महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए)आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवघ्या 100 दिवसांतखाद्यान्नातील भेसळीची अनेक प्रकरणे उघडकीसआणली. ही कारवाई मागील 18 महिन्यांतीलकारवाईपेक्षाही जास्त आहे. महाराष्ट्रात अत्यंत उत्साहानेसाजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळातही त्यांचीछापेमारी सुरूच आहे. राजकीय भ्रष्टाचाराविरुद्ध लढादेणाऱ्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटातील सुपरकॉपच्याधर्तीवर लोक आता त्यांना ‘सिंघम'' म्हणू लागले आहेत. अन्नभेसळीविरोधातील त्यांच्या कारवाईवर आलेली प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. शिथिल नियमांचीसवय झालेल्या व्यावसायिकांना त्यांना आता परवाना गमावण्याची भीती वाटते. दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांमध्ये नवी आशा व दिलासा दिसतो. सरकारनेफार पूर्वीच विचारायला हवा होता असा प्रश्न शेवटी कोणीतरी विचारताना दिसतोय: //"शेवटी तुम्ही आम्हाला खायला काय देताय?’ आपण विशिष्ट काळात जगत आहोत. येथे बाहेर खाणेहे रोजच्या आयुष्याचा भाग बनले आहे. आपणखातो-पितो ते सुरक्षित आहे की नाही, याची तपासणी नक्कीच कोणीतरी करत असेल, या विश्वासाने आपणऑनलाइन अन्न मागवतो. पण अस्वच्छ स्वयंपाकघरे,भेसळयुक्त साहित्य व अन्न सुरक्षा नियमांचे उघडउल्लंघन उघड करणारा प्रत्येक छापा या विश्वासाचाचुराडा करतो. देशात कायदे कठोरपणे लागू केले जातनाहीत, ही खरी समस्या आहे. पण इथूनच एक मोठाप्रश्न उपस्थित होतो : आपले काम प्रामाणिकपणेकरणाऱ्या अधिकाऱ्याला आपण ‘सुपरहीरो'' कामानावे? मुंढे यांच्याकडे अलौकिक शक्ती नाही. त्यांनापार्श्वसंगीत किंवा फिल्मी संवादांची गरज नाही. तरीही‘सिंघम'' हा किताब त्यांना दिला जातो. कारण वजनदारलोक व्यवस्थेतून सहज सुटण्याचा मार्ग शोधतात, हेपाहण्याची सवय नागरिकांना झाली आहे. संपूर्णकारकिर्दीत मुंढे हे प्रस्थापित हितसंबंधांना आव्हान देणारे, सहजासहजी तडजोड न करणारे अधिकारी म्हणूनओळखले गेले. 21 वर्षांत त्यांच्या 25 बदल्या झाल्या.पण याच टप्प्यावर एका अधिकाऱ्याची ही कथा संपूर्णभारतीय सनदी व्यवस्थेची कथा बनते. भारतात हुशारकिंवा प्रामाणिक अधिकाऱ्यांची कमतरता नाही. दरवर्षीदेशातील अतिशय गुणवंत तरुण सनदी सेवेत येतात.कमतरता आहे ती अशा संस्थात्मक वातावरणाची. काहीत्रुटी त्यांना स्वतंत्रपणे काम करू देत नाही. एखादाअधिकारी कठीण बदली सहन करू शकतो. पण प्रत्येकमहत्त्वाच्या निर्णयापूर्वी अनेक गणिते मांडावी लागतात,अशा व्यवस्थेत टिकून राहणे कठीण असते. कोणनाराज होईल? एखादा नेता तक्रार करेल का? एखादाबडा व्यावसायिक फोन करेल का? एखादी धार्मिकसंघटना विरोध करेल का? एखादी प्रभावी लॉबी तिच्यासंबंधांचा वापर करेल का? आणि काम पूर्णहोण्याआधीच बदलीचा आदेश तर येणार नाही ना?अशा प्रकारे हळूहळू या संस्थांची कणाहीनता वाढतजाते. सगळेच अधिकारी भ्रष्ट असतात म्हणून असे होतनाही, तर यंत्रणेतच दोष असतो. कदाचित मुंढे यांच्याकथेतील महत्त्वाचा भाग हा नाही की त्यांना ‘सिंघम''म्हटले जात आहे. महत्त्वाचे हे आहे की, नागरिक म्हणूनआपण अशा एखाद्या व्यक्तीसाठी आतुर झालो आहोत.अन्न सुरक्षा ही तुकाराम मुंढे एफडीएच्या प्रमुख पदावरआहेत की नाही, यावर अवलंबून नसावी. एखाद्याअधिकाऱ्याने धाडी टाकल्याने हॉटेल्स स्वच्छ होऊनयेत. कडक आयुक्त पदावर असतानाच भेसळखोरांचेधाबे दणाणायला हवेत असे नाही. मुंढे यांची बदलीझाल्यानंतरही ही यंत्रणा सक्षमपणे चालली पाहिजे. ता. क.: गेल्या आठवड्यात मी महाराष्ट्रातील एकावरिष्ठ मंत्र्यांना विचारले: "तुम्हाला मुंढे यांच्याबद्दल कायवाटते?"त्यांनी उत्तर दिले, "अहो, तो तर वेडा माणूसआहे!" पण कदाचित आपल्याला थोडे ‘वेडेपण''असलेल्या अशाच सरकारी अधिकाऱ्यांची गरज आहे.त्यांची निष्ठा आपल्या राजकीय मालकांऐवजी सामान्यनागरिकांशी असली पाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) मुंढे यांच्याकडे कोणतीही अलौकिकशक्ती नाही. त्यांना बॅकग्राउंड म्युझिककिंवा फिल्मी संवादांची गरज नाही. तरीही‘सिंघम'' हा किताब त्यांच्या नावाशीजोडला गेला. कारण सामर्थ्यवान लोकनेहमीच व्यवस्थेतून निसटण्याचा मार्गशोधून काढतात, हे पाहण्याची सवयनागरिकांना झाली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
महाराष्ट्र
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- कोल्हापूर: बाळूमामा देवस्थान ट्रस्ट गैरव्यवहारप्रकरणी मोठा खुलासा; एसआयटीकडून सहावा एजंट सागर पाटील अटकेत!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
























Subscribe to my channel




