रिय आहे व पक्षाने खासदारांच्या विलीनीकरणासविरोध केला आहे. तरी विद्यमान कायदेशीर व्याख्येनुसारपुरेशी संख्या पूर्ण होत असल्यास पक्षाचा विरोधनिर्णायक राहत नाही. ही समस्या लहान राज्ये वप्रादेशिक पक्षांसाठी गंभीर ठरते. कारण अशाविधानसभांत दोन-तृतीयांश आकडा गाठणे सोपे असते. 1985 च्या मूळ कायद्यात पक्षफुटीलाही अपात्रतेपासूनसंरक्षणाची तरतूद होती. एखाद्या पक्षातील एक-तृतीयांशलोकप्रतिनिधी वेगळे झाले तर त्यांना अपात्र ठरवलेजात नव्हते. मात्र कालांतराने ही तरतूद पक्षांतरालाआळा घालण्याऐवजी त्यालाच प्रोत्साहन देत असल्याचेस्पष्ट झाले. त्यामुळे 2003 मध्ये संसदेने ही तरतूद रद्दकेली. ताज्या घडामोडी पाहता पक्षविलिनीकरणाच्याअपवादात्मक तरतुदीबाबतही आता अशा प्रकारचापुनर्विचार करण्याची गरज असल्याचा प्रश्न उपस्थितहोत आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लोकशाहीत राजकीय पक्षांना महत्त्वाचेस्थान देण्यात आले होते. त्यामुळे एखादाखासदार किंवा आमदार आपल्यापक्षाच्या विरोधात गेला तर त्याचेसदस्यत्व रद्द होऊ शकते. मात्रपक्षविलयाच्या बाबतीत राजकीयपक्षाची इच्छाच अप्रासंगिक ठरतअसल्याचे चित्र दिसत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



