‘या’ शहरातील फ्लॅट स्वस्त होणारImage Credit source: Instagram
आता तुम्हाला फ्लॅट तब्बल 5 ते 12 लाखांपर्यंत स्वस्तात मिळू शकतात. हो. राजधानी दिल्लीत डीडीएने मोठ्या गृहनिर्माण योजनेतील फ्लॅटच्या किंमतींमधून पार्किंग शुल्क काढून टाकले आहे. घर खरेदीदारांची 5 ते 12 लाख रुपयांपर्यंतची बचत होईल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत डीडीएने मोठ्या गृहनिर्माण योजनेतील फ्लॅटच्या किंमतींमधून पार्किंग शुल्क काढून टाकले आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे घर खरेदीदारांची 5 ते 12 लाख रुपयांपर्यंतची बचत होईल. त्याच वेळी, ज्या खरेदीदारांनी आधीच पैसे दिले आहेत त्यांना परतावा किंवा समायोजन मिळेल.
तुम्ही दिल्लीत घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासमोर एक चांगली संधी आली आहे. आतापर्यंत जर तुम्ही घराच्या चढ्या किंमती ऐकून माघार घेत असाल तर आता तुम्ही घर खरेदी करण्याची तयारी करू शकता. दिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) घर खरेदीदारांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाने फ्लॅटच्या एकूण किंमतीपेक्षा वेगळे पार्किंग शुल्क काढून टाकण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की आता तुम्हाला कव्हर किंवा ओपन पार्किंगच्या जागेसाठी लाखो रुपये वेगळे द्यावे लागणार नाहीत.
प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे सदनिकांच्या किंमती सुमारे 5 लाख रुपयांवरून 12 लाख रुपयांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. चार मोठ्या गृहनिर्माण योजनांमध्ये हा निर्णय त्वरित लागू केला जाईल. प्राधिकरणाने सदनिकेच्या एकूण किंमतीत कव्हर केलेले पार्किंग किंवा पार्किंग शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढे पार्किंगच्या जागांवर अतिरिक्त खर्च नाही
दिल्ली विकास प्राधिकरणाच्या या निर्णयाचा विशेषत: एमआयजी आणि एचआयजी फ्लॅट खरेदीदारांना फायदा होईल. सध्या डीडीएच्या चार योजना सुरू आहेत – डीडीए कर्मयोगी आवास योजना 2025 (एफसीएफएस), डीडीए टॉवरिंग हाइट्स कड़कड़डूमा गृहनिर्माण योजना 2025 (ई-लिलाव), डीडीए सिटीझन हाऊसिंग स्कीम 2026 (एफसीएफएस) आणि डीडीए टॉवरिंग हाइट्स कड़कड़डूमा गृहनिर्माण योजना 2026 (एफसीएफएस).
डीडीएच्या आदेशानुसार, आता पार्किंगचा खर्च फ्लॅटच्या प्लिंथ एरिया रेट किंवा PAR मध्ये जोडला जाईल. म्हणजेच, सदनिकेच्या प्लिंथ एरिया रेटची गणना करताना हा खर्च जोडला जाईल. याचा अर्थ असा आहे की पार्किंगचा खर्च हा सामान्य प्रकल्प खर्चाचा एक भाग असेल आणि खरेदीदारांना स्वतंत्र शुल्क जोडले जाणार नाही. म्हणजेच, आता तुमच्या बिलात पार्किंग शुल्क नावाचे कोणतेही अतिरिक्त ओझे लागणार नाही. प्राधिकरणाने स्पष्टपणे सांगितले आहे की कार किंवा स्कूटर गॅरेजसाठी घर खरेदीदारांकडून कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जाणार नाहीत.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




