नवी दिल्ली: दिल्लीत २० जुलै रोजी जंतरमंतर येथे पार पडलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी (३१ जुलै) नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत जखमी पोलिसांच्या पत्नी, मुले आणि नातेवाईकांनी त्या दिवसाची भीषण परिस्थिती, पोलिसांवर झालेले दगडफेक-हल्ले आणि सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या एकांगी वृत्तांतांवर आपली तीव्र खंत व्यक्त केली. "गणवेशामागेही एक कुटुंब असते" असे सांगत, या हिंसाचारात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची बाजू संसदेतही मांडली जावी आणि यावर सविस्तर चर्चा व्हावी, अशी जोरदार मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
"रक्ताने माखलेला गणवेश अन् सोशल मीडियावर आरोपींचा शिक्का": पत्रकार परिषदेत एका जखमी सब-इन्स्पेक्टरच्या (उपनिरीक्षक) मुलीने आपल्या वडिलांचा अनुभव सांगताना अश्रू अनावर झाले. "माझे वडील १५ वर्षे नौदलात मरीन कमांडो म्हणून सेवेत होते आणि नंतर दिल्ली पोलिसांत रुजू झाले. आंदोलनाच्या दिवशी ते घरी परतले तेव्हा त्यांचा गणवेश रक्ताने पूर्णपणे माखलेला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना टाके पडले होते. पण ज्यावेळी मी सोशल मीडिया उघडला, तेव्हा त्यांनाच गुन्हेगार आणि अत्याचारी म्हणून घोषित केले जात होते," असा संतापजनक अनुभव तिने मांडला.
तसेच एका सहाय्यक उपनिरीक्षकांच्या (ASI) मुलाने सांगितले की, त्याच्या वडिलांना आंदोलकांच्या गर्दीने घेरून डोक्यावर दगड आणि जड वस्तू फेकून मारल्या, ज्यामुळे त्यांना आरएमएल रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करावे लागले होते.
२५० हून अधिक जवान जखमी, मोठे नुकसान: पत्रकार परिषदेत कुटुंबीयांनी स्लाईड शोच्या माध्यमातून जखमी आणि रक्तबंबाळ पोलिसांची छायाचित्रे, फुटलेले हेल्मेट्स आणि रक्ताळलेले गणवेश पत्रकारांसमोर मांडले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार:
-
या हिंसाचारात २५० हून अधिक पोलिस आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.
-
११० हून अधिक बॅरिकेड्स, ३०० हून अधिक बॉडी प्रोटेक्टर्स, ३५० हेल्मेट्स आणि २५ हून अधिक सरकारी वाहनांचे आंदोलनातील असामाजिक घटकांकडून नुकसान करण्यात आले.
असामाजिक घटकांवर कडक कारवाईची मागणी: "विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे समजण्यासारखे आहे. ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी तपासून खात्री केली जाईल त्यांना सोडून द्यावे; मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन पोलिसांवर प्राणघातक हल्ले करणाऱ्या आणि देशाच्या संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या दंगलखोर, असामाजिक घटकांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी," अशी मागणी एका जखमी एएसआयच्या पत्नीने केली.
राजकीय वर्तुळात पडसाद: पोलिसांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे. संसदेत एका बाजूने आंदोलकांवरील पोलीस कारवाईवरून सरकारला घेरले जात असताना, आता पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा आणि त्यांच्या कुटुंबीयांची हाक यावरही लोकसभेत व राज्यसभेत चर्चा व्हावी, असा सूर निघू लागला आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




