कोल्हापूर: जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या संत सदगुरु बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक आणि जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांच्या तपास पथकाने (SIT) आणखी एक धडक कारवाई केली आहे. शेतकऱ्यांकडून अवघ्या २० लाख रुपयांना खरेदी केलेली जमीन आदमापूर (ता. भुदरगड) येथील प्रसिद्ध संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टला कोट्यवधी रुपयांना विक्री करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एजंट सागर सर्जेराव पाटील (वय ४५, रा. अतिग्रे, ता. हातकणंगले) याला एसआयटीच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती, आणि आता सागर पाटीलच्या अटकेमुळे गजाआड गेलेल्या संशयित एजंटांची संख्या सहावर पोहोचली आहे. अटक करण्यात आलेल्या सागर पाटील याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण आणि आतापर्यंतची कारवाई? संत सदगुरु बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी यापूर्वी भुदरगड पोलिस ठाण्यात औपचारिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ट्रस्टच्या मालकीच्या मेंढ्या-बकऱ्यांच्या विक्रीबरोबरच कोट्यवधी रुपयांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप आहेत. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास नंतर 'आर्थिक गुन्हे शाखेकडे' (EOW) सोपवण्यात आला. सध्या विशेष तपास पथकाकडून (SIT) या प्रकरणातील विविध व्यवहारांची आणि कागदपत्रांची कसून चौकशी सुरू आहे.
तपासादरम्यान जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची फेरतपासणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या. यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सागर महादेव शिंदे (वय ४२, रा. मुरगूड, ता. कागल), भीष्म जोतीराम पाटील (३६, रा. मुरगूड), प्रकाश पांडुरंग मांगले (५७, रा. मुरगूड), रणजितसिंह सुरेशराव सूर्यवंशी (५२, रा. निढोरी, ता. कागल) आणि तन्मय दत्तात्रय बाचनकर (२७, रा. आदमापूर) या पाच एजंटांना यापूर्वीच अटक केली होती. आता या साखळीतील सहावा संशयित आरोपी सागर पाटील यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
६० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला गैरव्यवहाराचा आकडा: तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित आर्थिक आणि जमीन व्यवहारांमधील गैरव्यवहाराची एकूण रक्कम तब्बल ६० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. विशेषतः मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीतील मेंढ्यांच्या विक्रीचे व्यवहार आणि मोठ्या जमिनींची खरेदी-विक्री या सर्वांची एसआयटीमार्फत सखोल चौकशी सुरू आहे. काही जमीन व्यवहारांमध्ये अत्यंत चलाखीने बनावट कागदपत्रे तयार करणे, सरकारी दप्तरी त्यांचा वापर करणे तसेच व्यवहारातील अधिकृत नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि अनियमितता केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ही धडक कारवाई अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या विशेष पथकाने पार पाडली आहे.
हातकणंगले परिसरात पसरले होते एजंटगिरीचे जाळे: अतिग्रे गावचा माजी सरपंच असलेला संशयित सागर पाटील हा हातकणंगले आणि आसपासच्या परिसरात प्लॉट आणि जमिनीचे मोठे व्यवहार करणारा एजंट म्हणून सक्रीय आहे. पेठवडगांव, हूपरी, चोकाक, माले, हेरले, शिरोली, तिळवणी, अतिग्रे आणि हातकणंगले या संपूर्ण परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून कमी किमतीत शेतजमिनी खरेदी करून, त्या जमिनी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगररचना विभागामार्फत एन.ए. (अकृषिक) करून त्यांचे प्लॉटिंग करून अव्वाच्या सव्वा किमतीने विकण्याच्या धंद्यात तो पटाईत असल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
शहर
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
महाराष्ट्र
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
- नवी दिल्ली: 'इंडिया' आघाडीत अंतर्गत वाद उफाळला! तृणमूलच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्या राहुल गांधींवर जुन्या मित्रपक्षाचीच कडक टीका; म्हणाले, "तुम्ही दुतोंडी आहात"






















Subscribe to my channel



