8 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

जेव्हा आमिर खानला त्यांची पहिली पत्नी, दुसरी पत्नीआणि होणारी पत्नी यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवासकरताना पाहिले गेले, तेव्हा साहजिकच खळबळ उडाली.काहींनी याला आधुनिक म्हटले, तर काहींना ते विचित्रवाटले. अनेकांना तर हे समजलेच नाही. पण कदाचितआपण एक मोठी गोष्ट दुर्लक्षित करत आहोत.
आपण मिश्र कुटुंब ही संकल्पना उदयाला येताना पाहतआहोत. ही कल्पना पाश्चात्त्य समाजांत अनेक काळापासूनसामान्य आहे, पण भारतात ती अजूनही संशयाने पाहिलीजाते. आपल्याकडे लग्नाला पवित्र मानले जाते,घटस्फोटाला अजूनही कलंक मानले जाते आणि कौटुंबिकन्यायालयात अशा वादांची गर्दी असते, जे अनेकदालग्नापेक्षाही जास्त काळ चालतात. भारतात घटस्फोटालापिढ्यान्पिढ्या एका युद्धासारखे सादर केले गेले. त्यात एकखलनायक आणि एक पीडित असणे आवश्यक होते. कुटुंबेदोन गटांत विभागली जात. मुले या सर्वांचा सर्वाधिकफटका सोसत असत. घटस्फोटित पती-पत्नी एकमेकांच्याआयुष्यातून पूर्णपणे गायब होत, केवळ वकील आणिन्यायालयाच्या आदेशांमार्फत त्यांचा संपर्क उरत असे. पणआता एक शांत बदल सुरू होत आहे.
आमिर खान आणि किरण राव यांनी वारंवार या गोष्टीवर भरदिला आहे की, जरी त्यांचे लग्न संपले असले तरी त्यांचेकुटुंब संपलेले नाही. हृतिक रोशन आणि सुझैन खानयांनीही घटस्फोटानंतर यशस्वी संयुक्त पालकत्वाचेकदाचित भारतातील सर्वात मोठे उदाहरण मांडले आहे. तेकौटुंबिक कार्यक्रमांत एकत्र सहभागी होतात, महत्त्वाचेसण-उत्सव सोबत साजरे करतात. त्यांनी आपल्या मुलांच्याहिताला स्वतःच्या अहंकारापेक्षा वर ठेवण्याचा एकजाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे दिसते. हे महत्त्वाचे आहेकारण सेलिब्रिटी केवळ आपले मनोरंजन करत नाहीत, तरते शक्यतेची एक नवी दिशाही दाखवतात.
अशा देशात जिथे घटस्फोटित स्त्रियांना अजूनही विचारलेजाते की ‘काय चुकले होते?’ आणि जिथे घटस्फोटितपुरुषांना स्वतःच्या अधिकारांसाठी लढण्यास प्रोत्साहित केलेजाते, तिथे घटस्फोटित पती-पत्नीला सार्वजनिक कटुता नठेवता एकत्र पाहणे हे खोलवर रुजलेल्या धारणांना आव्हानदेते. हे सूचित करते की घटस्फोट नेहमीच अपयश नसतो.अनेकदा हे केवळ आयुष्यातील एक बदल असते.
अर्थात, सेलिब्रिटींचे आयुष्य हे आदर्श मानून चालणारनाही. आर्थिक समृद्धी अनेक गोष्टी सोप्या करते. आया,समुपदेशक, एकापेक्षा जास्त घरे, लवचिक दिनचर्या आणिआर्थिक सुरक्षा यामुळे ते ताण कमी होऊ शकतात, ज्यांचासामना सामान्य कुटुंबांना करावा लागतो. तरीही हे तत्त्वमहत्त्वाचे आहे.
प्रश्न असा नाही की दोन व्यक्ती आयुष्यभर विवाहित राहूशकतात का? प्रश्न हा आहे की, लग्न संपल्यानंतरही त्याएकमेकांबद्दल आदर आणि सद्भावना ठेवू शकतात का?मुले या प्रक्रियेत असतात, तेव्हा हे अधिक महत्त्वाचे ठरते.जगभरातील संशोधन सांगते की, पालकांमधील दीर्घकाळचालणाऱ्या संघर्षाचा मुलांना अधिक त्रास होतो. दोन शांतघरांच्या दरम्यान राहणारे मूल, एकाच तणावपूर्ण घरातअडकलेल्या मुलापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत असते.
देश बदलत आहे. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतआहेत. लोक उशिरा लग्न करत आहेत. लग्नाकडूनअसणाऱ्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. साहजिकचघटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत, वरदिलेले प्रसंग एक पर्यायी कथा मांडतात, ज्यामध्येघटस्फोटित पती-पत्नी एकमेकांचे सहकारी बनून राहूशकतात आणि मुलांना कुणा एकाची बाजू घेण्यास भागपाडले जात नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
शहर
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.

























Subscribe to my channel



