पुणे: देशभरातील गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘ब्लड इन नीड’ या सामाजिक उपक्रमाचा आता अखिल भारतीय विस्तार करण्यात येत आहे. या विस्ताराचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून विकसित करण्यात आलेल्या ‘ब्लड इन नीड’ मोबाइल ॲपचे लोकार्पण पुण्यात होणार असून या कार्यक्रमात विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जगद्गुरू श्रीमद्रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्याशी थेट संवाद साधण्याची विशेष संधी उपलब्ध होणार आहे.
जगद्गुरू श्रीमद्रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून २ ऑक्टोबर २०११ रोजी ‘ब्लड इन नीड’ या उपक्रमाची सुरुवात झाली. अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती, गंभीर आजार किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांना योग्य वेळी आणि विनामूल्य रक्त उपलब्ध करून देणे हा या सेवेचा प्रमुख उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या उपक्रमाने हजारो कुटुंबांना मदतीचा हात दिला असून आजपर्यंत २७ हजार ६३८ हून अधिक गरजू रुग्णांना जीवनदायी मदत मिळाली आहे.
रक्तदान क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने ‘ब्लड इन नीड’ मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून देशभरातील रक्तदाते, रक्तपेढ्या, सामाजिक कार्यकर्ते, रक्तमित्र आणि गरजू रुग्ण यांच्यात तातडीने संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे रक्ताच्या शोधात होणारा विलंब कमी होऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
गेली ३४ वर्षे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी ‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’ या मानवतावादी विचाराने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. रक्तदानाबरोबरच अवयवदान, देहदान, विनामूल्य रुग्णवाहिका सेवा, व्यसनमुक्ती अभियान, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले कार्य देशभरात आदर्श मानले जाते. या उपक्रमांमुळे समाजसेवेच्या क्षेत्रात एक व्यापक चळवळ उभी राहिली असून लाखो लोक त्यामध्ये सहभागी झाले आहेत.
या विशेष कार्यक्रमादरम्यान माध्यम प्रतिनिधींना ‘ब्लड इन नीड’च्या राष्ट्रीय विस्ताराबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा समाजसेवेसाठी कसा उपयोग होऊ शकतो, रक्तदान चळवळीचे भवितव्य, युवकांची सामाजिक जबाबदारी, पर्यावरण संवर्धन, आरोग्यविषयक जनजागृती आणि विविध सामाजिक विषयांवर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुहास मोहनळकर, ROTO-SOTTO चे नोडल अधिकारी डॉ. आकाश शुक्ला, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ अभिनेते व पर्यावरण संवर्धक सयाजी शिंदे, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत महालक्ष्मी लॉन्स, पुणे-नगर रोड, खराडी बायपासजवळ, जुना जकात नाक्यासमोर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. रक्तदान आणि समाजसेवेच्या राष्ट्रीय चळवळीला नवे बळ देणारा हा उपक्रम ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देशभरातील रक्तदाते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एकाच व्यासपीठावर आणून रक्तदान व्यवस्थेला अधिक वेगवान, सुलभ आणि परिणामकारक बनविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
आपले स्नेहांकित,
(राजन सखाराम बोडेकर)
जनसंपर्क व माध्यम समन्वयक
जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ – नाणीज धाम
मो. ८८८८२६२७२७ / ९२२५०८८५३०
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



