राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात जास्त 7 जागा महाराष्ट्रात रिक्त होणार आहेत. इथल्या निवडणुकांवर सगळ्यांची नजर आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशिवाय विरोधी पक्षातील शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारखे नेते रिटायर होणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील संख्याबळाचं समीकरण असं आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना विजय मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल.
महाराष्ट्रात सात जागा रिक्त होणार आहेत. वर्तमान संख्याबळानुसार 7 पैकी 5 जागांवर सत्ताधारी महायुती आघाडीची बाजू वरचढ आहे. उरलेल्या दोन जागांसाठी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत जोरदार चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभा खासदार बनायचं आहे. शिवसेना यूबीटी आणि काँग्रेस आपपाल्या बाजूने जोर लावतायत.
26 फेब्रुवारीला अधिसूचना
एप्रिल महिन्यात 37 राज्यसभा खासदार रिटायर होणार आहेत. ते गेल्यानंतर रिक्त होणाऱ्या पदांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. 10 राज्यात 37 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. निवडणुकी संदर्भात 26 फेब्रुवारीला अधिसूचना जारी होईल.
जास्त जागा निवडून येणं स्वाभाविक
राज्यसभा निवडणुकीत जनतेचा थेट सहभाग नसतो. पण याचं राजकीय महत्व मोठं आहे. कारण राज्यसभा सदस्यांची निवड संबंधित राज्यातील विधानसभेचे आमदार करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात विद्यमान विधानसभेची समीकरणं पाहिली तर महायुती आघाडीच्या जास्त जागा निवडून येणं स्वाभाविक आहे. पण अतिरिक्त उमेदवार उतरवले तर क्रॉस वोटिंगची सुद्धा शक्यता आहे. विरोधी पक्ष एखादा उमेदवार जास्त उतरवून निवडणूक रंगतदार करु शकतात.
एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मतांची संख्या किती?
राज्यसभा निवडणुकीत एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मतांची संख्या एकूण वैध मतांच्या आधारावर ठरते. सामान्यत: महाराष्ट्रात एकाजागेसाठी जवळपास 38 ते 42 मतांची गरज पडते. महाराष्ट्रात दोन सभागृह आहेत. विधानसभा आणि विधान परिषद. विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. विद्यमान राजकीय समीकरणांनुसार दोन्ही सभागृहात सर्व पक्षांची स्थिती अशी आहे. 288 सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे 132 आमदार आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 57 आणि एनसीपी अजित पवार गटाचे 41 आमदार आहेत. महायुतीचा एकूण आकडा 220 च्या आसपास आहे. विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. काँग्रेसचे 16 आणि एनसीपी शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. महाविकास आघाडीचा आकडा 45-50 च्या आसपास आहे. त्याशिवाय काही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आहेत.
आता रिटायर होणारे खासदार कोण?
आता जे खासदार रिटायर होणार आहेत, त्यात भागवत कराड, धैर्यशील मोहन पाटिल, रजनी अशोक राव पाटिल त्या शिवाय काँग्रेसकडून डॉ. फौज़िया ताहसीन अहमद खान यांचं नाव आहे. शिवसेना यूबीटीकडून प्रियंका चतुर्वेदी, एनसीपीकडून शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नावं आहेत.
रामदास आठवले आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना काहीही करुन महायुतीत राज्यसभेची सीट हवी आहे. रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील यांना राज्यसभा खासदार बनायचं आहे. भाजपं काही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकते. विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीकडून प्रियंका चतुर्वेदी आणि एनसीपी नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर जायचं आहे. काँग्रेसला सुद्धा संख्याबळाच्या आधारावर राज्यसभेची जागा हवी आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यसभेची एक जागा हवीय. एकूणच बदललेल्या राजकीय समीकरणात जोडं-तोड आणि चर्चांचा बाजार गरम आहे.
शहर
- पुणे: महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघा मित्रांकडून लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या धमकीमुळे खळबळ, चारही आरोपी जेबेबंद
- मुंबईसह एमएमआरमध्ये पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला 'ऑरेंज अलर्ट' जाहीर
- मुंबई: मध्य रेल्वेत केवळ ५३ टक्के लोकोपायलट; पश्चिम रेल्वेत सुरक्षा दलाच्या हजारो जागा रिक्त!
- बार्शीत मन हेलावणारी घटना! १० महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून; जन्मदाती मृतदेह खांद्यावर घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल"
महाराष्ट्र
- जळगाव: पोहण्याचा मोह जीवावर बेतला, कुटुंबियांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू
- पुणे: महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघा मित्रांकडून लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या धमकीमुळे खळबळ, चारही आरोपी जेबेबंद
- मुंबईसह एमएमआरमध्ये पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला 'ऑरेंज अलर्ट' जाहीर
- बीड: अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले, चार जण गंभीर जखमी
गुन्हा
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- बार्शीत मन हेलावणारी घटना! १० महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून; जन्मदाती मृतदेह खांद्यावर घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल"
- जळगाव: समोर आला 'सायबर क्राईम हॉटस्पॉट'; १ कोटी ३० लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
- कल्याणमध्ये थरारक हत्याकांड! लिव्ह-इनमधील प्रियकराची हत्या करून मृतदेह गोणीत लपवला; पुरावे मिटवण्यासाठी २४ तास सुरू ठेवला नळ"
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
- उत्तर प्रदेश: बिजनौरमध्ये राजस्थानच्या नवदंम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; सामूहिक बलात्काराचा कुटुंबाचा गंभीर आरोप
- नवी दिल्ली: ग्राहकांच्या बिलात बेकायदेशीरपणे 'सर्विस चार्ज' जोडणे पडले महागात; चायोस, बार्बेक्यू नेशनसह ४१ रेस्टॉरंट्सवर सीसीपीएचा कडक बडगा!
- दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन हिंसक: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके पोलिसांकडून ताब्यात, मोठा तणाव"

























Subscribe to my channel



