Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘धुरंधर 2’ मुळे चर्चेत असतानाच त्याला एका गंभीर धमकीचा सामना करावा लागला आहे. रणवीर सिंगला व्हॉट्सअॅपवर वॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रणवीर सिंगच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या फायरिंग घटनेनंतर रणवीर सिंगला ही धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर वॉइस नोट पाठवत थेट धमकी देत मोठ्या रकमेची मागणी केली आहे. या धमकीनंतर रणवीर सिंगने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
रणवीर सिंगच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा
धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी त्वरित हालचाली सुरू केल्या. रणवीर सिंगच्या घराबाहेर अतिरिक्त सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. वॉइस नोट पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे. पोलिसांकडून धमकीची गंभीरतेने चौकशी सुरू असून कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.
सोसायटीतील रहिवाशांनी व्यक्त केली चिंता
रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ज्या सोसायटीत राहतात, त्या सोसायटीतील रहिवाशांनीही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेल्या सशस्त्र सुरक्षा रक्षकांमुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायटी प्रशासनाने याबाबत पोलिसांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. एका बाजूला अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला या वाढीव सुरक्षेमुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
बॉलिवूडमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या दोन्ही घटनांमुळे मुंबईतील नामवंत कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रणवीर सिंगला आलेली धमकी आणि रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेली गोळीबाराची घटना यांचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, रणवीर सिंग आणि त्याच्या कुटुंबीयांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, धमकी देणाऱ्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शहर
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- पुणे: खडकवासला-फुरसुंगी बोगद्यातून २० हजार कोटींची जमीन मोकळी होणार! पाणी बचतीसह वाहतुकीलाही मिळणार मोठी चालना
महाराष्ट्र
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- कोल्हापूर: त्रिपुरारी पहाट! ५१ हजार दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट; बोचऱ्या थंडीतही कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त सहभाग
गुन्हा
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात


























Subscribe to my channel



