सोशल मीडियाच्या आधीच शंकास्पद नैतिक मानकेअसूनही आसाम भाजपने शेअर केलेला व्हिडिओ एकानवीन नीचांकावर पोहोचला. या वादग्रस्त व्हिडिओमध्ये(तो आता काढून टाकण्यात आला आहे) आसामचेमुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना अगदी जवळून एअररायफलमधून गोळीबार करताना दाखवले होते. त्यांच्यानिशाण्यावर दोन व्यक्ती होते - एक टोपी घातलेला वदुसरा दाढी असलेला. व्हिडिओमध्ये बांगलादेशीघुसखोरांविरुद्ध व आसामी अस्मिता जपण्याच्या बाजूनेनिषेध असल्याचा दावा केला गेला होता. खरे तरव्हिडिओने मांडलेली हिंसक, सांप्रदायिक प्रतिमा स्पष्टपणेद्वेषपूर्ण होती. एका राज्याचा मुख्यमंत्री - राज्यघटनेनेनिवडून आलेले नेते - यांनी उघडपणे एखाद्या समुदायावरबंदूक रोखणे हे घटनात्मक अधिकारांचे गंभीर उल्लंघनआहे. नंतर सरमा यांनी असा दावा केला की त्यांना अशाकोणत्याही व्हिडिओची माहिती नव्हती. परंतु असेस्पष्टीकरण अप्रासंगिक आहे. कारण हा व्हिडिओ आसामभाजपच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केला होता.तो काढून टाकण्यापूर्वी दहा लाखांहून अधिक वेळापाहिला गेला होता. शिवाय ही एक वेगळी घटना नव्हती.गेल्या काही महिन्यांपासून सरमा "मियां" या शब्दाचा वापरकरून विषारी मोहीम राबवत आहेत. तो आसाममधीलबंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणाराअपमानजनक शब्द आहे. सरमा यांनी "मियां’ वर आर्थिकबहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले आहे. मग तेदुकानदार, भाजीपाला विक्रेते किंवा ऑटो-रिक्षाचालक असोत. त्यांच्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करण्याऐवजीसरमा यांनी त्यांच्या विधानांचे वर्णन आसामच्यासांस्कृतिक आणि सभ्यतेच्या ओळखीचे रक्षणकरण्यासाठी "आवश्यक’ असे केले आहे. स्पष्टपणेसरमा अशा विधानांमध्ये निवडणूक क्षमता पाहतात.आज सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर व्यापक भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. तेव्हा जातीय भाषणबाजी केवळ महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करत नाही तर समाजाचे ध्रुवीकरण करण्याचे साधन बनते. //"बाहेरील’ लोकांविरुद्धचा राग हा आसामच्या गुंतागुंतीच्या वांशिक परिदृश्याचा एक भाग आहे. राज्याची अंदाजे 38 टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि सांस्कृतिक ऱ्हासाची भीती निर्माण करणेसोपे होते. म्हणूनच आसामबाहेर ही बाब द्वेषपूर्ण भाषणमानले जाईल. स्थानिक लोकसंख्येच्या ऐतिहासिक,भाषिक, सांस्कृतिक आणि आर्थिक हक्कांचे रक्षणम्हणून ते भलेही राज्यात सादर केले जात आहे. भाजपनेतृत्व देखील या आक्षेपार्ह व्हिडिओवर मौन बाळगतआहे. "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा असूनही निवडणुकीपूर्वी आसाममध्ये जातीयवातावरण चिघळवून ठेवण्यात राजकीय फायदा दिसूनयेतो. भाजप नेते "घुसखोरांच्या’ कथित धोक्याचाहीवारंवार उल्लेख करतात. वास्तविक आंतरराष्ट्रीयसीमांवर लक्ष ठेवणे ही केंद्रीय दलांची जबाबदारी आहे.सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे बहुसंख्य राजकारणाच्याविजयी मोर्चासमोर स्वयंघोषित "धर्मनिरपेक्ष’ वर्ग देखीलजवळपास शक्तीहीन आणि असहाय्य दिसतो. वरीलव्हिडिओसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईचीमागणी करण्यासाठी काही नागरिकांनी सर्वोच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. परंतुव्यापक राजकीय वर्गाने शर्मा यांच्या जातीयवादाचा थेटसामना करण्यास संकोच दाखवला. कारण यामुळे हिंदूमतदार आणखी दुरावू शकतात अशी भीती आहे. एककाळ असा होता जेव्हा काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिमतुष्टीकरणाचा आरोप केला जात होता; आज बहुसंख्यहिंदू मतांसाठी स्पर्धा आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी शर्मायांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये पोलिस तक्रार दाखल केलीअसेल तर ते हिंदू मतांवर अवलंबून नसल्यामुळे आहे.आणि कदाचित म्हणूनच शर्मा इतक्या मुक्तपणे द्वेषपूर्णभाषण करू शकतात. काँग्रेसचा दीर्घकाळचा नेताभाजपचा पोस्टर बॉय बनणे हे समकालीन राजकारणातीलसंधीसाधू पक्षांतराचे एक दुर्मिळ उदाहरण आहे. 2015 मध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दावा केला कीत्यांनी काँग्रेस सोडली. कारण राहुल गांधींनी एका खाजगीबैठकीत त्यांचा //"अपमान’ केला होता. राहुल गांधींनाआसामच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या पाळीवकुत्र्याला बिस्किटे खायला घालणे हे जास्त महत्त्वाचेवाटले. सत्य हे आहे की त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाकाँग्रेसमध्ये पूर्ण झाल्या नाहीत. तेव्हा भाजप त्यांच्यासाठीएक सुरक्षित व अनुकूल पर्याय बनला. भाजपने शर्मायांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते या सत्याचा विसरपडला. मात्र पक्षांतरानंतर त्यांच्यावरील सर्व खटले मागेघेण्यात आले आहेत किंवा त्यांची गती मंदावली आहे.आज 57 वर्षीय शर्मा हे भाजपच्या नवीन पिढीतीलआघाडीचे नेते आहेत. ही पिढी अटलबिहारीवाजपेयी-अडवाणी काळातील भाजप नेते राजकीयशुद्धता, नैतिक संयम किंवा घटनात्मक मूल्यांना बांधीलहोते. ही पिढी मात्र अशा साधनशुचितेला बांधील दिसतनाही. ही पिढी सर्वात जास्त राजकीय सत्ता मिळविण्याच्यातीव्र इच्छेने प्रेरित आहे. म्हणूनच ईशान्येकडील पक्षाचाप्रमुख चेहरा एक कुशल निवडणूक व्यवस्थापक आणिसमस्यानिवारक म्हणून शर्मा यांना एक अमूल्य ‘असेट’मानले जाते. परंतु राजकारणाकडून चांगल्याची अपेक्षाकरणारे नागरिक निःसंशयपणे शर्मा यांच्या वृत्तीमुळेअस्वस्थ होतील. पुनश्च : हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडण्याचानिर्णय जाहीर केला. तेव्हा एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने पक्षनेतृत्वाला कथितरित्या इशारा दिला होता की "ते भविष्याचेनेते आहेत; आम्हाला त्यांच्यासारख्या नेत्याची उणीवभासेल.’ एक दशकानंतर तो "भविष्याचा चेहरा’ त्यांनाएका अंधकारमय वर्तमानाचा भाग वाटत असेल का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिमतुष्टीकरणाचा आरोप केला जात होता.असाही एक काळ होता; परंतु आजभारतीय राजकारणात बहुसंख्यांक हिंदूमतांसाठी स्पर्धा दिसून येते. कदाचितयामुळेच आसामचे मुख्यमंत्री हिमंताबिस्वा सरमा इतके बेधडकपणे वादग्रस्तविधाने करू शकतात हे स्पष्ट होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


