मुंबईतील इतर अनेकपैकी ती एक संध्याकाळ होती. मीमरीन ड्राइव्हच्या समुद्रकिनारी असलेल्या भिंतीवर बसलेहोते. माझ्या हेडफोनमध्ये लिओनार्ड कोहेन यांचे ‘फेमसब्लू रेनकोट’ हे गाणे ऐकत होते. वाऱ्याने माझे केसविस्कटले होते. मावळत्या सूर्याची लाली डोळ्यांतभरून राहिली होती. तो अग्निगोल अरबी समुद्रातविसावला. तशा लाटांच्या गर्जनेत कोहेन यांच्या गंभीर,संमोहन करणाऱ्या आवाजाची भर पडली.. तो क्षणअधिकच जादुई झाला. मनात क्यूबातील मालेकॉन,बालीतील सक्रिय ज्वालामुखी व युगांडातील राष्ट्रीयउद्यानातील सफारीदरम्यान पाहिलेल्या अविस्मरणीय सूर्यास्तांच्या आठवणी दाटून आल्या. तेवढ्यात माझे लक्ष विचलित झाले आणि मी ई-मेल उघडला. नुकताच आलेला एक ई-मेल अत्यंत उबदारव सुसंवादी वाटला. मात्र शेवटी लिहिले होते, ‘तुम्हाला याची अधिक अनौपचारिक आवृत्ती हवी आहे का,किंवा व्यवस्थापकासोबतच्या खासगी चर्चेसाठी तयार केलेली आवृत्ती?’ गेल्या काही महिन्यांत माझ्या लेखन आणि संवाद कौशल्याबद्दल मला अनेकदा शंका वाटू लागली होती. पण नंतर लक्षात आले की ई-मेल्स आणि सोशल मीडिया पोस्ट्स मला प्रभावी वाटत होत्या. त्या प्रत्यक्षात माणसांनी लिहिलेल्याच नव्हत्या. कृत्रिमबुद्धिमत्तेने तयार केलेले ई-मेल्स, कामासाठी त्याचावापर करणारे सहकारी, चॅटजीपीटीने लिहिलेल्यालिंक्डइन पोस्ट्स किंवा व्हॉट्सॲप संदेश पाहिले कीनेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही. मी माझावेळ आणि ऊर्जा कृत्रिम बुद्धिमत्तेने लिहिलेल्या संदेशांनाउत्तर देण्यात घालवावी का? मीही उत्तरांसाठीचॅटजीपीटीचा वापर करावा का? त्यामुळे एक यंत्रदुसऱ्या यंत्राशी माणसासारखे भासवत संवाद साधतअसल्याची विचित्र परिस्थिती निर्माण होईल? प्रत्यक्षमाणसांनी नव्हे तर कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार उत्तरांवरआधारित नातेसंबंध कसे निर्माण करायचे?क्लॉडसारख्या प्रणालींनी लिहिलेल्या ब्लॉग्स वन्यूजलेटर्सशी स्पर्धा कशी करायची?पर्प्लेक्सिटीसारख्या साधनांनी तयार केलेली पुस्तकेपुस्तकांच्या दुकानांत भरू लागली तर काय होईल?2024 मध्ये ऑक्सफर्डने ‘ब्रेन रॉट’ हा शब्द ‘वर्ड ऑफदी ईयर’ म्हणून निवडला. त्याचा अर्थ सामाजिकमाध्यमांवरील कमी दर्जाच्या आशयाच्या अतिरेकानेउपभोग घेतल्याने मेंदूची होणारी हानी. आता त्यातकृत्रिम बुद्धिमत्तेची भर घातली तर हा परिणाम अनेकपटींनी वाढू शकतो. तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यास आणिजगापासून मागे राहिल्यास काय होते, हे मला ठाऊकआहे. डिजिटल कथाकथन क्षेत्रात काम सुरू करतानामी पारंपरिक माध्यमांतील अनेक मित्रांबाबत हे घडतानापाहिले होते. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ आणखीएक साधन किंवा माध्यम नाही; ती सर्जनशील व्यक्तीम्हणून आपल्या अस्तित्वालाच प्रश्न विचारत आहे. मीफोन बाजूला ठेवला. समुद्रकिनाऱ्यावरील आकाशनारिंगी आणि गुलाबी रंगांनी नटले होते. तेव्हा मलाजाणवले की कोणतेही तंत्रज्ञान या अवर्णनीय आनंदाचीपुनर्निर्मिती करू शकत नाही. येथे बसण्याचा आनंद,मुंबईच्या खाऱ्या वाऱ्याचा स्पर्श, समुद्रात मावळणारा सूर्यआणि अंतर्मनाची शांतता – हे अनुभव कोणतीहीयंत्रणा निर्माण करू शकत नाही. दीड महिन्यांहूनअधिक काळ मी स्वतःला जर्मन भाषा शिकण्यातझोकून दिले होते. दररोज पाच तास नवी भाषा शिकणेथकवणारे होते. पण त्याचबरोबर ऊर्जादायीही होते.माझ्या मेंदूमध्ये नवे तंत्र-संबंध निर्माण होत होते. हो,चॅटजीपीटी क्षणार्धात भाषांतर करू शकतो; पणभाषांच्या अंतरंगात दडलेले रहस्य शोधण्याचा आनंद तोकधीच देऊ शकत नाही. माझ्या छोट्याशा बंडखोरीचाअर्थ कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहणे नव्हता, तरस्वतःच्या ‘ब्रेन रॉट’ची जाणीव करून घेणे हा होता. त्यासंध्याकाळी मरीन ड्राइव्हवर एक मोहक चंद्रकोर दिसतहोती. मुंबईच्या क्षितिजावरील दिवे उजळू लागले होते.वारा अधिक वेगाने वाहू लागला होता. गर्दी हळूहळूविरळ होत होती. त्या जागी बसून बदलांचा सामनाकरण्याच्या आपल्या गुंतागुंतीच्या पद्धतींचा विचारकरताना मला स्वतःबद्दल अपूर्ण, गोंधळलेले व कच्चेवाटत होते; पण त्याच वेळी मी जिवंत असल्याचीजाणीवही होत होती. ही जाणीव कोणतेही तंत्रज्ञानआपल्याकडून कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) मी माझा वेळ कृत्रिम बुद्धिमत्तेनेलिहिलेल्या ई-मेल्सना उत्तर देण्यातघालवावा का? मीही उत्तर देण्यासाठीचॅटजीपीटीचा वापर करावा का? यातूनअशी विचित्र परिस्थिती निर्माण होईल कीएक यंत्र दुसऱ्या यंत्राशी संवाद साधतआहे आणि दोघेही स्वतःला माणूसअसल्याचे भासवत आहेत?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




